Nojoto: Largest Storytelling Platform
shantanu1982
  • 48Stories
  • 663Followers
  • 822Love
    600Views

shantanu Sonawane

꧁༒☬Shantanu☬༒꧂ ❤Don’t love too soon*😉 ❤Don’t trust too fast* ❤Don’t expect too high* ❤Because it hurts😏 ❤Love.is.easy.but.👑king👑.busy❤ Instagram id :- @just_u_and_me2825

  • Popular
  • Latest
  • Video
7701ff6f8e3d9c866af041df0ae9874f

shantanu Sonawane

वेड मन
बरेच दिवस विचारायचं होतं ,
कधीतरी तो दिवस येईल ,
याची वाट पाहत होतो ,
तिन्ही त्रिकाल तिचेच विचार ,
स्वत:शीच ठेवून जगत होतो ,
कधी कधी वाटायचं काही बोलायची गरज आहे का ?
विचारल्याविना राहवत नव्हतं ,
विचारायला धीर नव्हता ,
विचारीन विचारीन म्हणत म्हणत फार उशीर तर होत नव्हता ना ?
अखेर एक दिवस ठरवलं ,
खूप वेळ घालवला फोन करून माझ्या मनातला विचार मांडला ,
मला काही अंदाजच नव्हता असं चटकन उत्तर आलं ,
विचार करून सांगीन अशी‌ गरजही दाखवली नाही ,
तेव्हा पासून आजपर्यंत अजूनही विचार करत आहे ,
मनातलं सांगून चूक केली का ?
हीच खंत आतून खात आहे ,
कितीही समजावलं तरी समाधान होत नाही ,
म्हणूनच की काय म्हणतात ना ,
वेड मन काही ऐकत नाही....!!! #spark

10 Love

7701ff6f8e3d9c866af041df0ae9874f

shantanu Sonawane

तुला जमेल तसं ये आणि घेऊन जा, आणि मी फोन ठेवला...तिनं घरीही सांगून ठेवलेलं,
मी गेल्यावर कुणीही रडायचं नाही, नाहीतर तिही रडत राहणार, दु:खी राहणार,
म्हणून तिच्या घरातले रडत नव्हते, फक्त तिच्यासाठीच...!!!
मग मी तिच्या घरी जाऊन ती चिट्टी घेऊन आलो...
चिट्टी -खरं सांगू जाता जाता, तुझी खूप आठवण येत होती,
कदाचित तू येशील म्हणून,जीव तुझ्यात अडकून राहिला होता, पण तू नाही आलास, मग विचार केला,
तुझ्यासाठी जाता जाता, काहीतरी बोलून जावं,
मला खात्री होती, तू हे नक्की वाचशील..!!!
या जन्मात मी तुझी होऊ शकली नाही...
पण पुढच्या जन्मी माझा होशील ना रे...? #ShiningInDark
7701ff6f8e3d9c866af041df0ae9874f

shantanu Sonawane

अरे, ती काही बोलायला, ती या जगात असायला तरी पाहिजे ना ? तुझी खूप रे वाट पाहिली तिनं,
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, पण तू मात्र आला नाहीस...
तिला काहीतरी झालं होतं...मी फक्त ऐकतच राहिलो,
शब्द तर बाहेर पडायलाच तयार नव्हते,
अश्रू मात्र भळाभळा वाहत होते...
मग आवाज आला, ऐकतोयस ना.. !!!
तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस,
आणि दु:खीही होऊ नकोस, असं तिनंच मला सांगितलंय
तुला सांगायला...आणि हो तुझ्यासाठी काहीतरी
लिहून तिनं ठेवलंय, ती म्हणालेली,
माझी आठवण त्याला नक्की येईल,आणि तो इथे फोन करेल, तेव्हा त्याला दे... #findingyourself
7701ff6f8e3d9c866af041df0ae9874f

shantanu Sonawane

पण असं काहीतरी घडलं,आणि.... आपणच विसरलो... मग तिच्या घरी सहजचआता कशी असेल ती ?
कुठे असेल ती ? असे अनेकानेक प्रश्न डोक्यात येत राहीले... आपणच सांगितलेलं तिला कि,
नेहमी तुझ्या सोबत असेन, पण ती गोष्ट फोन केला,
कसे आहेत सगळे, अशी विचारपूस करायला ?
खरं तर फक्त तिच्यविषयी विचारायचं होतं,
विचारलं मग, कसे आहेत सगळे ?
थोडं थांबून मग उत्तर आलं, कि सगळे ठीक आहेत...
माझी मैत्रीण काय म्हणते ? ती आता काय बोलणार ?
आणि ती काही बोलू शकते का आता ? थोड्या शांततेनं मग मी विचारलं.. असं का म्हणताय ? #CalmingNature
7701ff6f8e3d9c866af041df0ae9874f

shantanu Sonawane

असं वाटतंय,
तू मला विसरून जाणार...! मग कधीतरी कुणाच्या तोंडून
नावऐकायला मिळालं, काय करते आता ती?
कुठे आहे सध्या ? मग लक्षात आलं,अरे !
आपण तर पुरतेच विसरलो तिला... खिशातून मोबाईल काढला, तिचा नंबर शोधायला,
पण तिचा नंबरच लागला नाही...
कदाचित बदललेला नंबर माझ्याकडे नव्हता.
मग आणखी कुणाकडे तिचा नंबर भेटतोय का ?
कारण तिची मनापासूनच आठवण येत होती,
न सांगता एकमेकांच्यामनातलं ओळखणारे,
असं नातं होतं आमचं, कुणाचीही नझर लागण्यासारखं... #meltingdown
7701ff6f8e3d9c866af041df0ae9874f

shantanu Sonawane

Relationship😍 are like a book📒
It takes a few seconds ⌚to 🔥burn
But, 
It takes years to write ✍️
So write it carefully 
and 
Never let it 🔥Burn🔥.....!!!! #reading

10 Love

7701ff6f8e3d9c866af041df0ae9874f

shantanu Sonawane

मैत्रीतले प्रेम....की प्रेमातली मैत्री
कधी न संपणारी फक्त मैत्रीच असत्ते
मैत्रीमधले प्रेमही तसेच असते कधीच न संपणारे
मैत्रीमध्ये हसवा रुसवा असतो.... 
प्रेमात फक्त रुसवा अन फसवा असतो
मैत्री नाजूक धागा आणि अटूट बंधन
प्रेम कीतीही नाजूक पण टूटतेच कधीतरी
मैत्रीनेच प्रेमाला सुरूवात होते
ऐकल होते पण खरच आहे की..
माझ्या मैत्रीत प्रेम आहे...
पण माझ्या प्रेमात मैत्री कधीच नसणार...
फक्त प्रेम आणि फक्त प्रेमच असेल..
तुम्हाला कोणते प्रेम आवडते...
प्रेमात मैत्री असते मैत्रीनंतर प्रेम असते
मैत्रीपेक्षा जास्त प्रेम की प्रेमापेक्षा जास्त मैत्री?
मग तूम्ही काय मागाल... मैत्री की प्रेम ? #solotraveller  Kiran Marskole Rampravesh Kumar सुुमन कवयित्री Smileee_vijuuu💕 Rahul joshi

#solotraveller Kiran Marskole Rampravesh Kumar सुुमन कवयित्री Smileee_vijuuu💕 Rahul joshi

13 Love

7701ff6f8e3d9c866af041df0ae9874f

shantanu Sonawane

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे....
मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे
मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट....
तुझी-माझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा,
मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा ....!!!! #Yaari

11 Love

7701ff6f8e3d9c866af041df0ae9874f

shantanu Sonawane

काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....
मानस दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत.... 
अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत
बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत.... 
नवीन नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत
रक्ताची नसली तरी.....काही नाती नाही तुटत.... 
एकहीमित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल.....!!! काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....

 Kiran Marskole Rahul joshi Smileee_vijuuu💕 Radhika sweety Shivpratap singh

काही आठवणी विसरता येत नाहीत काही नाती तोडता येत नाहीत.... Kiran Marskole Rahul joshi Smileee_vijuuu💕 Radhika sweety Shivpratap singh

9 Love

7701ff6f8e3d9c866af041df0ae9874f

shantanu Sonawane

मैत्री एक गोड नात मित्रत्वाचा गोडवा देत
मित्रत्व एक नाजूक धागा म्हणूनच त्याची हृदयात जागा
मित्रत्वला बांधील मित्र असतात जे मैत्रिला खरा अर्थ देतात
खरे मित्र नशीबनेच मिळतात मीही एक नशीब वंत
माझे मित्र भावना निष्ठ आमची मैत्री खूप घनिष्ठ
माझ्या सुख-दुखात ते पुरून उरतात भावनांना आधार देतात
मनातली दुख: वाहून नेतात 
सुखात आनंदाचा वर्षाव करतात
कोणासाही हेवा वाटेल अशी आमची मैत्री
आयुष्यभर टिकून राहील अशी आहे खात्री..... 😍😍 #cousinsday  Kiran Marskole सुुमन कवयित्री Radhika sweety madhvi ❣️ poonam_singla

#cousinsday Kiran Marskole सुुमन कवयित्री Radhika sweety madhvi ❣️ poonam_singla

10 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile