Nojoto: Largest Storytelling Platform
swarupsawant9178
  • 96Stories
  • 21Followers
  • 842Love
    531Views

Swarup Sawant

मी कवी लेखक आणि गायक आहे आवाज संगीत विद्यालय मध्ये मी संगीत शिकतो

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
16d1cc9bbcdb5c68b606da8b214dffb1

Swarup Sawant

येवो वादळ किंवा येवो कुठलाही रोग
आम्हाला फरक नाही पडणार.
या विषयांवर आम्ही 
राजकारण मात्र करणार.

मरताना पाहतोय लोकांना
तरी सुद्धा मुग गिळून बसणार.
मेलेल्यांच्या कपाळावरचं
लोणी मात्र खाणार.

कोरोनाच निमित्त साधून
बेरोजगारीवर बोलणार.
साध्या भोळ्या जनतेसमोर
हिरो आम्हीच होणार.

भुकेने मरते सारी जनता 
आम्ही आमची पोटं भरणार.
आमचं खाऊन झाल्यावर
शेवटी पॅकेज जाहीर करणार.

तुमच्या या राजकारणात
गरीब मात्र भरडणार.
माणुसकीच्या नावावर तुम्ही 
राजकारण तरी किती करणारं?

नको तुमचं पॅकेज साहेब
अहो किती मुर्ख बनवणार?
अहो आमचंच लुटणार
आणि आमचंच सांत्वन करणार.

✍️ स्वरुप शशिकांत सावंत
📞 9082194858

©Swarup Sawant #Politics
16d1cc9bbcdb5c68b606da8b214dffb1

Swarup Sawant

ती दोन मिनीटे 

ती दोन मिनीटांची शांतता 
बरचं काही सांगून जाते,
प्रत्येकाच्या आयुष्यात हि 
दोन मिनीटांची शांतता येतेच येते.

चेहरे असतात रडवे 
अन भावना होतात अनावर.
औषध देखील नसतं 
त्या दोन मिनीटांच्या आजारावर.

बंद असले डोळे 
तरी ती व्यक्ती असते समोर.
शोधत असते त्याला 
हि भावुक झालेली नजर.

कोणी आपला असतो 
तर कोणी परका असतो.
कोणी मित्र असतो 
तर कोणी दुश्मन देखील असतो.

त्या दोन मिनीटांच्या वेळेला
नाव दिल श्रद्धांजली.
वेळ अशी ती हृदयद्रावक 
आणि नयन अश्रुंनी भरलेली.

भावना असतात वेगवेगळ्या 
मात्र मनात एकच असतं.
दोन मिनिटे का होईना हे मन 
त्या व्यक्तीसाठी तरसत असतं.

©Swarup Sawant

9 Love

16d1cc9bbcdb5c68b606da8b214dffb1

Swarup Sawant

26/11 आठवण शुर पुत्रांची 

रात्र होती वैर्‍याची ना कुणास ठाऊक होते,
आपल्याच नकळत अजान शत्रू आपल्या घरात शिरत होते. 

दिमाखात उभे होते ताज हॉटेल मुंबईची ती शान,
नव्हते माहित त्यालाही की संकटाचे ढग आले दाटून.

कोण अचानक कुठून आला कोण ठरला पहिल्या गोळीचा शिकार, 
काहीच नव्हते समजत कोणा काही क्षणात हाहाकार.

रक्त आणि रक्तानेच खेळत होते होळी होते ते क्रूर दहशतवादी,
देहावर देह पडत होते कुणाला काही समजण्याआधी.

कोण तो कुठला कसाब का एवढा त्याचा त्रागा,
माणुसकीसाठी त्याच्या मनात नसेल का हो थोडीतरी जागा? 

मुंबई पोलिस कणखर आपले आले यावेळी अगदी धावून,
संकटावर मात करण्या उभे राहिले घट्ट पाय रोवून.

प्रतिकार केला निर्भीड होउन जिवाची पर्वा न करता,
हसत हसत छातीवर झेलल्या गोळ्या कसलाच विचार न करता.

हेमंत, अशोक, विजय, तुकाराम अनेकांनी दिली प्राणाची आहुती,
इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली त्यांच्या कर्तृत्वाची महती.

पुन्हा एकदा दाखवून दिले आमच्या निर्भीड मुंबईने, 
कितीक संकटे आली मात्र संकटांना तोंड दिले अगदी धैर्याने.

स्वरुप सावंत 
9082194858

7 Love

16d1cc9bbcdb5c68b606da8b214dffb1

Swarup Sawant

*_मराठी रंगभूमी दिन_* 

आम्हा कलाकारांच्या हक्काचा 
एकच तर दिवस असतो,
म्हणूनच तर हा सुवर्णदिवस आमच्या 
नेहमी स्मरणात राहतो. 

नाट्यसृष्टिच्या इतिहासाची पाने 
नव्यारुपात लिहीली जातात, 
मनाच्या एका कप्प्यात या गोड आठवणी 
जपुन ठेवल्या जातात. 

पुन्हा एकदा सजतो रंगमंच एका 
नव्या रूपात एका नव्या रंगात, 
नवरसांनी बहरतो श्रृंगार पुन्हा एकदा 
त्याच आपल्या ढंगात.

जस आई मुलाच नात तशीच नाळ 
जोडली आमची रंगभूमीशी,
सदैव राहू प्रामाणिक आम्ही 
आमच्या या कर्मभूमीशी.

मराठी रंगभूमी दिन 
उन्नत उज्ज्वल प्रगतशील होवो, 
प्रत्येक कलाकार हा सर्वांच्या 
नेहमी स्मरणात राहो.

- स्वरुप सावंत 
भांडुप कलाकार कट्टा रंगभूमी दिनाच्या तुम्हा सर्व कलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा

रंगभूमी दिनाच्या तुम्हा सर्व कलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा

8 Love

16d1cc9bbcdb5c68b606da8b214dffb1

Swarup Sawant

दोष द्यावा तो कुणाला? 

परत एकदा एका मुलीला शिकार बनाव लागलं, 
अश्लीलतेच्या मोहाला बळी पडावं लागलं.

शरिराची लक्तरे वेशीवर टांगली,
रानटी कुत्र्याप्रमाणे जणु तुटून पडली.

दिसायला सुंदर नाजूक कळी दोष फक्त एवढाच होता,
सहन करण्यापलीकडे दुसरा मार्गच कुठला नव्हता.

भुक होती योनीची मग जीभ का छाटली?
अक्षरशः त्या निष्पाप पोरीने मरणयातना भोगली.

आईच्या त्याच स्तनांमधून दुधाचा पहिला थेंब प्यायलात, 
आता त्याच्यासाठी मुर्खांनो हैवान कसे झालात.

पेटतील आता मेणबत्त्या निषेध व्यक्त केला जाईल, 
काही दिवसांनी पुन्हा एकदा तीच वेळ परत येइल.

नराधमांना शिक्षा होईल,निकालही लागेल,
पण हिरमुसलेली कळी पुन्हा कशी फुलेल?

शिव छत्रपतींच राज्य पुन्हा एकदा यावं, 
अशा या बलात्कारी नराधमांना जागीच चिरडले जावं

कवी - स्वरुप शशिकांत सावंत .
भांडुप मुंबई 
9082194858

8 Love

16d1cc9bbcdb5c68b606da8b214dffb1

Swarup Sawant

✒️ माणूस  ✒️

माणूस माणूस म्हणता म्हणता जनावर तु झालास,
थोड्या स्वार्थापोटी मात्र तु माणुसकीच विसरलास. 

जगायचं म्हणून जगु नकोस किड्या मुंग्या देखील जगतात, 
लाखोंच्या संख्येने त्या पायाखाली चिरडल्या जातात.

