Nojoto: Largest Storytelling Platform
jitendraraipure3901
  • 13Stories
  • 7Followers
  • 61Love
    0Views

Jitendra Raipure

  • Popular
  • Latest
  • Video
1c3cdae0bb09f00c94e28304ce3d87e0

Jitendra Raipure

नववर्षाची नवी पहाट 
मैत्रीने व्हावी सुरुवात new year

new year

1c3cdae0bb09f00c94e28304ce3d87e0

Jitendra Raipure

आईचा चष्मा 

     अभय आईवर खूप जोरात रागवत होता. "मागच्याच महिन्यात तुझा चष्मा बदलून दिला तरी आजही चष्मा फोडली. तुला नीट सांबाळता येत नाही का? "
     आई सर्वकाही चुपचाप ऐकून घेत होती. कारण तिलाच माहीत होतं, चष्मा त्याच्या मुलीच्या हातून खाली पडला होता. लहानशा मुलीवर रागावला असता तर आईला बरं  वाटलं नसतं. शेवटी ती आई होती त्याची ! अलक कथा

अलक कथा

1c3cdae0bb09f00c94e28304ce3d87e0

Jitendra Raipure

बाप 

वर्गात शिक्षकाने 'बाप' यावर निबंध लिहायला सांगितले. सर्व विद्यार्थी निबंध लिहायला लागले. एका मुलाने मात्र एकच वाक्य लिहून निबंध संपवले. 
"काय रे झाला का निबंध लिहून  ?",त्याकडे अंगुलीनिर्देश करत सराने प्रश्न केला. 
"होय सर ", तो उत्तरला. "मग वाच ".
तो वाचू लागला, मला माझा बाप माहीत नाही.हे ऐकून सर्व मुले हसू लागली. तो वेश्यावस्तीतून आलेला होता. 



जितेंद्र रायपुरे बाप ( अलक कथा)

बाप ( अलक कथा)

1c3cdae0bb09f00c94e28304ce3d87e0

Jitendra Raipure

बाप 

वर्गात शिक्षकाने 'बाप' यावर निबंध लिहायला सांगितले. सर्व विद्यार्थी निबंध लिहायला लागले. एका मुलाने मात्र एकच वाक्य लिहून निबंध संपवले. 
"काय रे झाला का निबंध लिहून  ?",त्याकडे अंगुलीनिर्देश करत सराने प्रश्न केला. 
"होय सर ", तो उत्तरला. "मग वाच ".
तो वाचू लागला, मला माझा बाप माहीत नाही.हे ऐकून सर्व मुले हसू लागली. तो वेश्यावस्तीतून आलेला होता. 
 बाप - अती लघु कथा

बाप - अती लघु कथा

1c3cdae0bb09f00c94e28304ce3d87e0

Jitendra Raipure

आरोप 

    ट्राफिक सिग्नलवर जसा लाल लाईट लागला तसी व्यापाऱ्याची गाडी थांबली. तितक्यात एक भीक मागणारी बाई आपल्या लहानशा लेकराला कडेवर घेऊन गाडीजवळ आली. " साहेब पाच रुपये द्या, दोन दिवस झाले लेकराच्या पोटात अन्नाचा कण नाही. " व्यापारी घाईत होता. खिशात हात घातले आणि जी नोट आली ती, बाईच्या हातावर टेकवून गाडी सुरू केली. 

    पाचवर दोन शुन्य पाहून ती दचकली. 
"ओ साहेब थांबा, ओ साहेब थांबा," ती जोराने ओरडू लागली. गाडी भुर्रकन निघून गेली. 
आता तिच्यावर मात्र भलतेच आरोप होणार होते. आरोप (अलक कथा)

आरोप (अलक कथा)

1c3cdae0bb09f00c94e28304ce3d87e0

Jitendra Raipure

शाळेचा ड्रेस (अलक कथा) 

आठ दिवसांपासून सरीता शाळेत आली 
नव्हती.वर्गशिक्षकाला रहावले नाही म्हणून ते सरीताच्या घराकडे विचारपूस करायला निघाले. 

शेजार्याकडून कळले की, ती सर्वा वेचायला गेली होती. सर्वा विकून येणाऱ्या पैशातून शाळेचा ड्रेस घेणार होती. एकही धड ड्रेस नाही म्हणून ती शाळेत येत नव्हती. अती लघु कथा

अती लघु कथा

1c3cdae0bb09f00c94e28304ce3d87e0

Jitendra Raipure

तुझ्या चकमकीत बंगल्याला करायचे काय 
जिथे माझ्या बाबासाहेबाचे एक फोटो नाय

1c3cdae0bb09f00c94e28304ce3d87e0

Jitendra Raipure

काव्यप्रकार द्रोण 

श्रावण 

 पळत सुटलो सैरा वैरा 
धावणाऱ्या ढगांच्या मागे 
 घन निळ्या आकाशात 
   श्रावणाच्या सरीत 
     न्हाऊन निघावे 
       झाडं झुडपं
        मनसोक्त 
        भिजलो 
          तसा 
           मी 
         
           

जितेंद्र काव्य प्रकार - द्रोण

काव्य प्रकार - द्रोण

1c3cdae0bb09f00c94e28304ce3d87e0

Jitendra Raipure

मीच माझा रक्षक 

लाख संकटे आली तरी हरायचे नाही गड्यांनो 
आले तसे जातील धीर सोडायचे नाही गड्यांनो 

न लढताही जिंकता येते बुद्धाच्या शांतीच्या मार्गाने 
जीव धोक्यात घालून बाहेर पडायचे नाही गड्यांनो 

प्रार्थनेच्या हातापरीस मदतीचे हात श्रेष्ठ आहे खरे 
जे धावून आले मदतीला विसरायचे नाही गड्यांनो 

ही वेळ आहे धैयाची आणि मनावरच्या संयमाची 
जिंकून दाखवू या संकटाला रडायचे नाही गड्यांनो 

मीच माझा रक्षक आणि रक्षक माझ्या देशाचाही
दारावर संकट उभे गाफील राहायचे नाही गड्यांनो कोरोना

कोरोना

1c3cdae0bb09f00c94e28304ce3d87e0

Jitendra Raipure

मायबाप 

अकाली पावसाने 
पीक पाण्यात भिजते,
चार दाणे नाही शिल्लक 
मरण गंजात शिजते।

जिथे तिथे पाणी पाणी 
पाणी शेतात साचते,
धान्य गेले सर्व काही 
मृत्यू समोर नाचते।

मायबाप ढोरावानी 
भर पावसात खपते ,
तमा नाही त्यांस काही 
काटा पायात खुपते ।

डोळे वटारून जशी 
विज नभात वाजते ,
अंगावर पडल्यावानी 
मनात काहूर माजते ।

वाहून जाते घरदार 
नुसता चिखल राहते ,
किती पुसले पुसले 
पाणी डोळ्यात वाहते ।

loader
Home
Explore
Events
Notification
Profile