Nojoto: Largest Storytelling Platform
sandippawar1587
  • 8Stories
  • 37Followers
  • 31Love
    12Views

Sandip Pawar

  • Popular
  • Latest
  • Video
0a56244c1fd3c5a1dadb402e58555034

Sandip Pawar

मकरसंक्रांत
वर्ष सरले डिसेंबर गेला ,हर्ष घेऊनि जानेवारी आला 
निसर्ग सारा धुक्याने ओला ,तिळगुळ घ्या गोड गोड बोला
कारण आज आहे संक्रांतीचा सण...........
मराठी अस्मिता ,मराठी मन 
मराठी परंपरेची ,मराठी शान 
मराठी संस्कृती, मराठी बाण
तिळगुळ घ्या गोड गोड बोला,
 आज आहे संक्रांतीचा सण......
तीळ तीळ कणाने जवळ घेऊ मनाने 
विसरून सारी कटुता हृदय जोडू मनाने
दुःखे हरावी सारी ,सारी आयुष्य सुखाने
तिळगुळ घ्या गोड गोड बोला......
तिळगुळ मिळता साथ ही दोघांची
तसे आयुष्य व्हावे एकमेका पाठीची
सूंदर जगणे हे व्हावे जणू पाखरा सारखे
रोज जरी तुटले मन ,तरी आयुष्य नव्याने 
तिल गुल घ्या गोड गोड बोला......
जसे सूर्याचे तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते
तसे तेज,यश, कीर्ती,वर्धिष्णू होत जावे
आयुष्य सोने करुनि नवचैतन्य मिळत जावो
तिळगुळ घ्या गोड गोड बोला....
आकाशी पतंग उडता संदेश हा आयुष्याचा
दोरी हाती देवाच्या ,तव सूंदर जगणे
सुटता हातची दोरी ,गटार  समान जगणे 
हेच आठवणे आजचे ,ऋण हे देवाचे
दे सूंदर आयुष्य आम्हा ,सदा तुझ्या आठवणींने
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.....
फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका
चुकत असेल तर समजून सागा
जमत नसेल तर अनुभव सागा 
पण सणापूरते गोड न राहता 
आयुष्यभर गोड राहण्याचा संकल्प धरा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला....
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेक्षा ,,(लेखक संदीप पवार) मकरसंक्रांत

मकरसंक्रांत

0 Love

0a56244c1fd3c5a1dadb402e58555034

Sandip Pawar

खरच का कर्ज माफी
खरच का कर्ज माफी समजले नाय आम्हाला 
गरिबीचे सुख लाभले नाही आम्हाला 
सरकारने तर वेडे बनवले आम्हाला
कर्ज माफी देतो म्हणून फसवत राहिले आम्हाला
शेतकरी हो आम्ही नाही करोडपती
कर्ज काढून करतो शेती नाही आम्ही लखपती
पावशाने सर्व नेले वाहून राहिले ते तण खाली
पाऊली ही नाही राहिली ,चोथा नुसता शेणा खाली
बोला तुम्हीच आता करू काय आम्ही .......
सरकार नवीन आले पुन्हा टिक घोषणा बाजी
देतो तुम्हा कर्ज माफी फसवत राहिले गोरगरीबशी
दिले एकदा कर्ज माफी सांगून भाषण बाजी
चागले वाटले मनाला आनंद ही झाला बाई
कुठे ठेवू नेवैद्य हेच मात्र समजले नाही बाई
बोला तुम्हीच आता..........
विश्वास दिला तोही कुणाला घोटाळा बाजी लोकांना
इमानदार तो राहिला बाजूला हे मात्र केलले नाही कुणाला
गरीब इजतीला मारतो म्हणून कसे करून कर्ज भरतो
तीन तीन वर्षे थकलेले कर्ज श्रीमंतांचे लाज नाही त्याना
सरकार ही मिटून दूध पिऊ लागला त्रास मात्र गरिबाला
बोला तुम्हीच आता .......
माफी सर्वाना द्यावी हीच होती मागणी 
आता मात्र तसे दिसत नाही ,इमानदार शेतकऱ्यांची किंमत
तडफडून मेळा तरी काळात नाही त्याची इज्जत 
इइमानदार राहिला बाजूला झूट का हे बोलबाला 
बोला तुम्हीच आता....लेखक संदीप पवार खरच का कर्ज माफी

खरच का कर्ज माफी

1 Love

0a56244c1fd3c5a1dadb402e58555034

Sandip Pawar

*बाप कुठे घरात लक्ष देतो?*

तो तर काय घराबाहेरच असतो. 
सकाळी निघतो, धक्के खात कामावर जातो, संध्याकाळी थकून घरी येतो.  
घरी आल्या आल्या तक्रारी ऐकतो… इतकंच?
यात काय विशेष?  *बाप कुठे घरात लक्ष देतो?*

शाळेची फिस, घरचा महिन्याचा किराणा, लाईटबिल, फोनबील…
सगळं मॅनेज करतो. महिनाअखेरीस पाय ओढत घराकडे येतो. 
घर चालवण्यासाठी वेळप्रसंगी उधारी करतो, ती कशीतरी फेडतो… 
पण *बाप कुठे घरात लक्ष देतो?*

मुलांच्या दुखण्याखुपण्यावर अस्वस्थ होतो. 
कुशीत घेऊन झोपत नसेल कदाचित, पण रात्रभर तो ही जागा राहतो. 
म्हाताऱ्यांची आजारपणे, हॉस्पिटलचा खर्च सगळ्यांची तरतूद करतो. 
स्वतःची दुखणी मात्र अंगावरच काढतो. 
पण त्याला कोण विचारतो? कारण असंही *बाप कुठे घरात लक्ष देतो?*