नात्या गोत्याच्या चक्रव्यूहात मी पणा मात्र शिकलास, 
माझ माझ म्हणुन मात्र खऱ्या नात्याला मात्र मुकलास.

व्यसनांच्या आहारी जाऊन राक्षसीरुप धारण केले,
या व्यसनांमुळेच तर कित्येक संसार उध्वस्त झाले.

पैसा प्रसिद्धीसाठी तु खालची पातळी गाठली,
स्वतःच स्वतःच्या इज्जतीची खिरापत वाटली.

मोह मायेत गुंतुन गेलास अरे खर जगणंच तु विसरलास, 
क्षणीक सुखासाठी मात्र स्वाभिमान हरवून बसलास. 

आता तरी जागा हो, 
माणुस म्हणून जगण्यासाठी हो तयार,
वेड्यावाकड्या जगण्याला तुझ्या दे आकार. 

मनाचा आवाज ऐकून क्षणाक्षणाला लक्ष कर, 
भविष्याची दिशा ठरवून यशाला तु स्पर्श कर. 

ज्ञानाचा दिवा प्रज्वलित कर कर्तृत्वाला कणखर कर, 
सुकर्म करुन माणवा जन्म तुझा हा सफल कर.

जीवन आहे अनमोल तुझे हे नको घालवू व्यर्थ, 
माणसातील देवपण शोधून दे जगण्या तुझ्या या अर्थ.

कवी - स्वरुप शशिकांत सावंत
भांडुप मुंबई 
मोबाईल नंबर - ९०८२१९४८५८ #RaysOfHope
16d1cc9bbcdb5c68b606da8b214dffb1

Swarup Sawant

शिक्षक राष्ट्राचा आधारस्तंभ 

जन्म दिला आईने तर नाव दिले बाबांनी,
शिक्षणाच्या प्रवाहात आणले ते फक्त शिक्षकांनी.

शिक्षणाचा मनी दिप जागवला,
जगण्याचा खरा अर्थ उमगला. 

हात धरून जेवायला आई वडिलांनी शिकवले,
मात्र ते जेवण कसे अन किती खायचे हे तुम्ही सांगितले.

आई वडिलांनी संस्कार दिले,
ते संस्कार कसे टिकवायचे 
हे शिक्षकांनी शिकवले. 

जगाच्या स्पर्धेत कसे खेळावे हे तुम्ही शिकवले,
त्या स्पर्धेत कसे जिंकावे हे शिक्षकांनी शिकवले.

निःस्वार्थी भावनेने आपल्याकडचे सर्वच दिले, 
आमच्या स्वरुपात तुम्ही स्वतःला पाहिले. 

यशाची गुरुकिल्ली तुमच्यामुळे भेटली, 
शिक्षकदिनी तुमची आवर्जून आठवण आली.

राष्ट्राचा आधारस्तंभ खरेच आहात तुम्ही, 
नतमस्तक होताना तुमच्या चरणी सर धन्य झालो आम्ही.

कवी - 
स्वरुप शशिकांत सावंत 
भांडुप मुंबई 
9082194858

8 Love

16d1cc9bbcdb5c68b606da8b214dffb1

Swarup Sawant

शिक्षक राष्ट्राचा आधारस्तंभ 

जन्म दिला आईने तर नाव दिले बाबांनी,
शिक्षणाच्या प्रवाहात आणले ते फक्त शिक्षकांनी.

शिक्षणाचा मनी दिप जागवला,
जगण्याचा खरा अर्थ उमगला. 

हात धरून जेवायला आई वडिलांनी शिकवले,
मात्र ते जेवण कसे अन किती खायचे हे तुम्ही सांगितले.

आई वडिलांनी संस्कार दिले,
ते संस्कार कसे टिकवायचे 
हे शिक्षकांनी शिकवले. 

जगाच्या स्पर्धेत कसे खेळावे हे तुम्ही शिकवले,
त्या स्पर्धेत कसे जिंकावे हे शिक्षकांनी शिकवले.

निःस्वार्थी भावनेने आपल्याकडचे सर्वच दिले, 
आमच्या स्वरुपात तुम्ही स्वतःला पाहिले. 

यशाची गुरुकिल्ली तुमच्यामुळे भेटली, 
शिक्षकदिनी तुमची आवर्जून आठवण आली.

राष्ट्राचा आधारस्तंभ खरेच आहात तुम्ही, 
नतमस्तक होताना तुमच्या चरणी सर धन्य झालो आम्ही.

कवी - 
स्वरुप शशिकांत सावंत 
भांडुप मुंबई 
9082194858

8 Love

16d1cc9bbcdb5c68b606da8b214dffb1

Swarup Sawant

शिक्षक राष्ट्राचा आधारस्तंभ 

जन्म दिला आईने तर नाव दिले बाबांनी,
शिक्षणाच्या प्रवाहात आणले ते फक्त शिक्षकांनी.

शिक्षणाचा मनी दिप जागवला,
जगण्याचा खरा अर्थ उमगला. 

हात धरून जेवायला आई वडिलांनी शिकवले,
मात्र ते जेवण कसे अन किती खायचे हे तुम्ही सांगितले.

आई वडिलांनी संस्कार दिले,
ते संस्कार कसे टिकवायचे 
हे शिक्षकांनी शिकवले. 

जगाच्या स्पर्धेत कसे खेळावे हे तुम्ही शिकवले,
त्या स्पर्धेत कसे जिंकावे हे शिक्षकांनी शिकवले.

निःस्वार्थी भावनेने आपल्याकडचे सर्वच दिले, 
आमच्या स्वरुपात तुम्ही स्वतःला पाहिले. 

यशाची गुरुकिल्ली तुमच्यामुळे भेटली, 
शिक्षकदिनी तुमची आवर्जून आठवण आली.

राष्ट्राचा आधारस्तंभ खरेच आहात तुम्ही, 
नतमस्तक होताना तुमच्या चरणी सर धन्य झालो आम्ही.

कवी - 
स्वरुप शशिकांत सावंत 
भांडुप मुंबई 
9082194858

10 Love

16d1cc9bbcdb5c68b606da8b214dffb1

Swarup Sawant

*लाखात एक - बहिण माझी* 

हे बंध रेशमाचे अलगद असे हे जुळले,
भाऊ बहिणीचे हे नाते अपुले नकळत फुलले.

नशिबवान समजतो स्वताला तु बहिण म्हणुन लाभली,
गोड आपल्या या नात्याची सुंदर वेल बहरली.

ना कसला स्वार्थ ना रुसवा फुगवा,
प्रेमाचे हे बंधन अपुले असे प्रेमाचा ठेवा. 

कितीही संकटे आली तरीही सामना तु करते,
तुझ्या याच वृत्तीमुळे तर ताई तुझ दुःख ही तुला घाबरते. 

धिट माझी बहिण तिचा मी शांत निरागस हा भाऊ, 
प्रेमाचे हे नाते अपुले निरंतर असेच ठेवू.

चुक कधि असली तरी बाजु तु घेतेस, 
गोड अस बोलून मला नेहमीच पाठिशी घालतेस.

संकटे आली तरीही तु सावली बनून राहते, 
माझ्यावरची संकटे आधी स्वतःवर घेते. 

जन्मोजन्मी बहिण म्हणुन तूच मला लाभावी,
आपल्या जन्मोजन्मीची साथ अशीच कायम रहावी.

रक्षाबंधनाच्या दिवशी मी वचन तुजला देतो, 
सावली बनून राहिन असा शब्द तुला देतो.

कवी - स्वरुप शशिकांत सावंत 
मोबाईल नंबर -9082194858 रक्षाबंधन विशेष

रक्षाबंधन विशेष

8 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile