Nojoto: Largest Storytelling Platform
pallavipawar1549
  • 17Stories
  • 1Followers
  • 91Love
    396Views

pallavi pawar

  • Popular
  • Latest
  • Video
475b3c5e6f1f6944152f8588eae1e8d9

pallavi pawar

आज माझी मुलगी मोठी झाली...!! 
दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतलं होतं पहिल्यांदा, 
लाडकी लेक माझी, आनंदाने सांगीतलं सगळ्यांना... 
आज त्या हातांची झोळी लांब झाली, 
माझी मुलगी मोठी झाली...!! 
बोट धरून चालायची लाडकी लेक माझी, 
वाट बघत बाबाची, उंबरठ्यावर थांबायची... 
त्याची आठवण आज खूप आली, 
माझी मुलगी मोठी झाली...!! 
सायकलवर पुढे बसुन जायची शाळेला, 
म्हणायची, बाबा याल ना मला परत न्यायला? 
आज ती सायकल दिसेनाशी झाली, 
माझी मुलगी मोठी झाली...!! 
माया खूप लावायची, 
म्हणायची, मी आहे ना तुमची आई, 
आजारी पडल्यावर मात्र कुशीत शांत निजून जाई...
ती कुशीच आज हरवली, 
माझी मुलगी मोठी झाली...!! 
खूप शिकायची स्वप्नं पहायची, 
हुशार माझी लेक छान छान खाऊही घालायची... 
आज ती चव कुठे मागे राहिली, 
माझी मुलगी मोठी झाली...!! 
आज तीचं लग्न झालं, 
ती तिच्या संसारात सुखी आहे 
कुठे तरी मनाच्या कोपर्‍यात मात्र, 
बाबाची आठवण तशीच आहे... 
तिच्या संसाराची घडी पहायचीच राहिली, 
आज माझी मुलगी, माझी लेक मोठी झाली...!!
पल्लवी पवार दंडवते

©pallavi pawar #Papa
475b3c5e6f1f6944152f8588eae1e8d9

pallavi pawar

आज माझी मुलगी मोठी झाली...!! 
दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतलं होतं पहिल्यांदा, 
लाडकी लेक माझी, आनंदाने सांगीतलं सगळ्यांना... 
आज त्या हातांची झोळी लांब झाली, 
माझी मुलगी मोठी झाली...!! 
बोट धरून चालायची लाडकी लेक माझी, 
वाट बघत बाबाची, उंबरठ्यावर थांबायची... 
त्याची आठवण आज खूप आली, 
माझी मुलगी मोठी झाली...!! 
सायकलवर पुढे बसुन जायची शाळेला, 
म्हणायची, बाबा याल ना मला परत न्यायला? 
आज ती सायकल दिसेनाशी झाली, 
माझी मुलगी मोठी झाली...!! 
माया खूप लावायची, 
म्हणायची, मी आहे ना तुमची आई, 
आजारी पडल्यावर मात्र कुशीत शांत निजून जाई...
ती कुशीच आज हरवली, 
माझी मुलगी मोठी झाली...!! 
खूप शिकायची स्वप्नं पहायची, 
हुशार माझी लेक छान छान खाऊही घालायची... 
आज ती चव कुठे मागे राहिली, 
माझी मुलगी मोठी झाली...!! 
आज तीचं लग्न झालं, 
ती तिच्या संसारात सुखी आहे 
कुठे तरी मनाच्या कोपर्‍यात मात्र, 
बाबाची आठवण तशीच आहे... 
तिच्या संसाराची घडी पहायचीच राहिली, 
आज माझी मुलगी, माझी लेक मोठी झाली...!!
पल्लवी पवार दंडवते

©pallavi pawar #baba
475b3c5e6f1f6944152f8588eae1e8d9

pallavi pawar

अर्थपुर्ण पूजा घडावी 
तुझ्याचसाठी मनोभावे व्हावी, 
प्रार्थनेत माझ्या तुझे नाव असावे
जन्मोजन्मीचे असे नाते रहावे...!!

©pallavi pawar #vatapaurnima
475b3c5e6f1f6944152f8588eae1e8d9

pallavi pawar

बंध असे प्रेमाचे
नाते दोन मनांचे,
आयुष्यभराची सोबत 
आणि क्षण सुख दुःखांचे...!!

तुझ्या सोबत असण्याने मिळे परिपूर्णता,
एकमेकांचे होऊन राहिलो 
बहरावी नात्याची नावीन्यता...!!

एक तप पूर्ण होऊनी आनंदी दिवस हा, 
रोज पाहू नव्याने बहरणारा परिवार हा...!! 

कधी डोळ्यांनी व्यक्त केल्या अबोल त्या भावना, 
प्रेमाची पूर्तता, लाभले शौर्य आणि प्रिशा...!!

परिपूर्ण झाली बारा वर्षे 
ना राहिलो कधी एकटे, 
एकमेकांचे होऊन राहू 
असे भाग्य मज लाभले...!! 

...✍पल्लवी पवार दंडवते

©pallavi pawar #familylove
475b3c5e6f1f6944152f8588eae1e8d9

pallavi pawar

#MothersDay 

#NewLife
475b3c5e6f1f6944152f8588eae1e8d9

pallavi pawar

#Papa 

#NewLife
475b3c5e6f1f6944152f8588eae1e8d9

pallavi pawar

#daughterlove #loveforfather #BestDad 

#BestDad
475b3c5e6f1f6944152f8588eae1e8d9

pallavi pawar

#love

#LOVEGUITAR

76 Views

475b3c5e6f1f6944152f8588eae1e8d9

pallavi pawar

#ganpatibappamorya 

#GaneshChaturthi
475b3c5e6f1f6944152f8588eae1e8d9

pallavi pawar

#ganpatibappamorya 

#GaneshChaturthi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile