Nojoto: Largest Storytelling Platform
roshansagar1220
  • 22Stories
  • 53Followers
  • 89Love
    0Views

Roshan Sagar

  • Popular
  • Latest
  • Video
211a5b469779ed71435452addbc8e2ee

Roshan Sagar

आयुष्य नीरस नाही माझे
         सतत वाहते आहे
आठवड्यातील एक दिवस
     सह्याद्रीत हिंडतो आहे....

सह्याद्रीच्या जंगलासारखा 
      सतत विस्तारतो आहे..
सह्याद्रीच्या सहवासात राहून 
      आयुष्य शोधक झालो आहे....

आयुष्य साजरं करून प्रत्येक 
    दिवसाचा ठसा उमटवतो आहे..
आयुष्य जगण्यासाठी 
    सतत उत्तेजीत राहतो आहे.... #Stars&Me

11 Love

211a5b469779ed71435452addbc8e2ee

Roshan Sagar

भांडण झाल्यास गूळापेक्षाही लवकर विरघळणारा कदाचित माझ्या बाबतीत बाकीच्यांचं माहीत नव्हे पण तोंडावर कधी कौतुक केलं असता कधीच स्वीकार न करणारा सतत बरं बरं अजून... होकार देणारा लहानपणापासून शरीराने लठ्ठ असणारा प्रेमाने आम्ही जाड्या म्हणून ओळख असणाऱ्या तसं त्याचं नाव प्रसाद आहे पण कदाचित तो त्या नावाला न शोभणारा म्हणतात ना देवाला प्रसाद दिलाने देव प्रसन्न होत असतो पण त्यांच्या अपवाद जर या भावाचे कुठेही अगमन झाल्यास हा सतत वाकड्यात शिरणारा ह.. मग काय करून घेशील किंवा हमरीतुमरी बस या व्यतिरिक्त दुसरे काही नाही सुचणारा पैशांच्या बाबतीत तुंबळ पैसे उडवणारा पण समोरच्या नेही तेवढेच पैसे उडवावे अशी त्याची इच्छा असते पण काय करणार म्हणून कदाचित  तो मला पार्टी देत नसावा कारण आम्ही आईत खाऊ फुकट खाऊ असं सतत कानपिचक्या टोकणारा.... असो पण म्हणतात ना आयुष्यात अशी आपल्याला बरीच माणसे भेटत असतात त्याच्यातील क्वचितच असे व्यक्ती असतात की आपल्या हृदयात कायमचे जागा करणारे असतात त्यापैकी हा एक असावा कारण हसत खेळत कधीही त्याचं नाव इतर व्यक्तींना मी बोलून जातो तर बऱ्याच व्यक्ती मला विचारतात कि कोण आहे भाऊ हा प्रसाद बर्‍याचदा असं होतं माहित नाही का एवढं प्रेम त्या नावावर असावे की नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीवर कदाचित हृदयाने सांगितल्याप्रमाणे व्यक्तीवर असावे म्हणून देवाचे मी आभार मानतो की देवाने प्रसाद नावाचे व्यक्ती खूप जन्माला घातलेले असतील पण याच्यासारखा व्यक्ती मला भेटणे अशक्य होतं हा जणू मला भेटलेला हिराच असावा हा हिरा देवाने पाठवून २२ वर्षे झाली आहेत पण म्हणतात ना हिरा जसा घासत जाल तसा तो चमकत जातो तसाच याच्या बाबतीत "जसा जसा समजत जातो तसा तो खोलात शिरत जातो विस्तीर्ण तसाच हृदयातही जागा करतो  " आज त्याचे २३ वर्षात आगमन होत आहे म्हणून त्याला वाढदिवसाच्या सदिच्छा 💐🎂 b

6 Love

211a5b469779ed71435452addbc8e2ee

Roshan Sagar

कोरोना एक बहाना!!

     अभ्यासिका बंद ; कॉलेज बंद
क्लास बंद अभ्यास पण झाला बंद....

     कोरोना एक दहशत!!

जमावबंदी बंद ; कार्यक्रम बंद
     पार्ट्या बंद अरे मेस पण बंद....

    कोरोना एक आजार!!

खोकला बंद ; सर्दी बंद
     मास बांधून केलं तोंड बंद....

        कोरोना एक संपत्ती!!

सॅनेटरीच्या किमती ; मासच्या किमती
कोंबड्यांच्या किमती अर्थव्यवस्थेची भीती....

    कोरोना एक किडा!!

गर्दीत गेल्यावर होते पीडा
        देवाचा गाभारा उघडा..
देवाला कशा होतील पीडा
         तू तर होतास देव वेडा....
 
      कोरोना एक कांती!!

        हातात रुमाल बाळगा 
हात स्वच्छ धुवा ..
              देव वैगरे सोडा 
आता स्वता:ची काळजी घ्यावा!!!!
       
          ~ ®️Osh@n  k  S@g@®️ कोरोना

कोरोना

5 Love

211a5b469779ed71435452addbc8e2ee

Roshan Sagar

हरवलेल्या जगात मी
    शोधतोय माझ्या स्वप्नांना..
  आनंद विसरलो मित्र विसरलो
विसरलो रोजच्या होणाऱ्या पार्ट्यांना....

डोळे आज माझे
       चार भिंती पाहतय..
भविष्याची शहरे त्या
   नकाशात मात्र शोधतोय..

त्या खुर्चीत शरीर कसे
          कोंबून बसते..
मन माझे त्यालाही
     उंच स्वप्न दाखवते ...

मन माझे सतत अपेक्षा-----
      त्या गोष्टीची करते..
मन माझे येथील तुझे
     दिवस म्हणून सावरते....

अभ्यासिकेतल्या  दुनियेला
       मी माझे मानावे..
त्याच्यात मी कोठे आहे
      हे मात्र दररोज शोधावे....

हरवलेल्या जगात मी 
    माझे स्वतः शोधावे!!!!

  ~ ®️Osh@n  k  S@g@®️ हरवलेले जग

हरवलेले जग

0 Love

211a5b469779ed71435452addbc8e2ee

Roshan Sagar

प्रेम कुणावर करावं.
         तिच्या गाडीवर करावं
की घालून येणाऱ्या 
          चपलावर करावं....

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्याकडून मागितलेल्या
    पुस्तकावर करावं
की तिने वाचले म्हणून
        मी वाचावं...

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या चष्म्यावर करावं
  की तिने घातलेल्या डोळ्यांच्या
        संवादावर कराव...

‌‌  प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या हसण्यावर करावं
                 की
आम्ही एकमेकांकडे पाहून हसावं
     म्हणून प्रेम करावं....

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम चहाच्या वेळेवर करावं
               की
ती येते म्हणून मी चहा प्यावं....

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या अभ्यासावर करावं
       की तिच्या हेवा वाटावं
म्हणून मी अभ्यास करावं....

  प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या आसपासच्या 
       गोष्टींवर झालं..
प्रेम तिच्यावर करायचं
        राहूनच गेलं....
  ~ ®️Osh@n  k  S@g@®️

3 Love

211a5b469779ed71435452addbc8e2ee

Roshan Sagar

प्रेम कुणावर करावं.
         तिच्या गाडीवर करावं
की घालून येणाऱ्या 
          पादत्राणे वर करावं....

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्याकडून मागितलेल्या
    पुस्तकावर करावं
की तिने वाचले म्हणून
        मी वाचावं...

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या चष्म्यावर करावं
  की तिने घातलेल्या डोळ्यांच्या
        संवादावर कराव...

‌‌  प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या हसण्यावर करावं
                 की
आम्ही एकमेकांकडे पाहून हसावं
     म्हणून प्रेम करावं....

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम चहाच्या वेळेवर करावं
               की
ती येते म्हणून मी चहा प्यावं....

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या अभ्यासावर करावं
       की तिच्या हेवा वाटावं
म्हणून मी अभ्यास करावं....

  प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या आसपासच्या 
       गोष्टींवर झालं..
प्रेम तिच्यावर करायचं
        राहूनच गेलं....
  ~ बाकी राहिले प्रेम

बाकी राहिले प्रेम

5 Love

211a5b469779ed71435452addbc8e2ee

Roshan Sagar

प्रेम कुणावर करावं.
         तिच्या गाडीवर करावं
की घालून येणाऱ्या 
          पादत्राणे वर करावं....

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्याकडून मागितलेल्या
    पुस्तकावर करावं
की तिने वाचले म्हणून
        मी वाचावं...

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या चष्म्यावर करावं
  की तिने घातलेल्या डोळ्यांच्या
        संवादावर कराव...

‌‌  प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या हसण्यावर करावं
                 की
आम्ही एकमेकांकडे पाहून हसावं
     म्हणून प्रेम करावं....

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम चहाच्या वेळेवर करावं
               की
ती येते म्हणून मी चहा प्यावं....

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या अभ्यासावर करावं
       की तिच्या हेवा वाटावं
म्हणून मी अभ्यास करावं....

  प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या आसपासच्या 
       गोष्टींवर झालं..
प्रेम तिच्यावर करायचं
        राहूनच गेलं....
  ~ ®️Osh@n  k  S@g@®️ प्रेम करायचं राहुन गेलं

प्रेम करायचं राहुन गेलं

5 Love

211a5b469779ed71435452addbc8e2ee

Roshan Sagar

दिसंबर का महीना  आज सकाळी सकाळी येणाऱ्या
  तो कागद सुद्धा निलाजरेपणाने येत होता ...
         कारण दररोज नवीन काहीतरी
असे आपण दुसऱ्यांना सुचवू सांगू या आदराने 
          तो घरात   entry करत होता......

आज या देशांमध्ये पुरुष प्रधान
          संस्कृती जगाला लाजवणारी
अन् निर्धास्त बेशरम करणारी..
              त्या कागदाला सुद्धा टोचणारी
ती बातमी म्हणजे बलात्कार व पेटवून देणे.....

अशा हरामी आणि पापी वृत्ती 
असणाऱ्या वृत्तपत्रात जागा शोधणाऱ्या
     त्यांना योग्य जागा मला वाटतं नरकात असावी....

आजीची गोष्ट.... देव अग्निपरीक्षा घेतो म्हणे
                    उकळत्या तेलात उतरवतो. बसवतो
                   आणि त्याच्या परीने शिक्षा देत असतो
                             त्यांची जागा तिथे योग्यच असेल.....

पण त्या देवापेक्षाही महान आमची लोकशाही
    आमची राज्यघटना त्यात असणारे कलम
म्हणे त्यांना जगण्याचा अधिकार
नीच पणा करणारे मानवाधिकार वाले .....

           आस्तिक देश कधी नास्तिक झाला म्हणे 
      हा देश देवापेक्षाही महान केव्हापासून झाला म्हणे .....

बस झाला आता दररोज
                    मेणबत्त्या घेणे..
आता सर्वांनी एकत्र येणे
       या पापी वृत्ती वर कडक कायदाच करणे...

 अशा या निष्कलंक लोकांना  
          फाशी तर झालीच पाहिजे....
आक्रोश हा एकाचा नसून जनतेचा आहे..
     तात्काळ शिक्षा झालीच पाहिजे........

              ~ ®️Osh@n  k  S@g@®️ बलात्कार

बलात्कार

0 Love

211a5b469779ed71435452addbc8e2ee

Roshan Sagar

रविवारची सुट्टी बघावं
      तिला मी पुसावं
निवांत असेल तर निघावं
    गाडीवर मागे बसावं
हात तिच्या खांद्यावर ठेवावं
          मानेनं पुढे जाऊन बोलावं
     मानेंन थकून जावं
तिच्या खांद्याचा आसरा घ्यावं
       अशा गप्पा रंगावं
रंगलेल्या गप्पांनी दूर निघून जावं
  दूर कुठेतरी जाऊन बसावं
बसलेल्या शरीराने थकून जावं
     ‌ मांडीचा आसरा तिच्यात शोधावं
    आणि मी निजून जावं
वामकुक्षीत वेळ कुठे जावं
             हळूच तिने मला सांगावं
            जरावेळ तू बघावं
    ते पाहून मी  थकावं
             घाईघाईत निघावं
संध्याकाळपर्यंत शहरात येऊन टेकावं
         मधेच आईचा फोन यावं
मला जेवलास काय विचारावं
          मी हो म्हणून घाईत ठेवून द्यावं
दुसऱ्या दिवशी आईला आठवावं
       तिच्याशीच निवांत बोलावं
असा कायमचा रविवारचा 
               दिवस माझा निघावं..
अशा एखाद्या रविवारी
          तुम्ही पण निवांत निघावं....              

~ ®️Osh@n  k  S@g@®️ रविवार

रविवार

5 Love

211a5b469779ed71435452addbc8e2ee

Roshan Sagar

#Pehlealfaaz हरवलेल्या न दिसणाऱ्या
     व्यक्तीला आज आठवावं..
उरलेल्या न बोललेल्या
         गोष्टी तिच्याशी करावं....

नाचावं नटावं की
        गेल्यावर रडावं..
दिसलीस तर आनंदाने
       तिच्याशी हसावं....

 नखशिखांत व हृदयाच्या
         ठोक्यांना ओळखावं..
  बघताच जाऊन सुटावं
        अंगावर मिठी मारावं....

  कुशीत घट्ट पकडावं
    अंगावर निखारे निघावं..
  माझं मनातलं प्रेम 
     तिच्यापर्यंत पोहोचावं....

पोहोचल्यात जरी भावना
      हृदयाने हृदयाशी विचारावं..
आता तरी सांगावं म्हणे
     मी प्रेम करतो खरंच तुझ्यावं ....

 ते तिच्या कानावर
       पडताचं अंग चोरावं..
 अन् मारलेल्या मिठीने
       अजून घट्ट घट्ट पकडावं ....

    हे माझं नव्हे हे 
            तिचं अन् त्याचं प्रेम..
  बघून वाटतंय मला
        माझं पण होईल सेम सेम.... love

4 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile