Nojoto: Largest Storytelling Platform
pournimasadashiv6876
  • 2Stories
  • 6Followers
  • 11Love
    0Views

Pournima Garud

  • Popular
  • Latest
  • Video
8775416e378bb2ac2191ed19edae67cc

Pournima Garud

आयुष्यात आपल हक्काच  कोणीतरी  आपल असाव...
 
न बोलता सार काही समजणार
विस्कटलेल्या शब्दाना बरोबर अर्थ लावणार..
  
कुणीतरी असाव पाणवलेल्या पापण्यांना समजणार कुशीत घेउन रडणार तितक्याच प्रेमाने डोळ्यातल पाणी पुसणार

कुणीतरी असाव....

येणारा राग  समजुन घेणार केलीच कधी चिड चिड तर शांतपणे सहन करणार

कुणीतरी असाव...

चुकले तर अडवणार ; पडले तर सावरणारा , रुसले तर मनवणार , 
रडल्यावर हसवणार..प्रत्येक problem वर solution शोधणार

कुणीतरी असाव...
अर्ध्यात सोडणार नसाव शेवट पर्यत  सोबत राहणार असाव

कुणीतरी असाव...

गर्दीत हाथ सोडणार नसाव माझ्या सोबत चालणार कुणीतरी असाव...

स्वतःहुन  call , msg करणार असाव ; मी घेतलेल्या निर्णयामागे माझ्या मागे खंबीरपणे उभ राहणार कुणीतरी असाव...

खोट्या हसण्यामागे खर्या दुःखाच कारण शोधणार..
कुणीतरी असाव..

माझ्यासाठी वेळ काढणार , झालाच उशीर तर वाट पाहणार
मला ओळखणार नाही मला जाणणार कुणीतरी असाव...
भांडणात सुद्धा आपली बाजु घेऊन बोलणार..

कुणीतरी असाव..
न मागता हट्ट पुरवणार ; कधीतरी स्वतःहुन surprise देणार

कुणीतरी असाव...
 अर्ध्यात सोडणार नसाव शेवट पर्यत प्रेम करणार एवढया मोठ्या   जगात आपल हक्काच कुणीतरी असाव...


           © पौर्णिमा गरुड _ #...कोणीतरी असाव...#

#solotraveller

#...कोणीतरी असाव...# solotraveller

6 Love

8775416e378bb2ac2191ed19edae67cc

Pournima Garud

नऊ मास जपलस मला जन्माला आल्यावर रस्त्याच्या कडेला सहजच सोडलस मला ; नकोच होते मी मग हे सुंदर जग  का दाखवलस मला..
      नात्याच्या चौकटिचा खेळ मला कधी कळलाच नाही...कारण कुशीत घेउन झोपणारी आईच्या मायेची उब मी कधी पाहिलीच नाही..
   गोष्ट सांगणारा बाबा मला आठवतच नाही..
  भांंडणारी, हट्ट करणारी बहिण मला मिळालीच नाही...
  रंक्षाबंंधला राखी बांधायला माझ्या जवळ भाउच नाही...दादा म्हणून हाक मारेल अस एकहि हक्काच नात ऊरलच नाहि ...
  स्वप्नांचा बंंगला माझा खुप छान होता आणि अस्तित्वातला नजराणा मला अनाथ म्हणून हिणवत होता..न मागता मिळालेल प्रेम आणि माणुसकी या सगळ्यात मी घडत होते .
 सुंदर जग दाखवलस तु मला परीस्थिती नुसार मी जगायला शिकले..माणसाच्या गर्दीत आपल माणुस शोधत होते मनाचा पसारा स्वतंःच आवरत होते...शब्दाचा गुंता सोडवत होते अनाथ म्हणून जगायच नव्हत मला ...तुझ नाव माझ्या नावापुढे लावायच होत मला माझी स्वतः ची ओळख घडवायची होती मला 
   तुझ्या अंगणात भातुकलीचा डाव खेळायचा मला 
  सार काही राहुन गेल अनाथाच छत अंगावर आल..माझ्याच माणसानी मला परक केल ..
रक्ताच्या नात्यापेक्षा अनोळखी नात आपलस झाल..
 मनापासून  जुळलेली एक नाळ होती..आईच्या भेटिची ओढ होती 
सगळ काही आहे माझ्या जवळ तरीहि मनात मिलनाची आस होती ...मी एक अनाथ असल्याची जखम मनात खोलवर रुजली होती....
  
     -  ©पौर्णिमा गरुड  - 😊 मी एक अनाथ 🙃

😊 मी एक अनाथ 🙃

5 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile