Nojoto: Largest Storytelling Platform
bhushanthakare5405
  • 20Stories
  • 8Followers
  • 580Love
    509Views

Bhushan Thakare

  • Popular
  • Latest
  • Video
4c1e2c795303f06d1792455f917750bd

Bhushan Thakare

New Year 2024-25 सरत्या वर्षाला काय द्यावा निरोप

केलेल्या चुकांना कटाक्षाने टाळून 
आनंदी क्षणांना हृदयात माळून 
दुःखद क्षणांना सहज गिळून 
सरत्या वर्षाला निरोप देऊ सर्व मिळून.. 

नवीन वर्षाचा काय करावा संकल्प

अहंकार, धर्मजाती भेदाला जाळून 
माणुस म्हणुन जगण्याच्या सर्व मर्यादा पाळून 
आयुष्याच्या पुस्तकाला नव्याने चाळून 
नवीन वर्षाचे स्वागत करुया सर्व मिळून..

शब्दांकन ✍️@भुषण ठाकरे

©Bhushan Thakare #NewYear2024-25
4c1e2c795303f06d1792455f917750bd

Bhushan Thakare

Google ज्या समाजाची प्रतिभा ओळखण्याची क्षमता क्षीण झालेली असते,त्या समाजात प्रतिभा निर्माण 
होण्याच्या प्रक्रियेचा केंव्हाच ऱ्हास झालेला असतो... 

आणि मग जे शिल्लक राहिलेलं असतं ते 
किती बेगडी आहे हे समाजाला 
उमजे पर्यंत परतीचे मार्ग बंद झालेले असतात... 

#मनमोहनसिंगजी आप हमेशा याद रहोगे 
✍️भुषण ठाकरे

©Bhushan Thakare #Manmohan_Singh_Dies
4c1e2c795303f06d1792455f917750bd

Bhushan Thakare

आम्ही जोडत जाऊ रोज
नवीन पक्ष नवीन आघाडी
मित्रपरीवार, नातीगोती तुम्ही
तोडत रहा मुर्खांनो..

पक्षनिष्ठा, नेतृत्व ही कळकळ
तुम्हालाच भारी
आम्ही देऊ ते झेंडे तुम्ही
फडकवत रहा मुर्खांनो..
✍️भुषण ठाकरे

©Bhushan Thakare #Chess
4c1e2c795303f06d1792455f917750bd

Bhushan Thakare

आपण नवरात्रीत देवीला रोज 
नवीन रंगाची भरजरी
साडी जरुर नेसवा... 
पण आपल्या नैतिकतेचा आणि 
चारित्र्याचा रंग एकच असु द्या 
म्हणजे तिच्या स्त्रित्वाचा 
पवित्र रंग मलिन होणार नाही...
✍️भुषण ठाकरे

©Bhushan Thakare #navratra
4c1e2c795303f06d1792455f917750bd

Bhushan Thakare

जिवंतपणी आईवडिलांचे 
उपाशी राहते पोट
मृत्यूनंतर मात्र पिंडावर 
पंचपक्वान्नांचे ताट

©Bhushan Thakare #Fire
4c1e2c795303f06d1792455f917750bd

Bhushan Thakare

हल्ली झेंडे आणि सतरंज्याही
अगदी खोडकर वागतात..
त्यांना उचलण्यासाठी निष्ठावंत
कार्यकर्त्यांचेच हात लागतात..
✍️

©Bhushan Thakare
  #Chess
4c1e2c795303f06d1792455f917750bd

Bhushan Thakare

म-मनात जपूनी वसा स्नेहबंधनाचा
क-कप्पा सजवूया गोड आठवणींचा
र-रस रंग छंद उधळण करण्याचा
सं-संगित भरुनी हृदयी जीवनगाणे गाण्याचा
क्रां-क्रांती करून उत्क्रांत होण्याचा 
ति-तिळगुळाप्रमाणे गोडवा जपण्याचा

मकरसंक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा 
🪁🪁🪁🪁🪁
✍🏻भुषण ठाकरे (खाकुर्डी)

©Bhushan Thakare
  #MakarSankranti2021
4c1e2c795303f06d1792455f917750bd

Bhushan Thakare

राम शाकाहारी की मांसाहारी
ह्या निरर्थक वादाने रामराज्य येणार नाही
रामराज्यासाठी राम आचरणात आणणे
आम्हाला कधीच जमणार नाही

✍️भुषण ठाकरे

©Bhushan Thakare
  #NojotoRamleela
4c1e2c795303f06d1792455f917750bd

Bhushan Thakare

सरत्या वर्षाला काय द्यावा निरोप

केलेल्या चुकांना कटाक्षाने टाळून 
आनंदी क्षणांना हृदयात माळून 
दुःखद क्षणांना सहज गिळून 
सरत्या वर्षाला निरोप देऊ सर्व मिळून

नवीन वर्षाचा काय करावा संकल्प

अहंकार, धर्मजाती भेदाला जाळून 
माणुस म्हणुन जगण्याच्या सर्व मर्यादा पाळून 
आयुष्याच्या पुस्तकाला नव्याने चाळून 
नवीन वर्षाचे स्वागत करुया सर्व मिळून

नुतनवर्षाभिनंदन 💥

©Bhushan Thakare
  #WallPot
4c1e2c795303f06d1792455f917750bd

Bhushan Thakare

सोशियल मिडीयाची दुनिया
खरच किती छान आहे.. 
प्रत्येक सणसमारंभ आणि उत्सवात
पुजेआधी फोटो आणि स्टेटसला मान आहे..

©Bhushan Thakare #ShubhDeepawali
loader
Home
Explore
Events
Notification
Profile