Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser7433367403
  • 70Stories
  • 31Followers
  • 633Love
    0Views

माधव सुभानराव गरड

एमए मराठी बीएड

  • Popular
  • Latest
  • Video
69efb8d451027d30eac24d91187f746b

माधव सुभानराव गरड

आळवावरचं पाणी ठरत नाही म्हणतात 
तरीही छताला दोन चार थेंब 
चिकटलेच
अवकाळी पाऊस आणि तू
निघून गेल्याला किती वर्ष लोटली 
तरीही आठवांचे डोह थांबलेच.
दोन दिशांना दूरवर चालत आलो आपण
तरीही चौका चौकात 
हिशोब घेणारे राहीलेच..
हिशोबाच काय 
देता देता दमलो
आठव डोळाभर
साठवत राहिलो ...

©माधव सुभानराव गरड #WorldAidsDay
69efb8d451027d30eac24d91187f746b

माधव सुभानराव गरड

मी शब्दांना सांगून बसलो
अर्थ उजागर करु नका
आत आतल्या दारावरुनी
ऊगा ऊगासे फिरु नका

©माधव सुभानराव गरड #Hope
69efb8d451027d30eac24d91187f746b

माधव सुभानराव गरड

तिला थेट बोलता नाही आलं
 तर मी कविता करतो

©माधव सुभानराव गरड #Photography
69efb8d451027d30eac24d91187f746b

माधव सुभानराव गरड

हे गाणे माझे येथे
सांडून जावे म्हणतो
स्वर्ग धरेवर थोडा 
ठेवून जावे म्हणतो..

©माधव सुभानराव गरड #Photography
69efb8d451027d30eac24d91187f746b

माधव सुभानराव गरड

69efb8d451027d30eac24d91187f746b

माधव सुभानराव गरड

भरले नाही मन अजुनि
येवून जा ना पुन्हा एकदा
श्वासालाही सोबत नाही
सळून जा ना पुन्हा एकदा..

अविट गोडी आणिक थोडी
देवून जा ना पुन्हा एकदा
एकांती बघ बंड कुणाचे
छळून जा ना पुन्हा एकदा..

चंद्र उशाला देवून थोडा 
भुलवून जा ना पुन्हा एकदा
भुरभुर पांघूर हूरहूर लावून 
भाळून जा ना पुन्हा एकदा...
माधव गरड .

©माधव सुभानराव गरड #teaandyou
69efb8d451027d30eac24d91187f746b

माधव सुभानराव गरड

भरले नाही मन अजुनि
येवून जा ना पुन्हा एकदा
श्वासालाही सोबत नाही
सळून जा ना पुन्हा एकदा..

अविट गोडी आणिक थोडी
देवून जा ना पुन्हा एकदा
एकांती बघ बंड कुणाचे
छळून जा ना पुन्हा एकदा..

चंद्र उशाला देवून थोडा 
भुलवून जा ना पुन्हा एकदा
भुरभुर पांघूर हूरहूर लावून 
भाळून जा ना पुन्हा एकदा...
माधव गरड .

©माधव सुभानराव गरड #teaandyou
69efb8d451027d30eac24d91187f746b

माधव सुभानराव गरड

69efb8d451027d30eac24d91187f746b

माधव सुभानराव गरड

पाऊस असा शब्दांना 
भिजवून निघून जातो
त्या ओलेत्या जखमांना
उगाच उसवत येतो..

कळ झेलायाला कोणी
झाडाला घेऊन येते
हुळहुळ पानावरती
थेंबाला झेलुन घेते..

नदीत अत्तर सांडून 
ओढा बोलत बसतो
ती राख तरंगून गेली
हा सागर ओला होतो...

माधव गरड .

©माधव सुभानराव गरड #MereKhayaal
69efb8d451027d30eac24d91187f746b

माधव सुभानराव गरड

आभाळ वयाला आले
अन् झाड जरासे चळले
जांभूळ सड्यास केंव्हा 
मोराने शिऊन गेले ..

मग पंखावरले डोळे 
भरुन नदीत आले
नदी जरा रडतांना
काळीज गलबल झाले ..

डोंगर माथ्यावरचे
ओघळ दरीत ओले
हिरव्या हिरव्या दारी
कोण ऊपाशी बसले ?
माधव ...

©माधव सुभानराव गरड #MereKhayaal
loader
Home
Explore
Events
Notification
Profile