Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser7187383984
  • 13Stories
  • 160Followers
  • 138Love
    0Views

कवी सु-निल पवार

जिल्हा नंदुरबार

  • Popular
  • Latest
  • Video
1ef25b52714d6d09d2bf5397b70454a4

कवी सु-निल पवार

*!! काळामेघ !!* 

तापते भुमी उष्णतेने ती
हृदयी भरून उद्वेग,
अधीर होऊनी दौडत येतो
घेउनी तो आवेग...

तहानलेल्या या धरतीला
बिलगतो काळा मेघ,
विझवितो विरहाची ज्वाला
खोडतो आडवी रेघ...

भेटाया धरतीला आतुरतो
धारण करतो वेग,
प्रेमाचा तो मलम वर्षवितो 
भरून काढतो भेग...

कवी सुनिल पवार,नवापूर
जि. नंदुरबार,
मो.८७९३२४८५५५
1ef25b52714d6d09d2bf5397b70454a4

कवी सु-निल पवार

स्पंदनप्रिया

6 Love

1ef25b52714d6d09d2bf5397b70454a4

कवी सु-निल पवार

मी बरसात म्हणून बरसलो
ती धरती म्हणून भिजली
मी आभाळ म्हणून कडाडलो
ती बिजली म्हणून चमकली....

मी वारा म्हणून धावलो
ती झुळूक म्हणून शहारली
मी उधळले तुफान हृदयाचे
ती सरीता म्हणून थरथरली...

मी खग नभात स्वछंद
ती ओल्या धरतीचा सुगंध
मी प्रीतीत तिच्या धुंद
ती ज्योत जळे जशी मंद...

मी सूर्य ताप चहू ओर
ती चंद्र शीतल स्वीकृती
मी जिंदगीचा तो नूर
ती जिंदादिल जागृती...

4 Love

1ef25b52714d6d09d2bf5397b70454a4

कवी सु-निल पवार

आंधळे प्रेम आणि डोळस प्रेम 
यात एक फरक असतो...

आंधळे प्रेम 
म्हणजे अपघात असतो
आणि डोळस प्रेम 
म्हणजे आत्महत्या असते

8 Love

1ef25b52714d6d09d2bf5397b70454a4

कवी सु-निल पवार

काय लिहावे काय लिहू नये
हे एक वेगळे बंधन आहे
माझ्या हृदयाला लाभलेले हे
हे एक वेगळे स्पंदन आहे...

मी आभासी हे जग नाही
मनाचे वेगळे रनकंदन आहे
मन माझे कस्तुरी मृग हे
शरीर वेगळे रक्तचंदन आहे...

शब्द माझे हे एकवचनी
मन हे घासलले चंदन आहे
तुझा त्या नफरतीला माझे
हृदयापासून हे वंदन आहे...

सु-नि-ल
8793248555

11 Love

1ef25b52714d6d09d2bf5397b70454a4

कवी सु-निल पवार

#OpenPoetry खोले पोल खोले घोटाला,नही पहने नोटो की माला.
जाये नही कभी मधूशाला,क्रांती की जो जलाये ज्वाला.
शब्द उसके हथियार...है वही तो सच्चा पत्रकार है...

नेता की चापलूसी करे,तोडी-पाणी से घर भरे
कलम को गुलाम करे...वो पत्रकार नही हो सकता...

हुवा कही भी अन्याय यहा,कलम तलवार सी चलती है.
उसके शब्दो के वार से,नेता की खुर्सी हिलती है.
जिसके हर शब्द को धार...है वही तो सच्चा पत्रकार है...

जो बिक जाये किस्सो मे,डाकू-चोरो के हिस्सो मे
कलम का जो सौदा करे...वो पत्रकार नही हो सकता...

देश पर जिकसो नाज है,दिलो पर जिसका राज है
शब्दो वह का सरताज है,भ्रष्ट दुष्ट का यमराज है
जो शब्दो का अधिकार है...वही तो सच्चा पत्रकार है...

कवी,पत्रकार तथा शिवशाहीर सुनिल पवार,नवापूर,
MO - 87932485555/जि.नंदुरबार(महाराष्ट्र)

13 Love

1ef25b52714d6d09d2bf5397b70454a4

कवी सु-निल पवार

जेव्हा काही माणसांना 
तुमच्यातलं चांगलं  सहन होत नाही,
तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं 
वाईट सांगायला सुरवात करतात.

13 Love

1ef25b52714d6d09d2bf5397b70454a4

कवी सु-निल पवार

तुला वाटतं की मी तुझ्यात गुंतायला नको,
मला वाटतं की ही गुंतागुंत सुटायला नको..
.
तुला वाटतं की मी प्रेमात फसायला नको,
मला वाटतं की तू प्रीतीत रुसायला नको..

तुला वाटतं की मी विरहात रडायला नको,
मला वाटतं की दुःखात पडायला नको...

तुला वाटत की मी अश्रुंचे बांध फोडायला नको,
मला वाटतं की तू मला एकट सोडायला नको...

हे प्रिया जे तुला वाटतं ते मला ही वाटतं,
हे प्रिया जे तुला पटत ते मला ही पटत...
सु-निल स्वलिखित सम्पूर्ण कविता

स्वलिखित सम्पूर्ण कविता

15 Love

1ef25b52714d6d09d2bf5397b70454a4

कवी सु-निल पवार

तुझ्याविना माझं जीवनच 
झालंय ब्लॅक अँड व्हाईट
बस आता करत बसतो 
माझ्या मनाशीच मी फाईट
तु म्हणालीस ना प्रिये कोन तू 
काय तुझा माझ्यावर राईट
त्या शब्दांनी दिले घाव मला
मग मीच कापली माझी साईट

5 Love

1ef25b52714d6d09d2bf5397b70454a4

कवी सु-निल पवार

जेव्हा पाहशील तू प्रिये
अश्रू माझ्या नयनात,
त्याक्षणी पडशील ग
तूच माझ्या प्रेमात...
सु-निल... स्वलिखित गाण्याचं पाहिलं कडवं

स्वलिखित गाण्याचं पाहिलं कडवं

11 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile