Nojoto: Largest Storytelling Platform
poonambhagwatsab5787
  • 24Stories
  • 18Followers
  • 188Love
    248Views

Poonam Sabane-Bhagwat

  • Popular
  • Latest
  • Video
59c679446beb8a5190ae6bea224c0a93

Poonam Sabane-Bhagwat

आपण बोलायला हवं....

अस्वस्थतेच्या खोल तळाशी
साचले आहेत काही शब्द.....
काही विरामचिन्हांच्या जागा....
तुझ्यासाठी ओंजळीतून आणलेली फुलपाखरं....
अपूर्णतेचा शाप असलेल्या स्वप्नांची यादी....
समज गैरसमजांच्या मालिका...
खरी खोटी अर्धी मुर्धी उत्तर....
भूतकाळाच्या जखमा
वर्तमानाची अवहेलना
भविष्याची भिती
देहापासून देहापल्याड घेऊन जाणारी 
तुझ्या माझ्यातील कविता
आणि
अखेर पाठ फिरवून झोपी गेलेला दिवस....
हे सार हरवायच्या आधी,

आपण एकदा तरी बोलायला हवं

8 Love

59c679446beb8a5190ae6bea224c0a93

Poonam Sabane-Bhagwat

नाम हरी रटत जाऊॅ,
हरी नाम गाऊॅ री
गात गात हरी नाम,
हरी धाम पाऊॅ री
लागत नगर डगर सुना,
एकतारा बाजे री
धूप तरह जल होठों पर,
हरीधून साजे री !

अब इत ऊत देखूॅ नाही,
जित उत हरी री
हरी बिरहन सी जलूॅ मैं,
अब क्युॅ दोहरी री
अगन के आगे क्या सुझे,
हरी धाम जाऊॅ री
इत जाऊॅ उत जाऊॅ ,
हरी की कहलाऊॅ री !

7 Love

59c679446beb8a5190ae6bea224c0a93

Poonam Sabane-Bhagwat

काहीतरी मग चुकून जाते
हुकून जातो मेळ
अन् कायम हिश्शावर येते
सटवी कातरवेळ...

कधीकधी तर शुभ्र फुलांचे
स्पर्शही सोसत नाही
अन् कधीकधी तर तीक्ष्णदेखील
काटे बोचत नाही...

थांब म्हणते तरी पांगळा
विचार कुठे थांबतो
दर कोस दर करता मुक्काम
प्रवास का संपतो...

बालपणीचे हळवे नाते
जेव्हा पणाला लागते
शांत नदीपाशी मग मोकळे
मनास करावे म्हणते...

6 Love

59c679446beb8a5190ae6bea224c0a93

Poonam Sabane-Bhagwat

जेव्हा तुम्ही एकटे असता...अत्यंत एकटे
तेव्हा...
तुमचं अत्यंत खास....स्पेशल...ठेवणीतल दु:ख
तुमच्याजवळ येऊन बसत,
तुमच्याशी बोलत,
डोळ्यात पाणी आणून तुम्हांला सॉरी म्हणतं...
तुम्हीही मग....तुमची चूक नसतानाही हसून
खरं म्हणजे माझंच चुकलं म्हणत
दु:खाला कवटाळून बसता
त्यावेळेस ह्या जगाची लोकसंख्या फक्त दोन असते...
एक तुम्ही
आणि दुसरं
तुमचं..... अत्यंत आवडत दु:ख
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे दु:ख प्रत्येकाजवळ असतंच असतं.
अगदी....त्या दु:खाजवळ सुध्दा..... स्पेशल

स्पेशल

13 Love

59c679446beb8a5190ae6bea224c0a93

Poonam Sabane-Bhagwat

असा कसा जगशील? जगशील तू ही...!
सवयी टोचतील,अंगवळणी होशील तू ही...
फुले डुलतील,दिसतील दूरवर काही ,
डोकावता बाल्कनीतून,हरवशील तू ही...
थांब तिथेच स्तब्ध,हिरमुसल्या गोड उन्हात ,
अंगणात आलाच तर,विरघळशील तू ही...
कळलेच आहे तुला,मातीविना सुगंध नाही ,
विकत घेऊन कुंडीत,मग पेरशील तू ही...
इथे या दारात आहे,बंदिस्त स्वप्न तुझी ,
उद्या पंख फुटतील,झेप घेशील तू ही....

7 Love

59c679446beb8a5190ae6bea224c0a93

Poonam Sabane-Bhagwat

ऋतु फुलारी येईल तेव्हा,
फुल कळीचे होईल तेव्हा,
तेव्हा आपण भेटू सखये,
विझू पुन्हा अन् पेटू सखये...

बहुतेक सांजवेळ असेल,
क्षितिजावर केशरखेळ हसेल,
सावलीला खेटून खट्याळ,
ऊन सुध्दा येऊन बसेल,
सावलीस ऊन मिळेल तेव्हा,
पापणी पाणी गिळेल तेव्हा,
तेव्हा आपण भेटू सखये,
विझू पुन्हा अन् पेटू सखये....

संथगतीने वारा वाहिल,
दूर एकटा पक्षी गायिल,
त्या सांजेचा क्षण अन् क्षण,
आपुल्यासाठीच उदास राहिल,
उदास असतील सारे तेव्हा,
आंधळे चमकतील तारे तेव्हा,
पुन्हा आपण भेटू सखये,
विझू पुन्हा अन् पेटू सखये....

तोवर धीर धरुया आपण,
काम एवढे करुया आपण,
पाऊस होऊ डोळा होऊ,
जमेल तैसे झरुया आपण,
आपण आपल्यात नसू तेव्हा,
फक्त हवेलाच दिसू तेव्हा,
तेव्हा आपण भेटू सखये,
विझू पुन्हा अन् पेटू सखये.....

9 Love

59c679446beb8a5190ae6bea224c0a93

Poonam Sabane-Bhagwat

मुट्ठी में कुछ सपने लेकर ,भर कर जेबों में आशाएं,
दिल में है अरमान यही,कुछ कर जाएं,कुछ कर जाएं,
सूरज सा तेज़ नहीं मुझमे ,दीपक सा जलता देखोगे,
अपनी हद रौशन करने से,
तुम मुझको कब तक रोकोगे......|

मैं उस माटी का वृक्ष नहीं ,जिसको नदियों ने सींचा है,
बंजर माटी में पलकर मैंने, मृत्यु से जीवन खिंचा है,
मैं पत्थर पे लिखी इबारत हु ,शीशे से कब तक तोड़ोगे,
मिटने वाला मैं नाम नहीं,
तुम मुझको कब तक रोकोगे.......|

इस जग में जितने जुल्म नहीं ,उतने सहने की ताकत है,
तानो के भी शोर में रहकर ,सच कहने की आदत है ,
मैं सागर से भी गहरा हूॅं, तुम कितने कंकड़ फेंकोगे,
चुन चुन के आगे बढूंगा मैं,
तुम मुझको कब तक रोकोगे.........|

झुक झुक कर सीधा खड़ा हुआ ,अब फिर झुकने का शौक नहीं,
अपने ही हाथों रचा स्वयं , तुमसे मिटने का खौफ़ नहीं,
तुम हालातों की भट्टी में ,जब जब भी मुझको झांकोगे,
तब तप कर सोना बनूँगा मैं,
तुम मुझको कब तक रोकोगे.......|

9 Love

59c679446beb8a5190ae6bea224c0a93

Poonam Sabane-Bhagwat

घे तू श्वास मोकळा,अंतरी जो कधीचा दाटला
तुझ्या नव प्रवासाला, सूर्य बघ हा थांबला
तू चालता वाट चाले,डगमगता मग तीही थांबे
आता घे भरारी पुन्हा,नभ बघ तुलाच खुणावते 

तू सांभाळते कूस तुझी,परी त्यांची रित न्यारी 
 सुख तुझे बघ आता,लागे त्यांच्या जिव्हारी
जन्म नव्हे सोपा,ह्या स्त्रीपणाच्या जाणीवेचा
दे सोडून व्यर्थ मिथ्या,कर सोहळा तुझ्या जगण्याचा 

तू रडलीस,तू हारलीस,न कळे कुणा तुझी व्यथा
तुझ्या जन्माला कोसतो, तो समाज देवभोळा
ज्यांना न कळली कधी, स्वप्रवासाच्या उगमाची
अंधारलेल्या गर्भाची कथा.........पूनम. जन्म

जन्म

7 Love

59c679446beb8a5190ae6bea224c0a93

Poonam Sabane-Bhagwat

माणसं आपली वाटली तरी
आपली असतीलच असं नाही,
'फक्त पुढे व्हा' बोलली तरी
सोबत करतीलच असं नाही,
सूरात सूर मिळवला तरी
शब्दाला जागतीलच असं नाही,
शांत चित्तान ऐकतात वाटलं तरी
मनावर घेतीलच असं नाही,
अगदी जवळची वाटली तरी 
मदत करतीलच असं नाही,
आम्हीही बोलू म्हणाली तरी
तोंड उघडतीलच असं नाही,
म्हणूनच.....
माणसं आपली वाटली तरी
प्रत्यक्षात आपली असतीलच असं नाही...

8 Love

59c679446beb8a5190ae6bea224c0a93

Poonam Sabane-Bhagwat

माणसं आपली वाटली तरी
आपली असतीलच असं नाही,
'फक्त पुढे व्हा' बोलली तरी
सोबत करतीलच असं नाही,
सूरात सूर मिळवला तरी
शब्दाला जागतीलच असं नाही,
शांत चित्ताने ऐकतात वाटल तरी
मनावर घेतीलच असं नाही,
अगदी जवळची वाटली तरी 
मदत करतीलच असं नाही,         'आम्हीही बोलू'म्हणाली तरी
तोंड उघडतीलच असं नाही,
म्हणूनच............
माणसं आपली वाटली तरी
प्रत्यक्षात...आपली असतीलच असं नाही...

9 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile