Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser7939908729
  • 12Stories
  • 8Followers
  • 86Love
    40.8KViews

विलास वाकसे

  • Popular
  • Latest
  • Video
4e0a321ebe48a233752a1fb0b316b3cf

विलास वाकसे

गालावर खळी तुझ्या
असते ओठावरती हसू
सुंदर तुझ्या मुखड्यावर ह्या
नको आनूस कधीही रुसू

भेटावस वाटत मजला
जेव्हा पडतो आवाज तुझा कानी
तासन तास बोलावे तुझ्याशी
येतो विचार माझ्या मनी

फावल्या वेळात करतेस आठवण
बोलतेस मन मोकळे करून
बसतो ऐकत तुझेे बोल
जातो मी तुझ्या गप्पात हरून

गोड हसतेस जेव्हा
पडते गालावर ती खळी
येते खुलुन सौंदर्य आणखी
जशी उमललेली गुलाबाची कळी

दिसते उठून चेहऱ्यावर खळी 
जशी हिरवा शालू नेसलेली अंबर
पाहून चेहऱ्यावरील ती खळी
बसतो पाहत, तुला जसा शांत सागर

रुबाब तुझा राणीसारखा
आहे चेहरा चंद्रावाणी
घेतो तुला मिठीत मज मी
जशी चंद्रापाशी चांदणी...

©विलास वाकसे #HappyRoseDay
4e0a321ebe48a233752a1fb0b316b3cf

विलास वाकसे

sunset nature आपला इतिहास जर कोऱ्या पानावर उमटवयाचा असेल तर,तर संघर्षाला ठेटायला शिका.

©विलास वाकसे #sunsetnature
4e0a321ebe48a233752a1fb0b316b3cf

विलास वाकसे

वेड
 मी जे करतोय ते प्रेम नाही,त्याला एक वेड म्हणतात..

भारतमातेच्या रक्षणासाठी 
डोळ्यात तेल घालून
काळ्याकुट्ट अंधारात
एकटा जागून जो देशाला झोपवतो
त्याला वेड म्हणतात....

निधड्या छातीने समोरून
येणारी गोळी छातीवर झेलून
देशाचं रक्षणासाठी 
जीवाचा त्याग करतो
त्याला वेड म्हणतात...

ऑक्सिजन नसलेल्या वातावरणात 
जिथे दोन पाऊलं चालू शकत नाही
तिथे अनेक मैल चालून 
आपले कर्तव्य पणाला लावतो
त्याला वेड म्हणतात..

रक्त गोठणाऱ्या बर्फामध्ये
अन ऑक्सिजन नसलेल्या वातावरणामध्ये
आपलं कर्तव्य इमानदारीने
सदैव अन निरंतर पार पाडतो
त्याला वेड म्हणतात.....

अनेक हजार फुट बर्फात चढताना
जेव्हा स्वतःचा श्वास ही दम तोडतो
अश्या प्रसंगी काळजातल्या ठोक्यानंही 
बजावून सांगतो,की अजून मी जिवंत आहे
त्याला वेड म्हणतात...

मरण माझं निश्चित आहे
हे माहीत असूनसुद्धा
आपल्या निधड्या छातीने 
दुष्मणावर आग बनून बरसतो
अन आपल्या प्राणाची बाजी लावतो
त्याला वेड म्हणतात...

अखंड प्रेम करणाऱ्या नात्याना
फोनवरुनच सावरत असतो
मी नक्की येईन,नक्की भेटेन
असे खोटे वादे करून,देशासाठी समर्पित होतो
त्याला वेड म्हणतात..

अन देशाच्या रक्षणासाठी अनेक गोष्टींचा
त्याग करत हे अनमोल जीवनाचं प्रेम
हे कोणत्या मुलीवर नाही
तर भारतमातेच्या रक्षणासाठी करतो
त्याला वेड म्हणतात...

©विलास वाकसे वेड

वेड

4e0a321ebe48a233752a1fb0b316b3cf

विलास वाकसे

वेड १

वेड १

4e0a321ebe48a233752a1fb0b316b3cf

विलास वाकसे

वेड

वेड

4e0a321ebe48a233752a1fb0b316b3cf

विलास वाकसे

मैत्री

मैत्री

4e0a321ebe48a233752a1fb0b316b3cf

विलास वाकसे

पहिला पाऊस..

आभाळ दाटलं,अंधार झाला
सोबत त्याच्या वारा आला
पाऊस येण्याचं आवातन आम्हा
साऱ्यांना तो सांगून गेला...

झाडे झुडपे हालू लागली
पाला पाचोळा उडू लागला
रंगपंचमीचा  तो रंगसुद्धा
नभामध्ये खेळू लागला

चार थेंब पाडून मातीत
मातीतला गंध जागा केला
थंड हवेचा गारवा देऊन
"सुकून"तो देऊन गेला...

       विलास...

©विलास वाकसे #adventure
4e0a321ebe48a233752a1fb0b316b3cf

विलास वाकसे

फसवा ड्रॅगन

फसवा ड्रॅगन

4e0a321ebe48a233752a1fb0b316b3cf

विलास वाकसे

हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक
दैवत आमचे पिर दावल मलिक
इथे नांदतो आम्ही एकत्र
या पिराच्या पांढरीत

कष्ट करून खायावया
देतो आम्हा पंखामध्ये बळ
जो वागतो इथे खरा
त्याच्या कष्ठाला देतो फळ

करतो वर्षातून एकदा
आम्ही उरूस थाटात माटात 
गाजत वाजत शिड्या काढून
करतो आम्ही त्याची गंधरात

नाही माणतो आम्ही धर्म जात
नाही चालत इथे पाप
जो करितो काबाड कष्ट
त्यांची देतो तो साथ
असे आम्हा हिंदू मुस्लीमांचे प्रतीक
दैवत आमचे पिर दावल मलिक

4e0a321ebe48a233752a1fb0b316b3cf

विलास वाकसे

तुझ्या गालावर खळी

तुझ्या गालावर खळी

loader
Home
Explore
Events
Notification
Profile