Nojoto: Largest Storytelling Platform
bharati2sawant4357
  • 17Stories
  • 66Followers
  • 70Love
    0Views

Bharati2 Sawant

  • Popular
  • Latest
  • Video
36b0fe65de08b62a4a04036eb615e1ed

Bharati2 Sawant

तुझ्या डोळ्यांत वाचलंय
मूकपणाचं हे दु:ख
नको मित्रा आसू ढाळु
मिळेल तुलाही सुख

सौ.भारती सावंत

36b0fe65de08b62a4a04036eb615e1ed

Bharati2 Sawant

स्पर्धेसाठी

कलाविष्कार


मन उधाण वाऱ्याचे
गाते गूज प्रेमाचे 
दोघांनीही सावरायचे
मोती पिकवू घामाचे


सौ.भारती सावंत
मुंबई

36b0fe65de08b62a4a04036eb615e1ed

Bharati2 Sawant

धवलपुष्प तू प्रतिक त्यागाचे
शांति आणि निखळ प्रेमाचे
सत्वशील फूल तू चारित्र्याचे
कष्टकऱ्यांच्या  घामाचे

सौ.भारती सावंत

36b0fe65de08b62a4a04036eb615e1ed

Bharati2 Sawant

2 Years of Nojoto फूल श्वेत जास्वंदीचे
शांति त्यागाचे प्रतिक
वाहूनी ईश्वरचरणी
टेकू भक्तीभावाने मस्तक

सौ.भारती सावंत

36b0fe65de08b62a4a04036eb615e1ed

Bharati2 Sawant

किती सुंदर ही पुष्पं
देवाजीचं हे आम्हां देणं
घ्यावा आस्वाद सौंदर्याचा
लेवूनि नक्षत्रांचं लेणं

सौ.भारती सावंत

36b0fe65de08b62a4a04036eb615e1ed

Bharati2 Sawant

2 Years of Nojoto अशीच अल्लड अवखळ मी
राहिले सदा हसतखेळत
आठवण त्या क्षणांची सख्या
आणते जीवनात रंगत

36b0fe65de08b62a4a04036eb615e1ed

Bharati2 Sawant

अशीच अवखळ स्वच्छंद मी
राहिले तुझ्यासोबत
आठवण त्या क्षणांची
आणते जीवनात रंगत

सौ.भारती सावंत

36b0fe65de08b62a4a04036eb615e1ed

Bharati2 Sawant

काय अपराध मुक्या जीवांचा
नेले ओढून त्या प्रवाहाने
दावणीला घट्ट होते बांधले
गळफास केले या पर्जन्याने

सौ.भारती सावंत

36b0fe65de08b62a4a04036eb615e1ed

Bharati2 Sawant

का एकाकी हा चिमणा जीव
सगिनीचा का सुटली साथ
पडला दैवाचा का घाला अन्
सोडला सख्याचा घट्ट हात

सौ.भारती सावंत

36b0fe65de08b62a4a04036eb615e1ed

Bharati2 Sawant

एकटीच चिमुकली
विसावली फांदीवर
कधी येईल गं सखा
मन नाही थाऱ्यावर

सौ.भारती सावंत

loader
Home
Explore
Events
Notification
Profile