Nojoto: Largest Storytelling Platform
prashantdandge7690
  • 5Stories
  • 143Followers
  • 30Love
    0Views

Prashant Dandge

  • Popular
  • Latest
  • Video
0d840b241f04817d8b647419966063a5

Prashant Dandge

पौर्णिमेच चांदण जसं जशे आज पाण्यावर पडत होते,
तसं तशे लाजरे बुजरे भाव 
पाण्याच्या अंतःकरणात
तरंग म्हणून उठत होते...
चंद्र देखील आकाशातून
 एक टक पाण्याकडे बघत होता
स्वतःचे पडलेले पाण्यातील प्रतिबिंब निरखुन बघत होता
चंद्र आजदेखिल पाण्याच्या प्रेमापासुन
अनभिज्ञ होता
पाण्याच्या हृदयातील आपल्या अस्तित्वाला आजदेखील 
तो फक्त प्रतिबिंब मानत होता...

0d840b241f04817d8b647419966063a5

Prashant Dandge

0d840b241f04817d8b647419966063a5

Prashant Dandge

अचानक आभाळ भरून येणे म्हणजे प्रेम
मोगऱ्याचा दरवळणारा सुगंध म्हणजे प्रेम
अंगावरून वाऱ्याची अलगद गेलेली झुळूक म्हणजे प्रेम
पापणीवर अश्रूंचा थांबलेला थेंब म्हणजे प्रेम
ओठांवर तिचं नाव येताच अंगावरती आलेला शहारा म्हणजे प्रेम
तिच्या हाताचा झालेला पहिला ओघळता स्पर्श म्हणजे प्रेम....…....

0d840b241f04817d8b647419966063a5

Prashant Dandge

पहिल्या सरीच्या स्पर्शाने मातीतून दरवळणारा सुगंध म्हणजे जीवन
फुलाच्या पाकळीवर मोत्यासम विराजमान असलेला "दव" म्हणजे जीवन
पौर्णिमेच अंगणात पडलेलं शुभ्र चांदण म्हणजे जीवन
कोणीतरी आपली सतत काळजी करत राहणं म्हणजे जीवन
आणि हो!!!
 तीचा हात सतत हातात असणे म्हणजेच जीवन....

0d840b241f04817d8b647419966063a5

Prashant Dandge

जीवनाचा बऱ्याचदा कंटाळा आला,
पण कधी कोणाचे वाहते अश्रू पुसण्याचा मोह झाला,
तर कधी कोणाच्या निरागस हास्यात मन गुंतले....
जीवनाचा बऱ्याचदा कंटाळा आला,
पण कधी जबाबदारीने पाऊल थांबवले,
तर कधी सुखद गोड स्वप्न पडले...
जीवनाचा बऱ्याचदा कंटाळा आला,
पण कधी मन अनोळखी सुगंधात गुंतले,
तर कधी अनोळखी स्पर्शाने गुंतले...
जीवनाचा बऱ्याचदा कंटाळा आला,
पण कधी मन तुझ्यात गुंतले,
तर कधी तुझ्या आठवणीत ,
फक्त तुझ्या आठवणीत गुंतले..... तुझ्या आठवणीत

तुझ्या आठवणीत


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile