Nojoto: Largest Storytelling Platform
bhimraotambe1769
  • 113Stories
  • 64Followers
  • 902Love
    21.7KViews

Bhimrao Tambe

कुऱ्हाडीचे घाव कवितासंग्रह प्रकाशित .गीतकार कवी शाहीर लेखक विचारवंत

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
8d4d2982dcea8e0c30dc93590d16c228

Bhimrao Tambe

"आता एकच करायचं
 मागं न्हाय सरायचं,
अन्याय अत्याचाराला उभं आडवं चिरायचं". #droplets
8d4d2982dcea8e0c30dc93590d16c228

Bhimrao Tambe

तुझ्या मैत्री करुणेने
 द्वेषाला क्लेशाला झुकवलं,

तथागता,

तू माणसाला 
जगावर प्रेम करायला शिकवलं.

---✍️भिमराव तांबे,भांडणेकर. #PoetInYou
8d4d2982dcea8e0c30dc93590d16c228

Bhimrao Tambe

चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू

हिंदी माझी माय आणि मराठी माझी मावशी
ना घर कि ना घाट कि मावशी आजच्या दिवशी
देशोधडी लावू तिला अशी हळूहळू
चल राजकारण्या आपण.......मराठी मराठी खेळू

8d4d2982dcea8e0c30dc93590d16c228

Bhimrao Tambe

किसान आंदोलन

तुम्ही घोट प्या मुक्याने 
बोलू नका काही
देश माझा लढवय्या राहिलाच नाही

बोथट लेखणी नि 
मुके झाले कवी
मुक्त करा शब्दांना 
वाट दावा नवी
आता तुम्हीच चेतवा 
साऱ्या दिशा दाही
देश माझा लढवय्या राहिलाच नाही.

              भीमराव तांबे
              ( एक बंडखोर कवी ) #moonlight
8d4d2982dcea8e0c30dc93590d16c228

Bhimrao Tambe

भूक.

सरकारची चूक, शब्दात मांडा कवींनो
माणसाची भूक, शब्दात मांडा कवींनो

जगाचा पोशिंदा,  मरण्याआधी उपाशी
जळलेलं पीक ,शब्दात मांडा कवींनो

देवळाच्या आत माणिक ,मोत्यांचा खजिना
मंदिरा बाहेरची भीक, शब्दात मांडा कवींनो

ते मांडतील येथे ,विकासाचा अजेंडा
घोषणांची तारीख, शब्दात मांडा कवींनो

धर्माच्या रक्षकांनी माणूस जिवंत जाळला हा
विस्कटून  राख त्यांची शब्दात मांडा कवींनो

संसदेत पोचवा  उपाशी मुक्या यातनाना
भुकेची हाक शब्दात मांडा कवींनो

                                     BHIMRAO TAMBE
                                 8691918025 i support farmer

i support farmer

8d4d2982dcea8e0c30dc93590d16c228

Bhimrao Tambe

8208183924 #MichaelJackson
8d4d2982dcea8e0c30dc93590d16c228

Bhimrao Tambe

का मुसलमान टार्गेट केला जातोय? #Prayers
8d4d2982dcea8e0c30dc93590d16c228

Bhimrao Tambe

धरणांन तर गावाला केव्हाचच गिळलं होतं.

मूलभूत प्रश्न अजूनही
मोर्चा  निवेदनात मांडत असतो.

मंत्रालय ते रस्त्यामध्ये
हक्क अधिकारासाठी भांडत असतो

जखमावरती मीठ तर शासनानेही चोळलं होतं
धरणांन तर गावाला केव्हाचच गिळलं होतं.

------भीमराव तांबे. #letter
8d4d2982dcea8e0c30dc93590d16c228

Bhimrao Tambe

पावसाचा जोर वाढत चाललाय!

मेळघाटातलं सौंदर्य  न्याहाळू की,
कुपोषित बालकांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या बरगड्या मोजू
तो पहा माझा नागडा उघडा भारत 
करा रे करा स्वातंत्र्याचा जयजयकार करा
हे तिरंग्या 
लपेटून घे मला बाहेर सोसाट्याचा वारा सुटलाय
पावसाचा जोर वाढत चाललाय!

---------भीमराव तांबे. #bachpan
8d4d2982dcea8e0c30dc93590d16c228

Bhimrao Tambe

loader
Home
Explore
Events
Notification
Profile