कुटुंबासाठी लढतो, कधी जिंकतो कधी हारतो. 
लढाईत झालेल्या जखमांना अलगद लपवतो. कुटुंबासमोर हसतो. 
पुरुष आहे ना तो? त्याला रडण्याची परवानगी कुठे? 
सर्व प्रसंग आनंदाने साजरे करून तो मात्र मनातच कुढतो. 
छ्या राव… *बाप कुठे घरात लक्ष देतो?*
🙏सगळ्या बाबांना सर्मपित🙏 बाप कुठे घरात लक्ष देतो

बाप कुठे घरात लक्ष देतो

6 Love

0a56244c1fd3c5a1dadb402e58555034

Sandip Pawar

नवीन पहाट
जुन्या आठवणी साठवून नवीन नात्याची सोबती
राग द्वेष सोडून सारे नवीन आयुष्य सोबती
करूनि सजावट बुद्धीची ,नजर तेज संकल्पाची
करूया स्वागत या 2020 नवीन वर्षाचे
तोच रंग ,तोच सूर्य ,तोच माणूस तरी नवीन पहाट
आहे नवीन वर्षाची नवीन पहाट.........
काल काय झाले लोकांना कळले नाही 
बाटलीच्या नादात मंगळवार ही कळला नाही
कत्तल ही झाली ,मनाची ,भवनाची 
संसारात सांगत राहिली पत्नी लाख मोलाची
नवीन पहाट झाली ,तरी त्याला कळली नाही
तरी तोच रंग..............
इंग्रजांच्या गुलामीत आपण जगलो होतो
त्याच विचाराणा आपण  मुकलो ही होतो
तेच खाद्य तेच पेय सर्व घेत राहिली होतो
नवीन वर्षात सर्व गटारात पडत राहिली
 भारतीय संस्कृतीला कोणी समजले नाही
तरी तोच रंग........
श्री शिवाजीच्या राज्यात शिवराज्य घडले
तरी गुडीपाडवाच्यांच्या आठवण सर्व विसरले
2020 चे स्वागत तर करूया आपण
खरे नवीन वर्ष गुडीपाडव्यला करूया आपण
नसेल दारू ,नसेल धुंदी फक्त विचारांची एकच मस्ती
तरी तोच रंग...
लेखक संदीप पवार नवीन पहाट

नवीन पहाट

5 Love

0a56244c1fd3c5a1dadb402e58555034

Sandip Pawar

माझे आई बाबा 
वर्षा मागे वर्षे गेली आई बाबा काही थांबले नाही
कर्तृत्वाच्या परड्यात रास काही जमली नाही
किती करावे कस्ट सीमा मात्र राहिली नाही
आई बाबाच्या पायांची भिग्री काही सुटली नाही
तरी मात्र निराशा कामात मात्र राहिली नाही 
मिळेल की नाही जास्त याची अपेक्षा मात्र ठेवली नाही
कारण धरणीला आई मानणारे माझे आई बाबा
असे माझे आई बाबा ....................
करावे तरी किती कस्ट हो ,यश तर रहावे 
स्वप्नांना पुढे नेणारे सरकार तरी असावे 
विश्वास गेला वाया कर्म दिसले नाही
आई बाबाच्या पदरी काहीच उरले नाही
एकच आशा राहिली ती चिमुकल्यांना देण्याची
कोणतीही कसरत सोडली नाही सुख त्याना देण्याची
कारण सुख दुखाना आलींगण देणारे माझे आई बाबा
असे माझे आई बाबा..............
आम्हाला मोठे केले  सुख सर्व आम्हा दिले
फाटके कपडे मात्र त्यानी घातले नवीन आम्हा दिले
जीवनातले सर्व सुख देऊन ते मात्र मागे उरले
पायाला भेगा पडता धूर मात्र घेत राहिले
आम्हला चागले बूट मिळावे म्हणून सदैव पुढे राहिले
स्वतः कपडे फाटके शिवत राहिले
नेहमी काळजी आमची करता नवीन देत राहिले
कारण मायेची घागर कधीच कमीन राहू देणारे माझे आई बाबा
असे माझे आई बाबा........

लेखक संदीप पवार माझे आई बाबा

माझे आई बाबा

6 Love

0a56244c1fd3c5a1dadb402e58555034

Sandip Pawar

आई कोण असते

आई कोण असते

39 Views

0a56244c1fd3c5a1dadb402e58555034

Sandip Pawar

 खरच आई कोण असते

खरच आई कोण असते

6 Love

0a56244c1fd3c5a1dadb402e58555034

Sandip Pawar

आई कोण असते
खरच आई कोण असते ,हे आपल्याला समजत नसते 
सकाळी उठळ्या पासुन धावत असते 
मला जे हवे नको ते बघत असते 
तरी आपण खोड्या काढतो ती कुठे काय करते
खरच आई कोण असते.......
बाबा मला मारतील म्हणून आईच सावरत असते 
मी कॉलेज करून मोठे व्हावे म्हणून ती धुनी भांडी करते
स्वतःचा विचार न करता दिवस भर झटत असते 
तरी नेहमीच तिची चुक काढत राहतो 
खरच आई कोण असते...
आपले लग्न व्हावे म्हणून प्रयत्न करत
असते
आपण मात्र लग्न झाले की आई कोण कळत नसते
नेहमी आपले दुःख लपवून कोपऱ्याला रडत राहते 
तरी नेहमी तीची चुक काढत रा
हतो
खरच आई कोण असते...
आई प्रेमाचा सागर असते ,कधी ही न संपणारे प्रेम असते 
म्हणून आपल्याला कळले नसते ,आई कोण असते
लेखक संदीप पवार( उर्से) आई कोण असते

आई कोण असते

3 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile