Nojoto: Largest Storytelling Platform
swapnilhuddar9772
  • 219Stories
  • 14Followers
  • 9.7KLove
    1.1KViews

Swapnil Huddar

  • Popular
  • Latest
  • Video
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

सुखात असते असे भासवते मी साऱ्यांना,
दुःख खरे कळते आरशात चेहरा दिसल्यावर…

फार काही नाही त्याने प्रश्न विचारला होता,
कशी असतेस नेमकी मी आसपास नसल्यावर…

स्वप्नील हुद्दार











.

©Swapnil Huddar
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

प्रेम काय आहे विचारलेस तर ?
तुझे फक्त नाव लिहिले तर चालेल का ?
पुढे काय लिहिणार आहेस ?
मनातले तेव्हा भाव लिहिले तर चालेल का ?
इतक्यात अचूक जमेल का व्याख्या ?
हळवे काहीसे घाव लिहिले तर चालेल का ?
आजन्म एकत्र येणे कठीण नाही का ?
तुझ्या काळजीचे स्वभाव लिहिले तर चालेल का ?
किती दूरवर साथ देशील माझी ?
स्वप्नांत बांधलेले गाव लिहिले तर चालेल का ?
मी नाहीच म्हंटले तुला तर ?
मिळविण्याची तुला हाव लिहिले तर चालेल का ?
किती प्रेम करतोस माझ्यावर ?
म्हंटले ना, तुझे फक्त नाव लिहिले तर चालेल का ?

स्वप्नील हुद्दार




.

©Swapnil Huddar
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

White इथे तिथे फिरून तुला, शोधते मी साऱ्यात आहे,
कुणीतरी सांगत होतं, तू तुटणाऱ्या ताऱ्यात आहे...

तुझ्यानंतर मी कशी जगतेय हे कळतंय का तुला ?
एक सुकलेलं फुल जसं, बहरलेल्या हारात आहे...

तुला मागायला मला, तुझ्याकडेच यावं लागेल,
गेल्यावरही चोख असा, तू व्यवहारात आहे...

आज ठरविले मी, तुला उद्यापासून आठवायचे नाही,
कठीण आहे ना हे, तू येणाऱ्या प्रत्येक वारात आहे...

तुझ्या साऱ्या आठवणी मिटवून टाकू ठरवल्यावर,
नेमकी शेवटची एखादी, घुटमळते दारात आहे...

स्वप्नील हुद्दार




.

©Swapnil Huddar #Sad_Status
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

White कळत नाही काय करावे, तू अशी रुसल्यावर,
जवळ कसे घेऊ तुला, तू जवळ नसल्यावर...

येईल आसू नयनी जर, खुशाल येऊदे की,
हसायचे असते पुढे तर रडून घ्यावे खचल्यावर...

दिवस सरला बघ असा, तुझ्या अबोल्यात अख्खा,
कधी जाईल रुसवा, रात्र अख्खी सरल्यावर??

मला ठाव आहे सखे, हसू आणायचे कुठून,
खुलतो ना चेहरा तुझा, नभी चंद्र दिसल्यावर...

असं तृप्त होऊन जावं तरी हट्ट शेवटी धरावास,
"तू ही पहावं चंद्राला तिथे, मी पहात बसल्यावर..."

आज मनसोक्त पाहून घे, पूर्ण चंद्राला तिथे तू
"मला चंद्र हवा कशाला, तुझा फोटो असल्यावर..."

स्वप्नील हुद्दार















.

©Swapnil Huddar #moon_day
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

माझ्या कादंबरीत तो एकंच पात्र,
त्याच्या कहाणीत मी एखादी मात्र...

स्वप्नील हुद्दार 














.

©Swapnil Huddar #kinaara
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

वाट्याला आलेला विरह, हसत हसत पचवून नेता येतं,
कवी फसवतो कुठे, कवीला फक्त लिहिता येतं...

स्वप्नील हुद्दार











.

©Swapnil Huddar #navratri
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

एकीला दिलेलं प्रेम, दुसरीला शब्दांवाटे देता येतं,
कवी फसवतो कुठे, कवीला फक्त लिहिता येतं...

स्वप्नील हुद्दार













.

©Swapnil Huddar #navratri
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

तुझ्यासोबत आवडेल मला सूर्यास्त पहायला...
त्यावेळी काही लपाछपी नसेल,
जे काही भाव असतील खरे असतील,
हातात हात देऊन विचारीन तेव्हा तुला,
"माझ्यासोबत आयुष्यभर सूर्यास्त पहायला आवडेल का"
तू कदाचित लाजशील थोडीशी,
आणि हो म्हणशील माझ्या नजरेला नजर भिडवून,
तेव्हा तुझ्या नजरेत एकाच वेळी तो बुडत जाणारा सूर्य
आणि नव्याने उदयास येणारा मी...
हे पाहण्यासाठी,
कायम मनात राहण्यासाठी,
येणारं आयुष्य एकमेकांच्या मिठीत वहायला,
तुझ्यासोबत आवडेल मला सूर्यास्त पहायला...

स्वप्नील हुद्दार




.

©Swapnil Huddar
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

ढगांनी बरसावं मनसोक्त, पण बरसणं कुठे बारमाही ?
तिने दिलेल्या गुलाबाला ही, चाफ्याचा गंध येत नाही...

इथे मिळत नसतं हवं ते, सोडावं लागतं खूप काही,
एका कवीला कळायला हवं, आयुष्य म्हणजे कविता नाही...

स्वप्नील हुद्दार















.

©Swapnil Huddar
8d7b65f46552cee9d796f2f87c7b4563

Swapnil Huddar

White 
तू नेहमी मला म्हणत राहिलीस, रात्र रात्र जागू नको,
प्रेम, विरह सगळं मान्य, पण असा तरी वागू नको...

मी म्हंटलं होतं जेव्हा, जमलं तर अंधार दूर कर,
हसून म्हंटली होतीस तू, "माझ्याकडे तेवढं मागू नको..."

स्वप्नील हुद्दार 











.

©Swapnil Huddar #good_night
loader
Home
Explore
Events
Notification
Profile