Nojoto: Largest Storytelling Platform
pallaviphadnis7486
  • 520Stories
  • 358Followers
  • 3.9KLove
    6.1KViews

Pallavi Phadnis

poet and writer

  • Popular
  • Latest
  • Video
5e3e22fd3b9be40f210154671d99f657

Pallavi Phadnis

White काही सुख, नाती मर्यादित ठेवतात तर काही दुःख अमर्याद नाती देऊन जातात

©Pallavi Phadnis #love_shayari
5e3e22fd3b9be40f210154671d99f657

Pallavi Phadnis

ज्यावेळी बदल
 निरपेक्ष हवा असतो , 
धर्म,राष्ट्र रक्षणासाठी 
अहंकार,मत्सर, द्वेष
 बाजूला ठेवून,
मतभेद असले तरी 
मनभेद न ठेवता
 एकत्र येणे गरजेचे असते

©Pallavi Phadnis
5e3e22fd3b9be40f210154671d99f657

Pallavi Phadnis

दारी सडा रांगोळी,
दिव्यांच्या ओळी, 
गोधन,धनधान्य पूजावे
 दीर्घायुष्यासवे ,व्हावे
 लक्ष्मीचे आगमन, 
लक्ष्मीनारायणाचे व्हावे 
अतूट बंधन,बंधुभगिनीचे
 नाते जपता व्हावे
 शुभ दीपावली आगमन
        पल्लवी फडणीस,भोर✍️

©Pallavi Phadnis
5e3e22fd3b9be40f210154671d99f657

Pallavi Phadnis

White सत्य,संस्कार ,धर्म ,देशप्रेम हे जे चांगले आहे ते लोकांना दाखवा वाईट दाखवले की लोक तुम्हाला विरोधी समजतात जेंव्हा खरेच लोकांसमोर येईल त्यावेळी त्यांना वाईट काय आहे समजेल पण हे समजण्यासाठी बुद्धी हवी आणि त्यासाठी वरील संस्कार ,कर्म ,नीतिमत्ता चांगली हवी

©Pallavi Phadnis #GoodMorning
5e3e22fd3b9be40f210154671d99f657

Pallavi Phadnis

अवखळ अल्लड पाऊस कित्ती 
प्रेमळ असतो ,येताना कसे
स्पंदनांचे ढग दाटून येतात
स्पर्शाचा उबऱ्याने सैल होतात

सैलावलेल्या थेंबांना काही 
बंधनेच नसतात ,उगाच बेफाम
होवून अंगणात नाचतात,थेंब न
कळत थकून धरणीतरंगाला भेटतात

काही लबाड थेंब कधी अळवावर
कधी फुलावर कधी कळीवर डोलतात
काही थेंब तर त्या लाजूळवर भाळतात
ते  बुजरेपान अलगद लाजून पर्णपदरात लपतात

असा अल्लड अवखळ पाऊस
कधी उनाड ,बेफाम ,कधी लाजरा
असतो ,पण काय बोलावे आता 
ह्याच्या येण्यानेच तरंगसाजन भेटतो

       पल्लवी फडणीस,भोर✍🏻

©Pallavi Phadnis
  #Droplet
5e3e22fd3b9be40f210154671d99f657

Pallavi Phadnis

White असा सतत ओझरता पाऊस
किती आठवणी घेऊन येतो
थेंबाचे आवाज नी सरींचा नाच
डोळ्यात पाण्याची तडकलेली काच

वेळी अवेळी उगाच पडझड होते
शांत मनातील आठवण ढवळून जाते
कोणाशी पुसावे नी कोणावर रुसावे ,
मनात सतत सुटलेल्या क्षणांशी दावे

कोपऱ्यात शांत पडून असताना 
स्पंदनांना  साथ दबक्या हुंदक्यांची
मनाच्या घुसमटतीत प्राण द्यावे त्यागून 
ही आस असते अव्हेरल्या देहाची

कानावर पडणारे जलथेंब कधी
मोत्यांच्या मनमोहक होत्या सरी
आता मात्र बंद मनात केवळ नी
केवळ एकलेपणावर आठव आरी

सगळे सगळे वाहून जाताना
मनात का कित्ती साठून राहते ,
कितीदा द्यावी सोडून मोहाची नौका ,तरी
पुन्हा पुन्हा देहकिनाऱ्यावरच डोलते

         पल्लवी फडणीस,भोर✍️

©Pallavi Phadnis
  #sad_shayari
5e3e22fd3b9be40f210154671d99f657

Pallavi Phadnis

White चुकलेल्या शब्दांना आता 
पुन्हा बोलवावे,वाटते,कारण
बोलके असूनही सगळे निशब्द
नीरव निराकार निश्चल दिसते

चुकलेल्या क्षणांना पुन्हा चुकवावेचवाटते,
आठवात येऊनही पुन्हा पुन्हा साठवून
साठवांचे आठव वाहून जाताना
शांत डोळ्यात पाणी मात्र दाटते

हरवलेल्या वाटांना पुन्हा चुकते
किती शोधा नवीन रस्ते किती
शोधा नवीन घाट पण फिरून
फिरून त्याच चकव्यात फिरते

हरवलेल्या नात्याना पुन्हा 
शोधत शोधत नवीन नात्यात
गुंतते  गुंतत जाताना बेगडी
प्रेमाच्या जाळ्यात निरपेक्ष निसटते

किती शब्द, किती क्षण,किती वाटा 
किती नाती सगळे साजरे गोजिरेच असते 
एकाकी ,एकांगी ,एकली ,एकहोर्यात
स्व -बिंब पाहताना पुन्हा एकटीच दिसते

        पल्लवी फडणीस,भोर✍🏻

©Pallavi Phadnis
  #love_shayari
5e3e22fd3b9be40f210154671d99f657

Pallavi Phadnis

*गुलमोहर*
नाजूक पाने गळती आठवणींची
फांद्यांवर झुलती हिंदोळे
हिंदोळ्यावर गाणी स्पर्शांची
पानोवानी आठवण प्रीतीची

आला आठवणींचा अनुरागी मोहर
मनात फुलतो प्रेमाचा गुलमोहर
रक्तरंगी फुलांचा पडतो सडा
मनात बहरतो उष्ण प्रेमीचैत्र वेडा 
         पल्लवी फडणीस,भोर✍🏻

©Pallavi Phadnis
5e3e22fd3b9be40f210154671d99f657

Pallavi Phadnis

सुख सुख शोधताना 
शेवटी एकदा भेटले 
प्राण सोडून जाताना 
देहाला शेवटचे पाहिले

निशब्द भावना नी अदृश्य यातना ,
त्यानीच मन विटले
किती झळा होत्या अपमानाच्या ,
प्रेम होते गोठले

बेगडी जगताना अनेक 
सुखाचे होते इमले,पण
झिडकारणारे स्पर्श त्यातच
उतरत गेले वयाचे मजले

वाट पाहत होते सुखातांची 
आणि ते देहातून प्राण सुटले 
नको जन्म फिरुनी नव्याने
म्हणून डोळे आता घट्ट मिटले

जगताना नाही जगता आले
 मरणच भोगले आता मरताना मात्र 
क्षणिक सुखात निश्चल चिरशांत जगले
           पल्लवी फडणीस,भोर✍🏻

©Pallavi Phadnis
5e3e22fd3b9be40f210154671d99f657

Pallavi Phadnis

एक भूल कधी हुल होते
नी दुःखाच्या होर्यात खोल ढकलून देते

किती विनवणी किती आळवणी,नसलेल्या
चुकांची का करावी हातमिळवणी

एक क्षण निसटून जातो नी
आपल्या सावलीलाच आपण परके होतो

धुंद वाऱ्यात ,पानेरी डोळ्यात ,चुकांचा किती
वाचवा पाढा ,आपल्याच नात्याला गढूळ विचारांचा वेढा

शांत चित्त ,उष्ण देहाला आता ,समजूतीची आहे,आस 
न कळत कुठून तरी प्रेमळ शब्दांचे होणारे भास

करावी आर्जव नी किती भावनेचे गोळा करावेत पल्लव ,
सुकल्या डोळ्यातून किती लपवावे मार्दव

आता बेधुंद वारा ,अंधारी किनारा,किनाऱ्यावर बसून 
डोळ्यातून निरधारा ,पुन्हा पुन्हा आठवांचा होऱ्हा 

        पल्लवी फडणीस,भोर✍🏻

©Pallavi Phadnis
  #standAlone
loader
Home
Explore
Events
Notification
Profile