Nojoto: Largest Storytelling Platform
rohanbabasahebni8404
  • 10Stories
  • 2Followers
  • 50Love
    0Views

Rohan Babasaheb Nimbalkar

  • Popular
  • Latest
  • Video
4a77ccf06dac4952b433213fa25d29b8

Rohan Babasaheb Nimbalkar

माझ्या शरीरावर नेहमीचं माझं धड असावं
मस्तकं माझं कधीही कुणाचं न हस्तकं व्हावं
जिवंतपणी तर असेलच सोबत पण,
मेल्यावरही जवळ माझ्या एक पुस्तकं ठेवावं..!
✍️रोहननिंबाळकर

©Rohan Babasaheb Nimbalkar #Books

5 Love

4a77ccf06dac4952b433213fa25d29b8

Rohan Babasaheb Nimbalkar

लोकांना एवढी पण किंमत देऊ नका की,
त्यांच्या लेखी तुमची किंमत शून्य होईल.
✍️रोहननिंबाळकर

©Rohan Babasaheb Nimbalkar #OneSeason
4a77ccf06dac4952b433213fa25d29b8

Rohan Babasaheb Nimbalkar

शरीरावर झालेले आघात हे काळाच्या ओघात नाहीसे होतात,
पण मनावर झालेले आघात खोलवर रुतून बसतात,
ते काळाच्या ओघात नष्ट होत नाहीत,
तर त्यांच्या मनावर जखमा होऊन ते भळभळायला लागतात..
तेव्हा एक वेळ शरीरावर आघात करा,
 पण कुणाच्याही मनावर कधीच आघात करू नका !
✍️रोहननिंबाळकर

©Rohan Babasaheb Nimbalkar #OneSeason
4a77ccf06dac4952b433213fa25d29b8

Rohan Babasaheb Nimbalkar

वडाला वेढे मारून नवऱ्याचं आयुष्य वाढेल की नाही ते माहिती नाही,पण प्रत्येक स्त्रीने आयुष्यात जर एक वडाचे झाड लावून त्याचे जतन केले तर तिच्या सात पिढ्यांचे आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही..
✍️रोहननिंबाळकर

©Rohan Babasaheb Nimbalkar #Trees

5 Love

4a77ccf06dac4952b433213fa25d29b8

Rohan Babasaheb Nimbalkar

आयुष्याचा रंगमंचच विचित्र ! 
कधी-कधी इथे आवडत नसलेल्या 
भूमिकाही गपगुमान वठवाव्या लागतात..!
✍️रोहननिंबाळकर

©Rohan Babasaheb Nimbalkar #solotraveller
4a77ccf06dac4952b433213fa25d29b8

Rohan Babasaheb Nimbalkar

विद्रोहाची लाट

व्यवस्थेने शेतकरी झालाय गार 
सगळ्या देशाचा खांद्यावर भार, 
वरून सरकारचा तोंड दाबून मार, 
बस्स झाला आता झालय फार,
 कर आता विद्रोहाची मोकळी वाट 
तरच येईल सुखाची पहाट 
जेव्हा येईल तुझ्या विद्रोहाची लाट ।।धृ।।


व्यवस्थेने तुला फारच लुटलं, 
हक्काचं बी तुझ्या हिसकावून घेतलं 
उठ गड्या आता ठोकून शड्डू 
व्यवस्थेविरुद्ध भांडून लढू
 तुझ्या हक्काचं तूच मिळवं
लढून झ्याक तूच मिरव
 तरच येईल सुखाची पहाट
 जेव्हा येईल तुझ्या विद्रोहाची लाट ।।१।।


शेतकऱ्या संपवण्या घातलाय घाट
 हुकुमशाहीचा यांचा थाट,
 संख्येच्या बळावर विधेयक लादतील
कांद्यावर पुन्हा निर्यात बंदी घालतील 
तुलाच आता व्हावं लागेल जागं..
कसं चाललं राज्या आता राहून मागं 
शिका आता लावायला त्यांचीच वाट
 तरच येईल सुखाची पहाट 
जेव्हा येईल तुमच्या  विद्रोहाची लाट..।।२।।


यशवंतदादा गोसावींनी संघटना काढली
शेतकऱ्यांसाठी मदत वाढली
मी रोहन सांगतो भूमीपुत्रांनो,
बनवुनी आता तुमची लाईन
करून टाका रे सगळेच जॉईन
तुमचा दबलेला आवाज वाढवा, 
त्याला व्यवस्थेच्या विरोधात लढवा
 तरच येईल सुखाची पहाट 
जेव्हा येईल तुमच्या विद्रोहाची लाट ।।३।।

✍🏻रोहननिंबाळकर

©Rohan Babasaheb Nimbalkar #RaysOfHope
4a77ccf06dac4952b433213fa25d29b8

Rohan Babasaheb Nimbalkar

दादा (आजोबा)

दुसरीत होतो तेव्हा
 वडील वारले होते 
दादांनीच तेव्हा आम्हाला
 लाडाने वाढवले होते 

कमी नाही भासू दिली कधीही 
आयुष्यात वडिलांची 
कारण लाड सगळे आमचे 
दादांनी पुरवले होते 

दादा आहेत आमच्या 
जीवनाचा एक आधार 
नियतीने केव्हाच आम्हाला
 निराधार केले होते 

दादांनीच आम्हाला खरे
शिकवले,घडवले, वाढवले.... 
जीवनात त्यांनीच आमच्या 
चैतन्य नवे फुलवले...

संस्कार करुन आम्हांवर 
दिली जगण्याची दिशा
लढवून संकटांशी झुंजार 
नवी जगण्याची आशा..

रोहन करितो प्रतिज्ञा 
सच्च्या मनाने निर्मिकाला 
असेच आजोबा लाभू दे..
सर्व निराधार नातवांना...

✍🏻रोहननिंबाळकर

©Rohan Babasaheb Nimbalkar #SunSet

6 Love

4a77ccf06dac4952b433213fa25d29b8

Rohan Babasaheb Nimbalkar

दादा (आजोबा)

दुसरीत होतो तेव्हा
 वडील वारले होते 
दादांनीच तेव्हा आम्हाला
 लाडाने वाढवले होते 

कमी नाही भासू दिली कधीही 
आयुष्यात वडिलांची 
कारण लाड सगळे आमचे 
दादांनी पुरवले होते 

दादा आहेत आमच्या 
जीवनाचा एक आधार 
नियतीने केव्हाच आम्हाला
 निराधार केले होते 

दादांनीच आम्हाला खरे
शिकवले,घडवले, वाढवले....
 जीवनात त्यांनीच आमच्या 
चैतन्य नवे फुलवले...

संस्कार करुन आम्हांवर 
दिली जगण्याची दिशा
लढवून संकटांशी झुंजार 
नवी जगण्याची आशा..

 रोहन करितो प्रतिज्ञा 
सच्च्या मनाने निर्मिकाला 
असेच आजोबा लाभू दे..
सर्व निराधार नातवांना...

✍🏻रोहननिंबाळकर

©Rohan Babasaheb Nimbalkar #Drops

4 Love

4a77ccf06dac4952b433213fa25d29b8

Rohan Babasaheb Nimbalkar

_*करोना*_ 

 करोना तू जगाला रडकुंडीला आणलेस खरे,
 मात्र तू एका अंगाने माणसापेक्षा बराच आहेस,
 निदान तू जातीभेद तर करत नाहीस...
 अगदी रंगभेदही करत नाहीस...

 तू हिंदू बघत नाहीस,मुसलमान बघत नाहीस...
 अगदी ख्रिश्चन,शीख,जैन,पारसी ही बघत नाहीस...
 तुझ्याकडे आहे सगळ्यांना समानच वागणूक.. 
 पण आमच्या माणसांच  काय रं करोना, 
आम्ही माणसाकडे माणूस म्हणून कधी बघितलंच नाही.. 

 बरं झालं करोना एका अर्थाने तू माणसाला जागवलेस..
 हवेमध्ये उडणाऱ्यांना जमिनीवर आणलेस..
 पैशाच्या हव्यासापोटी आपल्या देशाला विसरणाऱ्यांना,
 मरणाच्या भीतीने का होईना पण परत मायदेशी आणलेस...
 
 खरं सांग करोना,आता तरी माणूस हा माणूस बनेल का रे ?
 का तू गेल्यावर पुन्हा त्याच्यातला हैवान जागा होईल ?

 तुझ्या येण्याने माणूस सर्व काही विसरलाय करोना,
 पैसा, संपत्ती,   जात,धर्म...जीवघेणी स्पर्धा
 सारं काही,  स्वतःचा जीव कसा वाचवायचाय... 
 बस्स फक्त एवढाच विचार...

 करोना तू तर कमालच केलीस,
 कधी न बंद होणारी हजारो मंदिरे तू चुटकीसरशी बंद केलेस,
 लहानपणी आजी सांगायची देवबाप्पा पापाची शिक्षा देत असतो,
 करोना,तुला नाही देणार का रे तो देव शिक्षा ?

 मुस्लिमांच्या मस्जिदी तरी तू सोडणार कसा ?
 ख्रिश्चनांचे चर्च,शिखांचे गुरुद्वारे,बौद्धांचे विहारही बंद केलेस...

 खरंच करोना तू आलास अन माणसांना माणूसच बनवून गेलास...
 तुला माझी एकच विनवणी बाबा,आता माणूसातला माणूस जागा झालाय....
 आता तुझी गरज नाही , तुझा तू परत जा बाबा ....


✍🏻 रोहननिंबाळकर

©Rohan Babasaheb Nimbalkar

4 Love

4a77ccf06dac4952b433213fa25d29b8

Rohan Babasaheb Nimbalkar

बळीराजा का बळीचा बकरा हे आधी ठरवा

काळ्या रानात राब-राब राबतो आम्ही
वेळ पडली तर कांदा अन भाकरीवरही भागवतो आम्ही
जीवावर आमच्या पुढाऱ्यांनी मंत्रिपद मिळवावं
अन बळीराजा का बळीचा बकरा हे आधी ठरवावं

मर मर करून कापूस आम्ही पिकवतो
दुष्काळात आम्ही त्याला डोक्यावरूनही पाणी पुरवतो
कापसाचा भाव उतरवून यांनी सांगा काय मिळवावं ?
अन बळीराजा का बळीचा बकरा हे आधी ठरवावं

जीवाचं रान करून तूर पिकवतो छान
तूर नाही घेत म्हणून होता तुम्ही बेईमान
सांगा अजून किती दिवस शेतकऱ्यांना तुम्ही छळवाव ?
अन बळीराजा का बळीचा बकरा हे आधी ठरवावं 

ऊसाच पाचट काढून ऊस आम्ही पोसवतो
रानडुक्करांपासून संरक्षणासाठी रात्रंदिवसही झुरतो
लाख मोलाची साखर पुरवतो तुम्हाला, साहेब अजून काय पुरवावं ?
अन बळीराजा का बळीचा बकरा हे आधी ठरवावं

काबाड कष्ट करून धान्य आम्ही पिकवतो
पाखरांपासून संरक्षणासाठी बुजगावणेही उभारतो
अंग मेहनत करून रक्ताला साहेब किती आळवाव ?
अन बळीराजा का बळीचा बकरा हे आधी ठरवावं

साहेब तुम्ही बसता AC गाडीत तुमचं असत छान
एकदा येऊन तर बघा हो साहेब त्या रानाबरोबर भेगाळलाय आमचा प्राण
नाही सहन होत साहेब आता तुम्हीच आम्हाला कळवावं 
अन बळीराजा का बळीचा बकरा हे आधी ठरवावं


✍🏻रोहननिंबाळकर

©Rohan Babasaheb Nimbalkar #NirbhayaJustice
loader
Home
Explore
Events
Notification
Profile