Nojoto: Largest Storytelling Platform
dilipdeshpande4473
  • 51Stories
  • 17Followers
  • 354Love
    0Views

Dilip Deshpande

  • Popular
  • Latest
  • Video
49643a851814a4f3626015c8c01cfedf

Dilip Deshpande

#KargilVijayDiwas रात कुसुम्बी...!!

 झोपल्यावरी  गाली  हसते,  
 सखे, अबोली  लाली असते ।

किती..! ऊसासे  हळूच   घेई,
कितिक  मनाची खोली असते ?

कसे   धपापे  ऊर   सये  ग,
सौख्य कुणाच्या भाली असते...!

वस्त्र  कसे  हे निलाजरे   बघ,
नियत ऊताविळ झाली असते ।

आता  ऊत्सवी मूर्त  होय तू      
रात कुसुम्बी  ओली   असते...!!

             ***दिलीप चारठाणकर
                   सेलू [ परभणी ]
                   संपर्क:-9130658430 #kargilvijaydiwas
49643a851814a4f3626015c8c01cfedf

Dilip Deshpande

ये धरती का हुनर.....!!

                        'कशिश'

ये   धरती  का   हुनर , ऊजड़  के  फूलती  है।
काली-अंधेरी रातभी,उजालेके लिए ढलती है।

ये   गोताखोर   डुबकियाँ   लगाते    दर्यामे। 
 तकदीर  कभी-कभार,  उनकी   खुलती  है।

जिंदगी  खुलकर   जियो  मेरे  हसीन  दोस्तो।
वक्त निकल जाये तो, घड़ी भी हाथ मलती है।

जिंदगी   में  दीदार  करो,कुछ  हसीं  पाओंगे।
एक झलक दे कर ,माशुका  क्यों  छलती है।

हंसो-हंसाओं तो  जिंदगी-ए-सफर कट जायें।
मजेसे जिओ यारो मौत-ए-कफ़न टलती है।

'कशिश' की जिंदगी तो एक हवा का झोका है।
ये खुशमीजाशी से हर मौत  दिल मे हलती है।

                           'कशिश'
                   ***दिलीप चारठाणकर 
                         परभणी 
                         संपर्क:-९१३०६५८४३० #dilbechara
49643a851814a4f3626015c8c01cfedf

Dilip Deshpande

*************************************
             ।। आषाढी वारीचे अभंग ।।
**************************************
                      ।। एकोणविस ।।
        
          आला पर्वकाळ । आषाढी ही येई
          मन  तृप्त   होई । पंढरीत ।।

          गर्दी ही दिसेना ।  मनी   हुरहूर
          उभे     दूर-दूर  । भक्तजन ।।

          काय  देवा वेळ। रोगराई आली
          पारखी ही झाली। माय कशी?

          आता सांभाळावे । देवा लेकरांना
          उगा     मरतांना । बघवेना ।।

          आरोग्य द्यावे बा । अगा पांडुरंगा
          होई      संतसंगा। असे  करी ।।

          चंद्रभागा   तीर । वाटे  हे वैराण
          पांडुरंगा   आन । आरोग्य दे ।।

          अशक्य नाही बा। देवा तुला काही
          आभाळ तू  होई । लेकरांना ।।

          किती आठवावे । तुझे ते दृष्टांत
          आता हा आकांत।थांबवावा।।

          गोरोबा काकांच्या।धावलास हाके
          ब्रिदालाही  राखे । जीव परते ।।

          दामाजी   संताने । भांडार फोडता
          परतावा     देता । धावलास ।।

          इंद्रायणी  डोही । अभंग बुडाले
          चरण    धावले । तारावया ।।

          बाल  नामदेवा । जेवण घेतांना
          तुला धावतांना । बघितले ।।

          आज तुझे भक्त । रोगाने मरती
          अशी कशी नीती। साह्य करी।।

          हात जोडोनिया।मागणे मागतो 
          चरणी लागतो । रक्षावया ।।

          श्रीदास म्हणतो । पुढल्या वारीला
          जीवंत आम्हाला। ठेवी बापा ।।
            
।। पांडुरंग ।। पांडुरंग ।। पांडुरंग ।। पांडुरंग ।।
।। पांडुरंग ।। पांडुरंग ।। पांडुरंग ।। पांडुरंग ।।      **************************************
                    ।।  श्रीदास ।।
            ***दिलीप चारठाणकर
                 परभणी
                 संपर्क:-९१३०६५८४३०
                 आषाढ शु.१०,मंगळवार
                 दिनांक:-३० जून २०२०
************************************** #ChineseAppsBan
49643a851814a4f3626015c8c01cfedf

Dilip Deshpande

अंतरंगी  आता । पांडुरंगी भाव
         आत्म्याची ही नाव। पार लागे।।

         आली एकादशी । दर्शनाची आस
          तृप्त होई खास । आषाढीस।।

          थोडी तरी द्यावी । चरणाशी जागा
          नित्य चंद्रभागा । स्नान घडे ।।

          आता गाव माझे।पंढरी हे व्हावे
          गाभारी राहावे । नित्य देवा।।

           झाडीन-पुशीन। तुझा मी देव्हारा
           निर्माल्याचा भारा। वाहीन रे ।।

           आता नको देवा । दूर मज लोटू
           पुन्हा-पुन्हा भेटू । दोघेजन ।।

           श्रीदास  म्हणतो। सुख निरंतर
           ओसंडे    अंतर । तुझ्यामुळे ।।
         
।। पांडुरंग ।। पांडुरंग ।। पांडुरंग ।। पांडुरंग ।।
।। पांडुरंग ।। पांडुरंग ।। पांडुरंग ।। पांडुरंग ।।      **************************************
                    ।।  श्रीदास ।।
            ***दिलीप चारठाणकर
                 परभणी
                 संपर्क:-९१३०६५८४३०
                 आषाढ शु.९,सोमवार
                 दिनांक:-२९ जून २०२०
************************************** #HopeMessage
49643a851814a4f3626015c8c01cfedf

Dilip Deshpande

*****************************
   ।। आषाढी वारीचे अभंग ।।
******************************
      ।। अठरा ।।
    
         पंढरीची   वारी । मनात दाटली
         भक्ती ही साठली। अंतरात ।।

         नाम तुझे देवा ।क्षणोक्षणी तारी
         संगती उभारी । मिळतसे ।।

         भजन-कीर्तन । चाले दिनभरी
         अखंड अंतरी । तुझे रुप ।।

         उपास-तापास । तरी नव्हे ग्लानी
         अभंगाची वाणी। मुखी नित्य ।।

         झोपता   राहुटी। घुत्कार विठ्ठल
         स्वप्नही  विठ्ठल । निद्रेमध्ये ।। #HopeMessage
49643a851814a4f3626015c8c01cfedf

Dilip Deshpande

**************************************
             ।। आषाढी वारीचे अभंग ।।
**************************************
                      ।। अकरा ।।
       
          रामकृष्णहरी  । मंत्र देती गुरु
          बाबाजी श्रीहरु। चैतन्याचे ।।

          कर्ता राम होई। कृष्ण कर्म जाण
          क्रियापद मान। हरी रुप ।।

          कर्त्याचा विवेक। कर्माचे कर्तृत्त्व
          हरी व्यक्तिमत्त्व। सर्वव्यापी ।।

          तिन्हीरुपी व्याप्त।विठ्ठल स्वरुप
          जीवाचा तो धूप। तुका जाळी।।

          प्रात:काळी दिला। दृष्टांते हा मंत्र
          नामरुपी      तंत्र । सांगितले।।

          पालटले    रुप । प्राप्त झाली वाणी
          परमानंद  मनी । उजळला ।।

          नूर   पालटला । ह्दयी आनंद
          पांडुरंग     छंद। अभंगात ।।

          मन तृप्त झाले ।चैतन्य रुपात
          प्रभू तो अंकित। सेवारत ।।

          क्षणोक्षणी तेव्हा । स्त्रवली लेखनी
          गाथेच्या  रुपानी। मार्ग दावी।।
          
           श्रीदास  म्हणतो । तुका कल्पतरु
           गाथेचे   ते करु । पारायण ।।
        
**************************************
                         ।।  श्रीदास ।।
                 ***दिलीप चारठाणकर
                       परभणी
                       संपर्क:-९१३०६५८४३०
                       आषाढ शु.१,सोमवार
                       दिनांक:-२२ जून २०२०
************************************** #sunrays
49643a851814a4f3626015c8c01cfedf

Dilip Deshpande

**************************************
             ।। आषाढी वारीचे अभंग ।।
**************************************
                      ।। दहा ।।
       
        आज आमावस्या । ग्रहणाचा काळ
         पुण्य    पर्वकाळ । नामासाठी ।।

         अंतराळ  योग । आला हा जुळून
         अंतर      मळून । नका घेऊ ।।

         अनिष्ट   अनीती। नका चित्ती धरु
          धरा नि भास्करु। चंद्र मध्ये ।।

          अनादी काळाची । अंतराळ कला
          खुळ्या कल्पनेला। नको थारा।।

           भगवंत      आहे । जळी,स्थळी,काष्ठी
            त्यानेच ही सृष्टी । निर्मीयली ।।

            म्हणून या काळी । त्याचेच चिंतन
            करुया      मनन  । नम्र होऊ।।

            चला     शब्दवारी। अनुभवू अंतरी
            चैतन्याचे     दारी । स्थिराऊ या।।

            उपदेश      नको । नको कोणा सल्ला
            आतील  उर्मिला । व्यक्त करु ।।

            काव्य थोडे झाले । नका ते मातऊ
            चिंतनी    वाढवू  । संतजन ।।
           
             श्रीदास  म्हणतो । वैचारिक स्नान
             कैवल्याचे     धन। आपोआप।।
        
**************************************
                         ।।  श्रीदास ।।
                 ***दिलीप चारठाणकर
                       परभणी
                       संपर्क:-९१३०६५८४३०
                       जेष्ठ आमावस्या,रविवार
                       दिनांक:-२१ जून २०२०
************************************** #solace
49643a851814a4f3626015c8c01cfedf

Dilip Deshpande

**************************************
       ।। आषाढी वारीचे अभंग ।।
**************************************
                   ।। आठ ।।

      जीव ही घोंगडी। आत्मा तिची दशी
      बैसकारे  अशी । अंथरली ।।

      अहंकार   मेंढी। लोभ  तिचे  केस
       त्यात भावनेस। गुंतविले ।।

       मद तो कापला । क्रोध तो विनला
       वासनेचा केला । वक्राकार ।।

       आसक्तीची नक्षी। स्वार्थाचा तो फासा
       नामाचा  आरसा। नित्य तोंडी।।

       जागृती  साठी । अंगी ही टोचणी
       घोंगडीची आणी। मार्ग दावी।।

       असा विणलेला। देह अंथरला
       तुझ्या रे स्पर्शाला। आसुसला।।

        नाम सुधारस । प्राशी वारंवार
        अमृताची धार ।जिव्हेवरी।।

        आता येई देवा। सोड तो गाभारा
        कृपेचा तो वारा। घाली मज।।

        ये  रे  देवराया । देई आलिंगण
        शुद्ध कण-कण। माझा करी।।

        श्रीदास म्हणतो। चरणांची दाशी
        बहुपुण्य राशी । घोंगडी ही।।
**************************************
                         ।।  श्रीदास ।।
                 ***दिलीप चारठाणकर
                       परभणी
                       संपर्क:-९१३०६५८४३०
                       जेष्ठ कृ-१३,शुक्रवार
                       दिनांक:-१९जून २०२०
************************************** #SunSet
49643a851814a4f3626015c8c01cfedf

Dilip Deshpande

।। आषाढी वारीचे अभंग ।।

                   ।। सात ।।

       वारी  शिकविते । प्रेमभाव  धरा
       आत्मगंधी झरा । स्त्रवू द्यावा ।।

       कर्म  ऐसे  करु । ज्याने होय तृप्ती
       जागृती-सुषुप्ती। शांती मिळे।।

       बुद्धिमान जन्म । मिळाला गडे हा
       ज्ञान मिळवाया । स्वल्प पडे।।

       रोज काही नवे । शिकूया आपण
       दुसऱ्या   दूषण। देऊ नये ।।

       गुरु   प्रत्येकास । करुन नाविन्य
       शिकू काही अन्य।प्रगतीचे।।

       शिकून आपण । इतरा शिकवू
       झोळी ही वाढवू। ज्ञान देता ।।

        प्रबलनाविन  । कार्यी समाधान
        अपेक्षा ठेवून । नका करु ।।

        इथे  ज्ञानदेव । तुकाराम झाले
        निंदेमध्ये न्हाले। अखंडीत।।

        शिव्या-शाप खाती। चार बंधूजन
        जणांचे  कल्याण । चिंतीयले।।

        तप्त जल अंगी । सहिष्णू होऊन
        अभंग    देऊन  । स्वर्गी गेले ।।

        तुम्ही-आम्ही काहो।अपेक्षा धरावी
        सहन       करावी । जन निंदा।।

        आपले आपण । कार्य करु नित्य
        अंतीम ते सत्य । जाणे असे ।।

         श्रीदास   म्हणे । मरणा नंतर
          माझ्याशी,अंतर। स्वच्छ व्हावे।।

                         ।।  श्रीदास ।।
                 ***दिलीप चारठाणकर
                       परभणी
                       संपर्क:-९१३०६५८४३० #evening
49643a851814a4f3626015c8c01cfedf

Dilip Deshpande

**************************************
       ।। आषाढी वारीचे अभंग ।।
**************************************
                   ।। सहा ।।
       खरे गाभाऱ्यात। पैठणीचा देव
       भक्तांसाठी धाव। घेत आहे।।

       मनाची   आरती। कापूर जीवाचा
       आत्म्याच्या धुपाचा। गंध केला।।

       गोदावरी   तटी । शब्द पान्हवले
       अंतरी   मावले । नाही तेव्हा।।

       नाथांची लेखणी।नाथांचे हे मन
       नाथांनी लेखन । करविले।।

       खरेच येउनी । बैसले सामोरी
       शब्दांच्या आहेरी।भूषविले।।

       एक टाकी सारे । लिहून घेतले
       चिरंतन   केले । त्यांचे त्यांनी।।

       मी तो एक धोंडा। शून्य हे स्वरुप
       टिकेने       हुरुप। येई पुन्हा।।

       आम्हां  पामरासी। पूर्ण कृपा करा
       द्वेष   खूप    करा। मित्रवर्य ।।

       तुमच्या  द्वेषाचे । अमृत होऊन
       स्त्रवते   हे मन । नाथ चरणी।

       क्षणोक्षणी बोला। वाईट वचन
       झोडा  माझे मन। दररोज ।।

       कधी  कधी मारा। माझ्या अंतराला
       नामाच्या रस्त्याला। शिस्त येते।।

       उपकार कैसे ।  फेडू मी तुमचे
       करुन नाथांचे। ठेवीयले ।।

       माझें   ग्रामवाशी। लिहिती हे आप्त
       त्यांनाही ते प्राप्त। सहजची।।

      श्रीदास  म्हणतो । वारंवार टीका
      सुधारती   चुका । माझ्यातील।।
**************************************
                         ।।  श्रीदास ।।
                 ***दिलीप चारठाणकर
                       परभणी
                       संपर्क:-९१३०६५८४३०
                       दिनांक:-१७जून २०२०
************************************** #IndianArmy
loader
Home
Explore
Events
Notification
Profile