निसर्गाचे रूप (10-8-,2019)-हर्षल चौधरी काय आहे ही निसर्गाची किमया, कधी येतॊ राग याला,तर कधी दया. कधी घेऊन येतॊ 'सोसाट्याचा वारा ' तर कधी आणतो हा 'पावसाच्या धारा. पावसाळी होतो हा हिरवागार, उन्हात देतो मात्र सूर्यकिरणांचा मार. कधी घेईन येतॊ सुंदर अशी पहाट, कधी आणतो सुमुद्राला उंच मोठी लाट. कधी डोकावतो हा माणसाच्या सुखात, येतॊ तेव्हा तो पावसाच्या रूपात. तेव्हा जातो तो माणसाला 'रडवून ' धो धो पडून टाकतो सगळं काही 'बुडवुन'. येतॊ कधी बनून हा 'महापूर', लावून जातो तेव्हा 'एकजुटीचा सुर '. घेऊन येतॊ कधी 'दुष्काळाची पीडा', जातो शिकवून माझ्या शेतकऱ्याला धडा. भूकंप आणून करतो,आपल्याला हा दुखी. राग आला की आणतो हा 'ज्वालामुखी'. हे सगळे आहेत निसर्गाचेच गुण, जातो आपल्याला हा, खुप काही शिकवून. माणसानेच बिघडवले त्याचे संतुलन, तो करतो मात्र सदैव आपलं रक्षण. निसर्गालाच बनवा आता, खरा आपला' मित्र ' प्रार्थना करा कमी होऊदे कृष्णा मायेचे पात्र... #कोल्हापूर चा महापूर