Nojoto: Largest Storytelling Platform
raybhansonawane1325
  • 27Stories
  • 93Followers
  • 195Love
    12.3KViews

Raybhan Y. Sonawane patil.

At.po.Bodkha Tq.khultabad Dist-Aurangabad.

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
75a660e14b293607bfaabc5532e5714c

Raybhan Y. Sonawane patil.

75a660e14b293607bfaabc5532e5714c

Raybhan Y. Sonawane patil.

कोरोना येत नाहीत.
 आपणच!
 त्याला घेऊन येतोय. 
आपलयाच चुकीमुळे!
आपलया बाधवांचा,
 आज जीव जातोय. 
मरण समोर पाहूनही,
का आम्ही हसतोय?
यातून आपलाच, 
गाढवपणा दिसतोय.
हा जन्म अनमोल आहे!
कसं तुम्हाला कळत नाही?
कोरोनाने मरणाला,
कफनदेखिल मिळत नाही!!
कवी:-रा.या.सोनवणे पाटील. 
(7558507276).

6 Love

75a660e14b293607bfaabc5532e5714c

Raybhan Y. Sonawane patil.

ही मानव जात, 
अजून काही काळ, 
सुखा-समाधानाने
 या पृथ्वीतलावर रहावी
असं वाटत असेल तर...
प्रत्येक माणसाने,
गावाने,शहराने,देशाने
अवघ्या जगाने -
" लॉकडाऊन "
व्हावे!
प्रशासनाचे नियम पाळावे!
स्वतःची काळजी घेऊन, 
घरातच राहून!
कोरोनाशी लढावे!!
या संकटातून
 बाहेर पडावे!!."
कवी:-रा. या. सोनवणे पाटील. 
(7558507276). कोरोना.

कोरोना.

6 Love

75a660e14b293607bfaabc5532e5714c

Raybhan Y. Sonawane patil.

या निर्दयी दुनियेनं
दाखवू नये मला...
मरणाची भीती. 
मीदेखील, 
का दाखवू ?
तिला, 
आपलसं
 करुन घेण्यासाठी, 
या काळजावर,
 घाव पेलून,
मी परतवलेत,
 मरणं किती.
कवी:रा.या.सोनवणे पाटील. 
(7558507276).

6 Love

75a660e14b293607bfaabc5532e5714c

Raybhan Y. Sonawane patil.

"गुपित मनातले,
ओठावर येऊनही 
मला...
 शब्दात मांडता,
 नाही आले.
होती काही, 
माझी विवशता
बोलावेसे वाटुनही,
मला...
बोलता नाही आले.
गेला आता टळूनी,
प्रहर यौवनाचा 
माझे मीच मला,
सरणावरुनी,
जातांना पाहिले". 
कवी:-रा.या.सोनवणे पाटील. 
          (7558507276). "प्रहर यौवनाचा. "

"प्रहर यौवनाचा. "

10 Love

75a660e14b293607bfaabc5532e5714c

Raybhan Y. Sonawane patil.

"पाऊस वळवाचा,
 अलगद् बरसून गेला.
 आठवणीत तुझ्या सखे!,
 जीव झाला ओला.
 भुलली असशील, 
  आज जरी तू मला...
 आहे श्वास हा जोवरी,
न विसरेन मी तुला.
 का म्हणून दोष,
 देऊ मी नियतीला.
येईल तिच घेऊनी,
  पुन्हा माझ्याकडे तुला."
 कवी:- रा.या. सोनवणे पाटील
        (7558507276). "तुझ्या आठवणीने."

"तुझ्या आठवणीने."

6 Love

75a660e14b293607bfaabc5532e5714c

Raybhan Y. Sonawane patil.

"छत्रपती शिवाजी महाराज!."
हे एकच नाव ,
तुमची पुरती 
वाट लावायला 
काफी आहे!
आरं पळताय कुठं?
खरी लढाई अजून,
बाकी आहे!
इथली ,
हर एक लढाई, 
आमच्यासाठी सोपी आहे!
महाराजांच्या सिंहासनपुढे,
कदापि न माफी आहे!!."
कवी:-रा.या.सोनवणे पाटील. 
(7558507276). "महाराज!!."

"महाराज!!."

7 Love

75a660e14b293607bfaabc5532e5714c

Raybhan Y. Sonawane patil.

"मी... 
तुझ्यासाठी, 
सारं काही, 
 सोडून आले 
तुझी झाले. 
मग तु ही,
माझ्यासाठी, 
मला जे,
 आवडत नाही, 
असं...
 जे काही, 
 ते सोडून दिलं,
पाहीजे की नाही?."
कवी:-रा.या. सोनवणे पाटील. 
(7558507276). "तुझ्यासाठी."

"तुझ्यासाठी."

9 Love

75a660e14b293607bfaabc5532e5714c

Raybhan Y. Sonawane patil.

तू आणि तूच आहेस...
 माझ्या नजरेत,
 माझ्या हृदयात अजूनही.
 म्हणूनच!
 नकोय मला कुणाकडंन,
 माझ्या प्रितीची ग्वाही!
 मिटलीही असेल कदाचित,
 तुझ्या प्रेमपत्रावरील शाई.
 पण मी अगदी गुपचूप...
 खांद्यावर गोंदलेलं,
 तुझ्या नावाचं अदयाक्षर,
  देहात प्राण आहे तोवर तरी...
 मिटणार नाही.
 जीव हा माझा,
 तुझ्या भोवती
 घुटमळत राहील.
 हे जग मी,
 सोडून गेल्यावरही.
 खंत एवढीच राहील की...
 त्याआधी का तुला,
 प्रीत माझी!
 कळणार नाही?
 कवी:- राया सोनवणे पाटील.
        (7558507275). "खंत".

"खंत".

8 Love

75a660e14b293607bfaabc5532e5714c

Raybhan Y. Sonawane patil.

अरे माझ्या या 
जाणत्या  राजाला ,
टिचभर झेंडा!
गंध-टिळे!
बाळी-माळेपुरतं,
नका ठेवू !
चला!
तुम्ही-मी,
थोडं तरी...
त्यांच्यासारखं वागून,
अस्साच होता!
आमचा राजा!!
अवघ्या दुनियेला,
   दाखवून देऊ!!."
कवी:-रा.या.सोनवणे पाटील. 
(7558507276).

8 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile