Nojoto: Largest Storytelling Platform
vaibhavikulkarni8880
  • 38Stories
  • 11Followers
  • 280Love
    0Views

Vaibhavi

Words are my ultimate expression..

  • Popular
  • Latest
  • Video
0a1410b6335972e560188f9375a0aa8a

Vaibhavi

सोयरी पंढरी, सावळा श्रीहरी..
भेटो चराचरी, ऐसी घडो वारी!
ऐसी घडो वारी!

दान येवो घरी ज्ञानोबा तुक्याचे,
नामा चोखोबाही वाट दावी!

रामदासी राम मिरीयेसी श्याम,
तैसा विठु माझ्या दाटू येवो उरी!

सुखाचे हे सुख ओतूनी उरावे,
पुन्हा मी संसारी परतलो जरी!

सोयरी पंढरी, सावळा श्रीहरी..
भेटो चराचरी, ऐसी घडो वारी!
ऐसी घडो वारी!

- वैभवी ✒️
7-11-23

©  Vaibhavi
0a1410b6335972e560188f9375a0aa8a

Vaibhavi

तुला आठवावे निळ्या सांजकाळी,
तू डोळे भरुनी मला साठवावे!

तुझ्या गावचा मेघ तू पाठवावा,
इथे ऊन भांबावुनी ओसरावे..
असा दाटू ये हुंदका अंबरा,
तू इथे, मी तिथे, आज बरसून जावे!

तुला पाहण्या तारका जागल्या,
चंद्रही मागची पौर्णिमा जागू पाहे..
पुन्हा जागतो रात्र मी एकटी,
तू ही स्वप्नात तुझिया मला जागवावे!

-वैभवी.

©  Vaibhavi #Love
0a1410b6335972e560188f9375a0aa8a

Vaibhavi

मी ओहोटीची लाट होऊन,
तुला सामावून घेईन संपूर्ण..
तू ओळखीच्या किनाऱ्यासारखा,
सकाळी कुशीत घे फक्त!

©  Vaibhavi

0a1410b6335972e560188f9375a0aa8a

Vaibhavi

Music quotes Dear Music,
All I have to express my love and gratitude towards you are these dry, plain words! Neither I have a skilled sweet voice nor do my fingers know playing any instrument. Even then, I live you! Through my ears listening to the masterpieces, my heart absorbing sheer goodness, my mind blowing with the vibe, and my pen translating those melodies!🎼✒️♥️
Thankyouu for making me dream of being a lyricist!
And being my companion, literally!
I Love You!❤

©  Vaibhavi #WorldMusicDay2021
0a1410b6335972e560188f9375a0aa8a

Vaibhavi

कवितेस माझ्या छंद तुझा रे,
गंध तुझा, आवंढ तुझा..
लहर तुझी, व्यापते तिलाही,
रंग तुझा, व्यासंग तुझा!

माझी लेखणी, कागद माझा,
बंध तुझा, अनुबंध तुझा..
शाई भिनते नसांत माझ्या,
वेध तुझा, आवेग तुझा!

माझी वही, माझीच स्वाक्षरी,
शोध तुझा, आनंद तुझा..
तू हासून म्हणशी कणाकणांतून,
"देह तुझा, अन मी ही तुझा!"

©  Vaibhavi #अदा
0a1410b6335972e560188f9375a0aa8a

Vaibhavi

"तू नसताना"

रिमझिम रिमझिम पाऊस धारा,
झरझर झरझर गार वारा..
शहारूनी जातो मनाला..
तू नसताना,का खेळ हा?
तू असताना, वाटे हवा हवा!

मोरपंख रेशमी, स्पर्श मखमली
तू समोर माझिया, की ही सावली?
तुझी ओढ लागे जीवाला..
तू असताना, धुंद ही निशा
तू नसताना, ही तुझी नशा!

अलगुज वाजे कानी,
श्याम मेघ अस्मानी
ही निळाई वेढते जीवा..
दवबिंदू गर्द पानी,
कैफ त्यात हा रुहानी
चांदरात मोहवी मना..
तू असताना, रंग मैफिलीला
तू नसताना, होई सुना सुना!

तू हवीस जीवनी, स्वप्न कोवळे
हाक माझी ऐकती, मेघ सावळे
तुझा ध्यास लागे मनाला..
तू असताना, हा जीव भारलेला
तू नसताना, तो होई बावरा!

-वैभवी कुलकर्णी.

©  Vaibhavi #droplets
0a1410b6335972e560188f9375a0aa8a

Vaibhavi

तू दूर की जवळी सख्या?
मी जाणिते मनातुनी..
तू दूर की जवळी सख्या?
तरी सांग ना डोळ्यांतुनी!

तू सांग सारे बोलके,
स्वप्नांत जे जे डोलते..
तू सांग जे ही बहरते,
वाढत्या या अंतरातुनी!

कोमेजतेही सांग तू,
तू सांग केवळ बोल तू..
पेरीन सुख डोळ्यांत मी,
पाणावल्या श्वासांतुनी!

©  Vaibhavi #अदा
0a1410b6335972e560188f9375a0aa8a

Vaibhavi

कवितेस माझ्या छंद तुझा रे,
गंध तुझा, आवंढ तुझा |
लहर तुझी, व्यापते तिलाही,
रंग तुझा, व्यासंग तुझा ||

माझी लेखणी, कागद माझा,
बंध तुझा, अनुबंध तुझा |
शाई भिनते नसांत माझ्या,
वेध तुझा, आवेग तुझा ||

माझी वही, माझीच स्वाक्षरी,
शोध तुझा, आनंद तुझा |
हासून म्हणशी कणाकणांतून,
देह तुझा, अन मी ही तुझा ||

©  Vaibhavi #अदा
0a1410b6335972e560188f9375a0aa8a

Vaibhavi

रामनाम गाऊ, आम्ही रामनाम गाऊ..
देहरुखी संसाराला, देवमुखी पाहू ||
रामनाम गाऊ..


मारुतीस वंदू आम्ही, प्रीत धरू राम..
शबरीचे नेत्र लेवू, वाट पाहू राम..
अहिल्येचे भाग्य लाभो, हेच करो राम!
रामनाम गाऊ..


रामदास आठवू, गाऊ प्रभातीचा राम..
कबीरास आळवू, गाऊ सांजकाळी राम..
तिन्ही त्रिकाळी जागवू, सार्थ रामनाम!
रामनाम गाऊ..

©  Vaibhavi #अदा #रामनवमी
0a1410b6335972e560188f9375a0aa8a

Vaibhavi

दृष्ट न लागो आपुल्या प्रेमा
आपुलीच राजा, नाही दुजाची..
काजळाने बघ तीट लाविते,
दृष्ट काढिते दुष्ट मनाची ||

दुष्ट मन कसे वेड्यागत हे,
बहरल्या सुखा पोखरू पाहते..
तुझ्या नि माझ्या पुनवरातीला,
सावट अवसेचे बांधते..
घट्ट इतकी बिलगेन तुला की,
मला राहीना जाण मनाची ||1||
काजळाने बघ तीट लाविते,
दृष्ट काढिते दुष्ट मनाची..

कातरवेळी मिलन जरी हे,
बंध आपुले जन्मभराचे..
जन्म जन्मता, हृदय गुंतता,
ठाऊक होते तुझे व्हायचे..
घट्ट इतका तू बिलग मला की,
कथा राहीना या जन्माची ||2||
काजळाने बघ तीट लाविते,
दृष्ट काढिते दुष्ट मनाची..

©  Vaibhavi #WForWriters
loader
Home
Explore
Events
Notification
Profile