Nojoto: Largest Storytelling Platform
vyankateshkulkar2788
  • 3Stories
  • 10Followers
  • 33Love
    99Views

Vyankatesh Kulkarni

  • Popular
  • Latest
  • Video
839870e6e3f137b92b325c5adce49bac

Vyankatesh Kulkarni

White 💖...काहूर होता आठवणींचा.. 💖
बऱ्याच काळनंतर मजला तुजं विषयी बघ सुचते आहे
 पाहुनी मजकडे कवितांचे जणू पानही खुद्कन हसते आहे..
काहूर होता आठवणींचा 
एक स्थळी मन न्हवते माझे
परी,
 पुन्हा परतुनी येण्यासाठी 
खूप खूप उपकार तुझे..
पाहशील जेंव्हा अवकाशी तू ,
पुसतील तुजला टपोर तारे.. 
काहूर ठेऊनी हृदयी त्याच्या 
काय जाहले सिद्ध बरे?
असाच हृदयी काहूर माजून आर्तच तोडून न्हेली होती.. 
त्यातूनी देखील लक्ष्य काळ मी तुझीच पुजा केली होती..
भासत आहे मजला बहुदा 
फळास पूजा आली आहे..
अवती भवती सृष्टी सारी
 दुग्ध शर्करी न्हाली आहे..
काहूर मनीचा फुटूनी आता तृप्त आर्तमन झाले आहे..
बकुळलांसम पुन्हा जीवनी तुझे आगमन झाले आहे..
🏮सायंकाळच्या कविता🏮
💖✍️व्यंकटेश विनायक कुलकर्णी ✍️ 💖

©Vyankatesh Kulkarni #GoodNight
839870e6e3f137b92b325c5adce49bac

Vyankatesh Kulkarni

❤️अबोल आर्तमन❤️
दीर्घ श्वास घेऊनी मी पुन्हा तुलाच स्मरतो आहे..
अवकाशातील शुभ्र रंग तो उदास होऊनी सरतो आहे..

सरत असत्या रंगासम बघ प्रेम ही माझे शुद्धच आहे 
सारे काही असूनही आता तू नसणे ही हद्दच आहे..

खूप विचार केल्या नंतर मजला आता कळते आहे..
मी सोडोनी तुझे आर्तमन दुमार्गासी वळते आहे

अश्या विचारांमुळेच माझे मुक शांत मन जळते आहे..
'सोडून दे तू तिजला' म्हणत गर्द सांज मज छळते आहे..

या सांजेसी समजुनी सांगुनी मी ही आता थकलो आहे..
तुजवरच्या या प्रेमामध्ये कुठे नेमका चुकलो आहे..

आज पुन्हा मी अबोल असत्या आर्तमनाशी भांडत आहे..
कधी येशील तू एक प्रश्न हा त्या पाशी मी मांडत आहे..

कधी येशील तू एक प्रश्न हा त्या पाशी मी मांडत आहे..
🏮सायंकाळच्या कविता 🏮
✍️व्यंकटेश विनायक कुलकर्णी✍️
🎊2025🎊
❤️कोल्हापूर ❤️

©Vyankatesh Kulkarni 🎊..2025 अबोल आर्तमन..🎉

🎊..2025 अबोल आर्तमन..🎉

839870e6e3f137b92b325c5adce49bac

Vyankatesh Kulkarni

White ..त्या सांजेची तुझी आठवण..

अश्याच एका सायंकाळी अवकाशी मी रमलो होतो.. 
आठवणींच्या त्या विळख्याला दूर  ढकलूनी दमलो होतो..

आठवणींचा धीट भार तो सुटता ही मज सुटत नाही..
तुजविषयीची ओढदोर ही तुटता ही मज तुटत नाही..

का गेलीस तू सोडून ऐसी एकदाच उत्तरशील का?
पत्करले जसे घाव हदयी मी स्वहदयी पत्करशिल का?

काय म्हणू मी या क्षणांना सुन्न सुन्न बघ क्षण हे सारे
पण..
 फिरुनी पुन्हा तू येशील तेंव्हा सैदैव उघडी हृदयी दारे..

ये आता बघ नकोस माझ्या भाव-मनाचा खेळ करू..
दूर जाऊनी नयनी माझ्या उष्ण आसवे नकोस भरू..

आयुष्याच्या वळणावरचे एक सत्य तुज सांगत आहे
जन्म पुन्हा हा कुणास नाही हृदय आर्त ही मांडत आहे..

जन्म पुन्हा हा कुणास नाही हृदय आर्त ही मांडत आहे..
🏮..सायंकाळच्या कविता..🏮

©Vyankatesh Kulkarni #love_shayari  poetry

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile