Nojoto: Largest Storytelling Platform
roshan3636889878453
  • 25Stories
  • 17Followers
  • 166Love
    24Views

roshan

I'm just image the pictures and word are automatically come down in my mind.

  • Popular
  • Latest
  • Video
6ac02e5c1e2e679232abc6de9d1ce4a4

roshan

नवलाई नवी पण गंध आहे जुना
नाव माझे जिथे  मी बसू का पुन्हा
वर्ग मित्र सारे अनोळखे इथे झाले
प्रश्न मनी त्याच्या तू आलास का रे?

अलगत उतरतो त्या मी वर्गात जुन्या
मिसळून जातो जणू स्वर्गात पुन्हा
                              स्वर्गात पुन्हा

कविता नवी पण ताल आहे जुना
होऊनि पुढे मी हि म्हणू का पुन्हा
शब्द मात्र सारे इथे अनोळखे झाले
प्रश्न मनी त्याच्या तू आलास का रे?

चाळतो सर्व पाने त्या मी वर्गात  जुन्या
मिसळून जातो जणू स्वर्गात पुन्हा
                           स्वर्गात पुन्हा

आठवेल तुलाही हि सोडशील जागा
खंतावेल उद्या हा आजचा तुझा त्रागा
तितक्यात जाग येते अंधार  दूर होते
प्रश्न मनी माझ्या मी इथे नव्हतो का रे?

आठवतो सर्व रस्ते जायचे त्या वर्गात जुन्या
मिसळून जातो जणू स्वर्गात पुन्हा
                        स्वर्गात पुन्हा
रोशन देसाई 
29।03।20 स्वर्ग आहे जुना

स्वर्ग आहे जुना

6ac02e5c1e2e679232abc6de9d1ce4a4

roshan

तिचा आज व्हावे

तिची याद म्हणजे नदीचा
किनारा
कुणी पास नसता जवळचा
निवारा
मग हलकेच वाहे सुगंधात 
वारा
त्यात ओळखीचा  कवडसा 
गवसावा

दिसेनाशी होता तिने मागे पहावे
उंबर्यात अश्रूंनी मग मागे फिरावे
पाऊल उचलून प्रवाहात उतरावे
सोडून किनारा तिचा आज व्हावे

रोशन देसाई
29.03.20 तिचा आज व्हावे

तिचा आज व्हावे

6ac02e5c1e2e679232abc6de9d1ce4a4

roshan

दिवस बदलून जाईल...
नविन सूर्य नवीन प्रकाश घेऊन येईल
नवा जोश नव्या जोमात भरून जाईल
पक्षी नव्या फांदीवर नवीन सूर गाईल
काल जे नव्हतं ते आज होऊन जाईल

ठेऊन मनात कालच मन बास होऊन जाईल
रिता झालो सोडून तर दिवस बदलून जाईल

झोकून दिल तर सूर मारता येईल
कुठे भाळलो तर मन भळता येईल
वणवा भेटला तर मन जाळता येईल
माग लागल कुणी तर पळता येईल

घेऊन मनात कालच मन त्रास देऊन जाईल
रिता झालो सोडून तर दिवस बदलून जाईल

धावलो अंतर तर घामाघूम होईन
किती आज पुढे ते समजून जाईन
नवीन ठसा आजचा दूर ठेऊन जाईन
पार करण्यासाठी इथेच पुन्हा येईन

घेऊन मानात कालच मन खिन्न होऊन जाईल
रिता झालो सोडून तर दिवस बदलून जाईल
रोशन देसाई
01.03.20 दिवस बदलून जाईल

दिवस बदलून जाईल

6ac02e5c1e2e679232abc6de9d1ce4a4

roshan

सडक चल रहि है......
झोका हवा का जैसे आये चला जाये
थमके किसिके भी ना हाथ मे आये
मिलतेही हाथ साथ आगे लेके जाये
शोडके राहे नये से गाव मालती जाये

नजारोंमे मे घुलते सडक चल रही है
देखना है मोड ये कहा ढल रही है

मान लिया मन तो मुकाम मिल गया
यु तोड के चला दिल वो मर भी गया
छुते चला मिट्टी तो सफर बन ते गया
मोड बदलते हकीगत को मिलते चला

नजारोंमे घुलते सडक चल रहि है
देखना है मोड ये कहा ढाल रही है

बदलती है नादिया भेस बदलता है
और थोडासा आगे देस बदलता है
चारो दिशावोसे पर वो मील रही है
रुख भी जाऊ मै तुम्हे ले चल रही है

नजारोंमे घुलते सडक चल रही है
देखना है मोड ये कहा ढल रही है
रोशन देसाई
01.03.20 सडक चल रही है

सडक चल रही है

6ac02e5c1e2e679232abc6de9d1ce4a4

roshan

गुला बाच्या फुलांनी
बागेचा रंग 
गुलाबी होता
स्वप्नातल्या किनाऱ्यावर
तुझाच तरंग 
शराबी होता

धुंदीत क्षितिज
गावसण्याच्या 
ना थांग होता
सोडले किती
क्षणांना हिशोब 
अथांग होता

पाहण्यास सूर्यास्त 
पश्चिम दिशेत 
दंग होता
पूर्वेच्या डोलाऱ्याचा
क्षितिजात रोज
अंत होता

रोशन देसाई
29।02।20

6ac02e5c1e2e679232abc6de9d1ce4a4

roshan

खूप सुंदर
ओबड ढोबड एक दगड
एका घाटात त्याला दिसला
मातीला धुऊन त्याने तो
स्वच्छ फडक्याने पूर्ण पुसला
त्याच्या मनाला म्हणावे लागले खूप सुंदर

शननी घेऊन तो बसला
घावावर घाव त्याने घातला
घामाघुम होऊन तो ओतला
एकरूप होऊन दगडास टोचला
त्या शननीला हि म्हणाव लागल खूप सुंदर

शेवटचा हात फिरवून झाला
मूर्तीचा चेहरा नजरे समोर घेतला
स्वतावर क्षणभर तो धन्य झाला
मुर्तीन स्वतःला त्याच्या डोळ्यात पाहिल
तिलाही म्हणाव लागल खूप सुंदर 
रोशन
28।02।20

6ac02e5c1e2e679232abc6de9d1ce4a4

roshan

खूप सुंदर
ओबड ढोबड एक दगड
एका घाटात त्याला दिसला
मातीला धुऊन त्याने तो
स्वच्छ फडक्याने पूर्ण पुसला
त्याच्या मनाला म्हणावे लागले खूप सुंदर

शननी घेऊन तो बसला
घावावर घाव त्याने घातला
घामाघुम होऊन तो ओतला
एकरूप होऊन दगडास टोचला
त्या शननीला हि म्हणाव लागल खूप सुंदर

शेवटचा हात फिरवून झाला
मूर्तीचा चेहरा नजरे समोर घेतला
स्वतावर क्षणभर तो धन्य झाला
मुर्तीन स्वतःला त्याच्या डोळ्यात पाहिल
तिलाही म्हणाव लागल खूप सुंदर 
रोशन
28।02।20

6ac02e5c1e2e679232abc6de9d1ce4a4

roshan

अनवाणी होऊन बघ
तुला माती आवडू लागेल
किंमत समजली तर
मन हि बागडू लागेल

तू प्रेम करून बघ तू प्रेम विसरून जाशील
दवबिंदूंच्या जाळ्यावरचा थेंब होऊ पाहशील

6ac02e5c1e2e679232abc6de9d1ce4a4

roshan

क्या तुम सून रही हो....?

बस तुमसेही प्यार है
हर गाने मे वो गाता है
कितना सच कितना झूट
क्या तुम मान रही हो

मै सुरज नही जो
पुरबमे जागके पश्चिम 
मे बित जाये
ना है चांद भी जो
बादलोंकी झुंड मे
अटक जाये
क्या तुम सून रहि हो?

धूमकेतू भी नही जो
आकाश कि गंगा मे
भटक जाये
ना है चमकीले तारे
कौन है कहा पहचान
भी ना आये
क्या तुम सून राही हो?

जहा जाओगी वहा
पावोगी मै सप्नो मे
उतरके आउंगा
जागले फिर छोडके
निंदोंको कभी
ना छोडके जाउंगा

क्या तुम जान रही हो
कितना सच कितना झूट 
क्या तुम सून रही हो?
रोशन देसाई 
26।02।20 क्या तुम सून रही हो?

क्या तुम सून रही हो?

6ac02e5c1e2e679232abc6de9d1ce4a4

roshan

अर्दी रात्र निघून गेली

अर्दी रात्र निघून गेली
समजलंच नाही कीती शब्द बोलून गेली 
अंधारात सफेद कगदावर 
किती भावना लिहून गेली

बेभान होऊन चालून गेली
किती हृदय जोडून गेली
किती सूर शेडून गेली
अर्दी रात्र निघून गेली

पापण्याना ओलाऊन गेली
जखमांना सोलऊन गेली
झोपे ला उडवून गेली
अर्दी रात्र निघून गेली

चांदण्यात सरुन गेली
आठवणीत हरवून गेली
शब्द मात्र ठेऊन गेली
अर्दी रात्र निघून गेली

रोशन
26.02.20

loader
Home
Explore
Events
Notification
Profile