Nojoto: Largest Storytelling Platform
praju6971592769590
  • 33Stories
  • 139Followers
  • 322Love
    340Views

praju

  • Popular
  • Latest
  • Video
26f6ffd2a54b7491dbc0f17773a29fbe

praju

काही नातं नसतांना जे नातं निर्माण होते 
ती मैत्री असते ❤️

©praju
  #Bestfriendsday
26f6ffd2a54b7491dbc0f17773a29fbe

praju

प्रेमात कोण मन तोडत, मैत्रीत कोण विश्वास तोडत, जीवन जागाव ते गुलाबा कडून शिकाव, जो स्वतः तुटून दोन मनांना एकत्र करतो...

©praju
  #Prem #maitri
26f6ffd2a54b7491dbc0f17773a29fbe

praju

Book quotes कविता करुनी मज 
मिळे समाधान
करी लेखणी ती माझी
गुजगोष्टी छान..

©praju

26f6ffd2a54b7491dbc0f17773a29fbe

praju

अजूनही मी वाट पाहत आहे तुझी

तु मला तुझा असणारा होकार कळवशील.....!

©praju #touchthesky
26f6ffd2a54b7491dbc0f17773a29fbe

praju

प्रेमात तुही पडलीस तोही पडला

प्रेमात तुही रडलीस तोही रडला

दोघांच्या ईच्छा पूर्ण करण्यासाठी

आकाशाने जमीनीवर एक तारा सोडला

©praju #sunkissed
26f6ffd2a54b7491dbc0f17773a29fbe

praju

#lost
26f6ffd2a54b7491dbc0f17773a29fbe

praju

सजते ती ....
सौंदर्या साठी नाही,
तुझ्या प्रेमासाठी...

हसते ती..
स्वतःसाठी नाही,
तुला हसविण्यासाठी...

रडते ती... 
दुःखासाठी नाही,
तुला दुखावलेल्या क्षणासाठी....

धडते ती...
स्वतःसाठी नाही रे,
फक्त तुझ्या सोबत जगण्यासाठी...

©praju #SAD
26f6ffd2a54b7491dbc0f17773a29fbe

praju

प्रेमा वर कविता करायला
कुणावर तरी प्रेम कराव लागत ,
त्याला सांगितले नसले तरी
मनातून प्रेम अनुभवाव लागते.

त्याला भेटण्याची उत्कटता
त्याच्या नकळत अनुभवावी लागते,
तो 'हो' म्हणेल की 'नाही'
या विचारात रात्र घालवावी लागते.

त्याच्या साठी गुलाब तोडताना
काटयानी घायाळ व्हावे लागते,
इश्काची आग त्याच्या नकळत
त्याच्या ह्रदयात ही पेटवावी लागते.

प्रेम आपले त्याच्यावर असले
तरी त्याचे दुसर्‍यावर असू शकते
आणि जर तसे झाले तर 
विरह गीत लीहायची तयारी असावी लागते.

©praju #allalone
26f6ffd2a54b7491dbc0f17773a29fbe

praju

आयुष्यात माझ्या जेव्हा तो आला

परिकथेच्या राजकुमारासम मज तो भासला


माझ्या ध्यानीमनी सदैव तोच असे

स्वप्नातही मग त्याचा भास होत असे


कधी होईल तो माझा असे नेहमीच वाटत असे

परी मनातल्या ह्या भावना मी नेहमीच लपवत असे


स्वप्नातच त्याला मग मी वरले 

सात जन्माच्या बेड्यात त्याला मी अडकवले


सुरू झाला स्वप्नांतच मग संसाराचा खेळ

जागेपणीही स्वप्न पाहण्यात सरू लागली वेळ


स्वप्नातच बांधला मी आम्हा दोघांसाठी बंगला

रोजच्या ट्रॅफिकपासून दूर वनात निवांत चांगला


होते आमच्या बंगल्याला सुंदरसे अंगण

घराभोवती शोभे सुंदर जास्वंदीचे कुंपण


अंगणातल्या त्या तुळशीला घालत असे मी पाणी

आंब्यावरती कोकीळ गात असे मंजुळ गाणी


स्वप्नातच त्याने धरला माझा हात

उघडले नेत्र जेव्हा आठवुनी स्वप्न हसले गालात

©praju

26f6ffd2a54b7491dbc0f17773a29fbe

praju

मन पाखरु पाखरु कधी इथं कधी तिथे!!!
जवळ असले तरी दूर उडत असते 
कधी हसत असते तर कधी फसत असते, 
आपले असूनही ते आपले नसते ,
मन पाखरु पाखरु कधी इथं कधी तिथे!
कधी आनंदी असते कधी उदास असते, 
कधी सवंगडी तर कधी वैरीही बनते 
मन जगाचे मालकही बनते ,
आतल्या ईच्छांचे केव्हा दासही बनते,
मन पाखरु पाखरु कधी इथं कधी तिथे!
मन घाबरट कधी धीटही असे ,
तनही या मनाच्या तालावर नाचे,
याच्यावर तुमचे व्यक्तिमत्व ठरे,
मन पाखरु पाखरु कधी इथं कधी तिथे!
मनाला लगाम घालणे सगळ्यांनाच जमत नसते,
कारण ही कला एखाद्यालाच अवगत असते ,
कारण मनाला आवर घालणे फार त्रासदायक असते,
 मन पाखरु पाखरु कधी इथं कधी तिथे!
मनाचा लगाम ज्या हाती असे ,
यशाचा शुभ्र वारु त्याच्या दारी दिसे ,
कारण मन पाखरु पाखरु कधी इथं कधी तिथे!!!

©praju #Butterfly
loader
Home
Explore
Events
Notification
Profile