Nojoto: Largest Storytelling Platform
kirankshirsagar3673
  • 8Stories
  • 11Followers
  • 31Love
    0Views

Kiran Kshirsagar

  • Popular
  • Latest
  • Video
78fa850e1bf250d8f499f07bbde86c5d

Kiran Kshirsagar

*गवतफूल*
 
फुला फुला रे गवतफुला 
वाऱ्यावरती तुझा झुला 
गाणे गाई नाच करी 
झेलत पावसाच्या सरी

छान इटुकले फुलपाखरू 
भोवती लागे भिरभिरू 
खांद्यावरती घे रे त्याला 
अलगद तू रे गवतफुला 

रंग तुझा तो मोहक गडे 
सुगंध पसरला चहूकडे
गवताची ती नाजूक पाती 
सोबत तूला सदैव करिती 

भ्रमरानेही हळूच यावे 
त्याने गावे तू डोलावे 
माळरानही होतो सुना 
रानफुला रे तुझ्याविना.. #NojotoQuote

2 Love

78fa850e1bf250d8f499f07bbde86c5d

Kiran Kshirsagar

*धुळवड*

दडून होते बाई मी मागे
हेरलचं तरी त्या श्रीरंगानं
नाजूक गोरं अंग माझं
माखलं सारं धुळवडीनं

विसरून आपले तनमनधन
खेळत होते सारे धुळवड
भिजून सर्वांग ओलेचिंब
माझ्या जिवाची झाली परवड

वाट अडवूनी बसला कान्हा
जाऊ कशी मी घरला आता
रंग माखले गाली,कपाळी 
दरडावेल मज माझा पिता 

झटापट अशी करता त्याने
धांदलीत या फुटली घागर
काय करावे मला उमजेना
अश्रूही झाले मग अनावर 

द्वाड असा कसा रे कान्हा
खोड्या करूनी का हिनवतो
रंग उधळून तुझ्या प्रीतीचे
मनास माझ्या सदैव भुलवतो

*किरण क्षीरसागर*
*नाशिक* #NojotoQuote

2 Love

78fa850e1bf250d8f499f07bbde86c5d

Kiran Kshirsagar

*गुलमोहर*
त्या रणरणत्या उन्हात गुलमोहर
रक्तलालिमा लेऊन सर्वांगावर
बहरून आला नव्याने अंगोपांगी
भासतो जणू तो ध्यानस्त योगी

                                                           निष्पर्ण जरी तो झाला असला
                                                          फुलाफुलांनी खूपच डवरला
                                                             लपेटल्या ज्वाला सा-या देहावरती
                                                           चिताच पेटली जणू धगधगती

ग्रीष्मातही त्याचे खूलते किती रूप
पानगळ होऊनही दिसेना कुरूप 
वर्ण त्याचा कसा गर्द लाल भडक
आग अोकतो जणू सुर्यावरच तडक

                                              डोईवर घेई तप्त ग्रीष्माच्या उन्हाला
                                            सावली शीतल तरी देई वाटसरूला
                                                डोईवर बांधला जणू शेला लाल लाल 
                                               दिमाखात उभा जसा राजाचा महाल
  
*किरण क्षीरसागर*
*नाशिक* #NojotoQuote

5 Love

78fa850e1bf250d8f499f07bbde86c5d

Kiran Kshirsagar

*गुलमोहर*

त्या रणरणत्या उन्हात गुलमोहर
रक्तलालिमा लेऊन सर्वांगावर
बहरून आला नव्याने अंगोपांगी
भासतो जणू तो ध्यानस्त योगी

निष्पर्ण जरी तो झाला असला
फुलाफुलांनी खूपच डवरला
लपेटल्या ज्वाला सा-या देहावरती
चिताच पेटली जणू धगधगती

ग्रीष्मातही त्याचे खूलते किती रूप
पानगळ होऊनही दिसेना कुरूप 
वर्ण त्याचा कसा गर्द लाल भडक
आग अोकतो जणू सुर्यावरच तडक

डोईवर घेई तप्त ग्रीष्माच्या उन्हाला
सावली शीतल तरी देई वाटसरूला
डोईवर बांधला जणू शेला लाल लाल 
दिमाखात उभा जसा राजाचा महाल
    
*किरण क्षीरसागर*
*नाशिक* #NojotoQuote

7 Love

78fa850e1bf250d8f499f07bbde86c5d

Kiran Kshirsagar

*अग्निदेवता*

उर्जा स्रोत तु सकल जगाला
हे अग्नीदेवता नमन तुला
सुर्य होऊन तळपत असता
पोषण करीशी तू वृक्ष लतेला

मंद समईत तू तेवत असता
उजळून काढतो देवघराला
कधी चुलीतली धगधगती ज्वाला
अन्न शिजवितो भूकेल्या जिवाला

दीप होऊन प्रकाश देतो जगाला
दूर सारतो काळोख्या अंधाराला 
चिता होऊन जाळतो कलेवराला
मुक्त करतो नाशिवंत देहाला 

निखारा होऊन तू शस्र परजतो
अन्यायाविरूद्ध पेटून ऊठतो
रौद्ररुप धारुणी तांडव करता
वडवानल कधी वणवा पेटवितो

तुझ्या साक्षीने घेतो सात फेरे
पार करतो संसारातील निखारे
मशाल बनून तू मार्ग दावितो
त्याच पथावर आम्ही चालतो

तेवत रहा तू नंदादीप होऊन
पावित्र्य तुझे अबाधित राहील
फार तर हो धगधगती ज्वाला
दीनदुबळ्याची भूक भागेल

राग,द्वेष,चिंता,लोभ,अहंकार
या सर्वांना तु सामावून घे पोटात
प्रेम जिव्हाळा अन् आपुलकिचे
दीप पेटव तू मनामनात 

*किरण क्षीरसागर*
*नाशिक*




 #NojotoQuote

5 Love

78fa850e1bf250d8f499f07bbde86c5d

Kiran Kshirsagar


*मागोवा*

आपण पाहिलेल्या स्वप्नांचा सतत घ्यावा मागोवा 
स्वप्न सत्यात उतरवण्या होतो त्याचा खूप फायदा
स्वप्न ध्यास बाळगून उरी करू सारखा पाठपुरावा
साकार होतातच मग ती सगळी स्वप्ने सदा सर्वदा

*किरण क्षीरसागर* #NojotoQuote

3 Love

78fa850e1bf250d8f499f07bbde86c5d

Kiran Kshirsagar


*मागोवा*

आपण पाहिलेल्या स्वप्नांचा सतत घ्यावा मागोवा 
स्वप्न सत्यात उतरवण्या होतो त्याचा खूप फायदा
स्वप्न ध्यास बाळगून उरी करू सारखा पाठपुरावा
साकार होतातच मग ती सगळी स्वप्ने सदा सर्वदा

*किरण क्षीरसागर* #NojotoQuote

4 Love

78fa850e1bf250d8f499f07bbde86c5d

Kiran Kshirsagar


*मागोवा*

आपण पाहिलेल्या स्वप्नांचा सतत घ्यावा मागोवा 
स्वप्न सत्यात उतरवण्या होतो त्याचा खूप फायदा
स्वप्न ध्यास बाळगून उरी करू सारखा पाठपुरावा
साकार होतातच मग ती सगळी स्वप्ने सदा सर्वदा

*किरण क्षीरसागर* #NojotoQuote

3 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile