Nojoto: Largest Storytelling Platform
swapnaligurabedh7458
  • 50Stories
  • 63Followers
  • 651Love
    79.6KViews

Swapnali Gurabe Dhonukshe

poetess

  • Popular
  • Latest
  • Video
8b740a70241cb0823af1214b36e0feb7

Swapnali Gurabe Dhonukshe

छळणारे प्रश्न अन् सतावणाऱ्या चिंता...
खुपणाऱ्या अढ्या अन् सलणाऱ्या खंता...
प्रत्येकाचं हेच जगणं, कोणाला न चुकलेलं..
कुठे कमी, कुठे जास्तच होतो आयुष्याचा गुंता....

स्वप्नाली...!!

©Swapnali Gurabe Dhonukshe #outofsight
8b740a70241cb0823af1214b36e0feb7

Swapnali Gurabe Dhonukshe

राजं तुमचं चुकलं....होय.. खरंच राजं तुमचं चुकलं...
तुम्ही उगाच लढला, उगाच रात्रंदिस झटला
एकेक मावळा जमवून, तुम्ही स्वराज्याच स्वप्न बघितलं....
राजं तुमचं चुकलं....होय.. खरंच राजं तुमचं चुकलं...

हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तुमची इच्छा होती,
कित्येक जणींची पांढरी कपाळं शौर्यगाथा सांगत होती,
प्रत्येक आईला आपलं लेकरु मावळा व्हावं वाटलं...
तरीही राजं तुमचं चुकलं....होय.. खरंच राजं तुमचं चुकलं...

जे हिंदवी स्वराज्य तुम्ही घडविला, त्या हिंदू धर्माचा, 
आज वाजत गाजत अपमान होतोय...
डॉल्बीच्या दणदणाटात, आणि शारप्यांच्या चकचकाटात, 
आम्ही आमच्याच देवासमोर विक्षिप्त नाचतोय...
देवी, गणपती,राम अहो, आम्ही तर तुम्हाला पण कुठं सोडलं...
राजं तुमचं चुकलं....होय.. खरंच राजं तुमचं चुकलं...

तुम्ही कशाला केला आटापिटा मोघलाई संपवण्याचा, 
मंदिर नि आया बहिणींची अब्रू वाचवण्याचा...
धर्माच्या नावावर, मिरवणुकीत आता रानटी श्र्वापद पिसळलं...
राजं तुमचं चुकलं....होय.. खरंच राजं तुमचं चुकलं...

हातात झेंडे घेऊन, गाड्यांवरून उगाच बोंबलत फिरायचं...
खुटभर दाढी नि चंद्रकोर लावून तोंडात पुड्या चघळत नाचायचं...
डिजे च्या ठेक्याने किती काळजाचं ठोकं बंद पडलं...
आमची लायकी नसताना तुम्ही आम्हा हिंदवी स्वराज्य दिलं...
खरंच राजं तुमचं चुकलं...

घ्या पुन्हा जन्म एकदा, घ्या तलवार हाती, पण यावेळी दुश्मन असेल, माजोरी तरुण वृत्ती
छाटून टाका मुंडकं जे खोटा धर्म पांघरूण बसलं...तुम्ही दिलेलं स्वराज्य आम्हा नाही पेललं
खरंच आमचंच चुकलं राजं... आमचंच चुकलं..

©Swapnali Gurabe Dhonukshe
  #ShivajiMaharajJayanti
8b740a70241cb0823af1214b36e0feb7

Swapnali Gurabe Dhonukshe

#Valentine
8b740a70241cb0823af1214b36e0feb7

Swapnali Gurabe Dhonukshe

आज चाॅकलेट डे च्या निमित्ताने....

तू...
Dark Chocolate सारखं व्यापून टाकलेस माझ्या आयुष्याला, 
आणि  माझ्यातील तुझ्या अस्तित्वाला आणखीनच  dark केलेस...

तू...
त्या Silk Chocolate सारखा आहेस माझ्या आयुष्यात, 
अगदी melt झालास, वेगळे नाहीच 
जणू आपण....

तू...
त्या kit kat सारखा, अगदी crunchy...crispy स्वभावाने, 
आत अधिकाधिक गोडवा भरलेला....

तू...
Fruit n Nut सारखा, माझ्या आयुष्यात ...
अधेमधे खूपसे आनंदी क्षण गवसल्यासारखा...

Happy Chocolate Day 

Swapnali...!!

©Swapnali Gurabe Dhonukshe #Happychocolateday
8b740a70241cb0823af1214b36e0feb7

Swapnali Gurabe Dhonukshe

बाते ये कभी ना भुलना........ !

          मोबाईल ची रिंगटोन वाजली .... पलीकडून येणारा आवाज अनपेक्षित होता... हॅलो , कसा आहेस ? मला माहिती आहे तुला कितीही इच्छा असेल तरी, तू काही आपणहून मला काॅल करणार नाहीस ! म्हणून मीच न राहून काॅल केला.... पलीकडून फक्त हं..... बोल काय म्हणतेस ? आज काय विशेष? कशी आहेस ?
*कशी आहेस ?....हा प्रश्न फक्त तू तरी विचारुच नकोस ...तुला याच उत्तर अगदी नक्की माहिती आहे...मग का खोटं ऐकायचं आहे का ? बाकी आज काही विशेष नाही...सहजच केलाय  काॅल... आठवण आली म्हणून नाही कारण ती जातच नाही ...हरक्षणं सोबत करते... नाकारलं झिडकारलं तरी... तटस्थ कधी राहताच आलं नाही... मनाने एखादं नातं स्वीकारल तर ते शेवटपर्यंत निभवावं इतकं सोप्पं समीकरण आहे माझं...
थोडावेळ शांतता... फक्त श्वासांचा मंद आवाज
झालं परत तुझं सुरु ? हेच तुझं इमोशनल होणं आणि मी पण तितकंच इमोशनल असावं असं वाटणं नाही आवडत मला... हल्ली खूप त्रासदायक वाटत... म्हणून किती वेळा वाटलं तरी मी नाही काॅल करत तुला...आधी पेक्षा जबाबदाऱ्या वाढल्या आहेत आता माझ्या... मी प्रॅक्टिकली जगणं प्रेफर करतो... भावनेत गुंतून पडणारा माणूस प्रगती नाही करु शकत...   या भावनांच्या जाळ्यात मला नाही अडकायचयं ... तुझं वाटणं लहानमुलांसारख... मी नाही हॅन्डल करु शकत...तुझ्या निरर्थक अपेक्षा संपतच नाहीत... 
वाटलच मला पण मग तूच सांग ...हे वाटणं ...हे इमोशन्स तुला नाही सांगायचे तर कोणाला सांगायचे ??? आजुबाजुला माणसांची गर्दी असली तरी मला बोलून मोकळं व्हावं असं वाटावं असे कोणी आहे ? बरं असं काय दिव्य मागतेय मी तुझ्या कडे ?? दिवसातला एखादा क्षण... तुझ्या डोळ्यात दिसेल अशी आपुलकी... अगदी काहीच नाही तर एखादा मेसेज ज्याने मला जाणवेल की तुला कुठेतरी जाणीव तरी आहे  माझ्या असण्याची ...बास इतकचं... आणि तू या गोष्टींना माझ्या निरर्थक अपेक्षा म्हणतोस ?? इमोशनल असणं इतकं वाईट आहे का ?चुकीचं आहे का ?
असो माझं पालुपत थांबवते आता... तसंही तुला त्रासदायक होईल असं काहीच करायचं नव्हतं मला... फक्त तुझा आवाज आणि तुझी ख्यालीखुशाली ऐकायची होती इतकचं...

खरं सांगू तर हे नातं मी एकटीच जगत होते बहुतेक... तू होतास अधेमधे...कधी सत्यात तर कधी संभ्रमात... चिंब भिजवणाऱ्या धबधब्या खाली इतकं कोरड राहणं जमायला हवं... पण अफसोस मला हे कधीच जमणार नाही...मी मात्र आयुष्यभर हे नातं  जगेन ,जपेन
पलिकडून फोन कधीच कट झाला होता ... आता त्या संभाषणातील शांतता हळवी होऊन फक्त डोळ्यातून एकसारखी पाझरत होती !!!

©Swapnali Gurabe Dhonukshe
8b740a70241cb0823af1214b36e0feb7

Swapnali Gurabe Dhonukshe

तुझी तळमळ, तुझी तडफड, मला खुश ठेवण्यासाठी,
तुझी असणारी धडपड, मला सारे काही समजते...❤️

तुझे कळवळणे,  तुझे हळवे होणे,
माझ्या सुखासाठी तुझे आसुसणे, मला सारे काही उमजते...❤️


तुझा खरेपणा, मनाचा मोठेपणा,
प्रेमातला भोळेपणा, मला सारे काही आवडते...❤️

तुझं माझं असणं, मला तुझ्यात साठवणं,
कणाकणात सामावणं, मला हेच तर हवे असते...
मला हेच तर हवे असते...❤️❤️❤️❤️

स्वप्नाली...!!

©Swapnali Gurabe Dhonukshe #love

#ValentineDay
8b740a70241cb0823af1214b36e0feb7

Swapnali Gurabe Dhonukshe

तुझं नि माझं प्रेम
गुलाबासारखं फुललेलं
पाकळ्यांप्रमाणे ‌एकमेकांत
अलवार गुंतलेलं....

स्वप्नाली...!!

©Swapnali Gurabe Dhonukshe #love ❤️

love ❤️ #Poetry

8b740a70241cb0823af1214b36e0feb7

Swapnali Gurabe Dhonukshe

रंग गुलाबी, प्रेम गुलाबी
मनही गुलाबी झाले
गुलाब देता तू सख्या
लाजेने चूर मी झाले....

स्वप्नाली...!!

©Swapnali Gurabe Dhonukshe #love

love #Poetry

8b740a70241cb0823af1214b36e0feb7

Swapnali Gurabe Dhonukshe

पहाटेची वाट बघत कधी रात्र रात्र जागून राहतो
खरचं मी पहाटे साठी वेड्या सारखा आतुर असतो...

आतुर असतो मी तुझा तो पहाटेचा, निद्रिस्त चेहरा पाहण्यास
साखर झोपेतला गोडवा, तुझ्या चेहऱ्यावर उतरलेला असतो...
अर्धवट उमललेल्या ओठांच्या पाकळ्या, जणू  गुलकंद भासतो...
खरचं मी पहाटे साठी वेड्या सारखा आतुर असतो...

नको घाई सकाळ होण्याची, नको लगबग तुझ्या उठण्याची
थकवा, शीण दिवसभराचा तुझा, आता कुठे दिसेनासा होतो
खरचं मी पहाटे साठी वेड्या सारखा आतुर असतो...


दिवसा रागाने फुललेलं नाक, चाफेकळी असल्याचं आताच कळत...
बाहेरचा चंद्र खरा की माझ्याजवळचा, हे कोड मग सुटत...
 रात्रीला घालवण्याचा आणि सकाळला थांबवण्याचा 
माझा रोजचाच खेळ सुरू असतो....

पहाटेची वाट बघत कधी रात्र रात्र जागून राहतो
खरचं मी पहाटे साठी वेड्या सारखा आतुर असतो...

स्वप्नाली...!!

©Swapnali Gurabe Dhonukshe #boat
8b740a70241cb0823af1214b36e0feb7

Swapnali Gurabe Dhonukshe

आश्वासनांचा आज
या भाव कमी झाला
खऱ्यास जाग आली अन् 
खोट्यास घाव झाला...

स्वप्नाली...!!

©Swapnali Gurabe Dhonukshe #celebration
loader
Home
Explore
Events
Notification
Profile