Nojoto: Largest Storytelling Platform
nishigandhakakad1843
  • 34Stories
  • 46Followers
  • 387Love
    180Views

Nishigandha Kakade

Trying to write what I felt every day....! comment on my thoughts and like it also! do follow me ! alwys b happy! 🥰

  • Popular
  • Latest
  • Video
90a5f1a37e5f1aef14c2424ac775a5fa

Nishigandha Kakade

मराठी वर्ष.. इंग्रजी वर्ष... हो माहीत आहे मला फरक .. 
पण उद्या पासून माझा आवडता अंक 2 .. कमी होणार आहे .. 
कारण माझा mirror date वाला वाढदिवस ( 22.02.2022) याच वर्षी होता.. 
जो खरंच बरेच काही बरे वाईट अनुभव देवून गेला! कधी हसवून तर कधी रडवून गेला!!
         हो दिनदर्शिका नवीन येणार आता .. उद्यापासून 2022 ऐवजी 2023 आपण लिहिणार आता!! या चालू वर्षाने खूप सारे कडू गोड अनुभव दिले , खूप माणसे दिली .. 
काही अगदी मनात घर करून बसली काही अजून जास्त नजरेतून उतरत गेली !! 
पण हो मला माझ्या 2022 कडून कोणतीही नाराजी नाही उलट मी अनुभव संपन्न बनले स्वतःवर 10 टक्के का होईना जास्त संयम ठेवू शकले! 
माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला नवीन चौकटी मद्ये बसवून स्विकारू शकले! 
मग या मद्ये माझे लिहिणे असो. वा माझे  u tube वरील पहिले स्वरचित गाणे असो.
वा माझी रचना आदरणीय अण्णा हजारे यांच्या पर्यंत पोहोचवणे असो..
अथवा मला नवदुर्गा (लेखिका) हा पुरस्कार मिळणे असो... 
कोरोना चे सावट दूर झाल्यावर बऱ्याच ऑफलाईन 
आणि 2 ऑनलाईन मैफिलीचे सादरीकरण असो...
 गझलरंग चा live event प्रत्यक्षात अनुभवणे असो...
हे सर्व करत असताना माझ्या मैत्रिणींना त्यांच्या कामात support करणे असो.. !!
 सगळेच मला माझ्या आतील निशिगंधाला उमलवत जात होते!! 
जे खरंच मला आता मागे वळून पाहताना खूप सुंदर दिसत आहे !! 
 माझ्या त्या सर्व नातेवाईक आप्तेष्ट आणि सोशल मीडिया वरील 
जवळच्या माणसांना मानाचा मुजरा कारण ते होते म्हणून मला ही सुख मिळत होती आणि मिळत राहतील हीच आशा  तुम्हा सर्वांना येणारे 2023 हे वर्ष खूप खूप आनंदाचे जावो!! 

*तुमचीच शब्दवेडी शब्दप्रेमी निशिगंधा✍️🌼!*

©Nishigandha Kakade
  #Happy_New_year
90a5f1a37e5f1aef14c2424ac775a5fa

Nishigandha Kakade

विषय : वाद
अनाठाई अर्थहीन सारे,
कानी कसे शिरले वारे,
फिरुनी पुन्हा अंतर्मनात,
मी कधी डोकावलेच नाही,
मी पुन्हा वाद का घातला??
मला कधी समजलेच नाही!

हुशार मी माझे मीपण,
बुध्दी सहज,फिरली कशी??
दोष काय,कुणाचा नक्की??
खात्री कधी झालीच नाही,
मी पुन्हा वाद का घातला??
मला कधी समजलेच नाही!

हिरवळ लेली नाती माझी,
जपून ठेवलेली ,मनात ताजी,
सुरुंग लावून मीच माझा,
उधळली कधी ?कळलेच नाही !
मी पुन्हा वाद का घातला ??
मला कधी समजलेच नाही!

शुल्लक सारे,शुल्लक मीही,
माहीत असता सगळे सत्वर,
कठोर बोलने माझे सारे,
माणसं माझी दूर झाली,
हा अपराध कसा कळला नाही?
मी पुन्हा वाद का घातला?? 
मला कधी समजलेच नाही!!

समजूतदार आहे मीपण ,
समजुतीने घ्यावे तुम्हीपण,
इच्छा असता ही एकच!
समोरच्यास का हे कळले नाही?
मनातला राग का विझला नाही,
मी पुन्हा वाद का घातला ??
मला कधी समजलेच नाही! 

सारे सारे आपले होते ,
तुझे माझे काही नव्हते,
घर माझच सुंदर आहे,
मन ही माझे देते ग्वाही,
मी पुन्हा वाद का घातला ??
मला कधी समजलेच नाही!

©Nishigandha Kakade #वाद
90a5f1a37e5f1aef14c2424ac775a5fa

Nishigandha Kakade

जन्म दिवसाची आतुरतेने वाट बघणारे 
आपण कायमच खूप आनंदात असतो,यात नवल ते काय मित्रांनो?
सर्व गोष्टी मनापासून सुखावणाऱ्या असतात,आपल्याला मोठे पंख मिळणार आहेत,
आपण आता जबाबदार होणार आहोत,याची जाणीव ते प्रत्येक वाढते वर्ष करून देते.
पण मला जन्म देणारे आई वडील मात्र माझ्या जन्माच्या वाढत्या वयासोबत 
एका एका वर्षाने वयस्क होत चालले आहे,याची जाणीव देखील सलत राहते.
काय आणि कसे थांबवावे आपण आपल्या आई वडिलांना म्हातारे होण्यापासून??
आपण मोठे होतो,अनुभवी होतो पणआपले आधारस्तंभ आपले वटवृक्ष मात्र 
सुरकुत्या आलेले दिसू लागतात, त्यांच्यातली ऊर्जा कमी झालेली दिसते,
वयोमानानुसार ते थकलेले दिसू लागतात! मुलांचे बरे असते कायम आई वडील 
सोबत असतात त्यांच्या हर एक सुख दुःखात! पण आम्हा मुलींच्या जीवनाला 
जसा शापच लागला आहे पूर्वापार परंपरा आणि रूढींचा.
आपल्या आई वडिलां पासून दूर राहून त्यांच्या म्हातारपणात 
आधार ही त्या होऊ शकत नाहीत.
बोलण्याच्या बाता वेगळ्या असतात पण चालू संसार सोडून त्यांच्याकडे
सासू सासऱ्यांसारखे लक्ष नाही देता येत,यापेक्षा वाईट प्रकारचा हतबल पना 
तो दुसरा काय आहे एका मुलीसाठी??
फक्त पैसे पुरविणे म्हणजे आधार नसतो,मला मायेने त्यांना खाऊ घालायचं आहे
अगदी मनापासून त्यांना घड्याळाच्या प्रत्येक काट्यावर साथ द्यायची आहे.
त्यांना हर एक देवालयात सोबत दर्शनासाठी न्यायचे आहे,
त्यांच्या सोबत त्यांच्या भोवतालच्या वर्तुळात 
माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे  "गणपती बाप्पा सारखी"!
एक न विरणार हसू व्हायचं आहे त्यांच्या चेहऱ्यावरील!! - निशिगंधा✍️🌼

©Nishigandha Kakade #मनातलं_पानात #माझे_विचार
90a5f1a37e5f1aef14c2424ac775a5fa

Nishigandha Kakade

Sad love quotes in Hindi मनी पावसाची चाहूल लागताच,
आठवणींच्या पापण्या अलगद पानवतात,
रोज डोळ्यांचे किनारे धरणा सम गच्च भरतात,
भाग्यवानच असतात ते ,जे सख्याला नावापुढे लावतात.
- निशिगंधा✍️🌼

©Nishigandha Kakade #प्रेम #विरह
90a5f1a37e5f1aef14c2424ac775a5fa

Nishigandha Kakade

जन्मदाते असो वा पालनकर्ते पण आई - वडील गुरूंच्या यादीत कायम अग्रस्थानी असतात,संतवाणी, उपदेशपर साहित्य देऊन जीवन उजळण्यास हे धर्मगुरू किंवा भक्तिगुरू मदत करतात , शिक्षकवर्ग भविष्यकाळातील  उदरनिर्वाह स्वरूप डोक्यात ठेवून शिक्षण देतात,मित्रपरिवार जगणे आणि वागणे दोन्ही मद्ये साथ देतात, सगेसोयरे आपल्या जगण्यावर लक्ष ठेवतात आणि अप्रत्यक्षपणे कलाटणी देतात !! पण माझ्या मते हे सर्व गुरू सर्वांचे आहेत आणि असतील देखील किंवा नसतील देखील.
        पण एक गुरू सर्वांच्या जीवनातील अटळ सत्य आहे तो म्हणजे *परिस्थिती*. जी कायम आपल्याला आपल्यातील *best varsion* शोधण्यास मदत करते कधी अनुकूल राहून तर कधी प्रतिकूल राहून!! ह्या निसर्गाने आणि आपल्या नशिबाने तिच्या सोबत हातमिळवणी केली आहे तेव्हा मित्रांनो घाबरु नका   तीला कधीच. सामोरे जा !! लढा आणि जिंका!? ज्याने परिस्थितीवर विजय मिळवला तो खरा शिष्य आहे या जगात!!!

©Nishigandha Kakade #माझे_विचार 

#achievement
90a5f1a37e5f1aef14c2424ac775a5fa

Nishigandha Kakade

वारीस खंड पडला,दुरावा जरी जाहला,
श्री चरणास पाहण्या,हा जीव आतुरला!!!

टाळ, मृदंग चिपळ्या,तयारी झाली की हो सारी,
खोचूनी कासोटा,लेऊनी पदर,डोई डोई तुळस भारी!

दिऊन निरोप सासरी,ओढ लागलीसे जीवा,
किती कौतुके जाहली,वेळ वारीला लाभावा!

थकले होते किती मी रे,राबले कष्टाने संसारी,
नाही भूक भागली तरीही,ध्यास तुझाच तो उरी!

लेक कुशीत रडली,सासू खूप रे बोलली,
गोठा हांबरनारी गाय,मी रे तशीच सोडली! 

सख्या निघाल्या माझ्या,पाय पळू ते लागती,
फुले ,सुगंधी अत्तरी,झुले पालखी सोबती!

चाले सर्ज्या-चाले राजा,नाचे टाळ-विण्या संगे,
नसे फिकीर जगाची,जरी पाऊस धारा ओथंबे!

रूनझुन वाजे घुंगरमाळा,होई आरती ठाई ठाई,
स्पर्श करी पालखीला,लहान पोरे,बाप्या अन बाई,

पडे सडा रांगोळीचा,रस्त्यावरी जागोजागी,
होई दर्शना गर्दी अफाट,जेव्हा घोडा धावे ग रींगणी!

धरी फेर खाकिवाला,फुगडी घाले म्हतारबाबा,
नाचे सारेच वारीला,लहान-थोर फेटेवाला!

फिटे पारणे नेत्रांचे,जेव्हा दिसे सोन्याचा कळस,
तुका,नामा,जनी,चोखा,भेटे हर एक श्वासात!

तुळशीमाळ सजली ती,चंदन टिळा तो कपाळी,
देव माझा कसा दिसे?जसा राजबिंडा ग हरी !

गर्जे आसमंत सारा,बळ येई भक्तांमधी,
होई जल्लोष सुखाचा,भजे रामकृष्ण हरी!

©Nishigandha Kakade #वारी #पांडुरंग #दर्शन #विठ्ठल_रखुमाई
90a5f1a37e5f1aef14c2424ac775a5fa

Nishigandha Kakade

गझल - ए - महामाया

पिढीचा दोर आहे तो.
घराचा चोर आहे तो.

गरीबी लाजवी त्याला,
दिलाचा घोर आहे तो

निखारे झेलतो आम्ही,
तरी कमजोर आहे तो.

करुनी यातना साऱ्या,
जिवाचा पोर आहे तो.

करीता माफ सारे ते,
मुका घनघोर आहे तो.

समंजस दार माझे ते,
निनावी शोर आहे तो.

विकूनी टाक साऱ्यांना,
शिकारी मोर आहे तो.

समजतो काय स्वतःला,
वयाने थोर आहे तो?

कुलदिपक नाव देता का? 
विझलेली लोर आहे तो.

©Nishigandha Kakade #मनातलं_पानात#माझी_गझल
90a5f1a37e5f1aef14c2424ac775a5fa

Nishigandha Kakade

काय तो सुकुमार देह होता जो प्रसंगी कठोर झाला,
काय ती मधुर वाणी होती जी खड्गासम तीक्ष्ण ही झाली, 
काय ते अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते जे अनेकदा शत्रूचे कर्दनकाळ ठरले,
काय गुणगौरव करावा मी त्या मृत्यूलाही लाजवेल अशा धैर्य धुरंदर अमर आत्म्याचे,
आजपण तो नदीकिनारा थरथरतो,
वारंवार आपल्या उदकाने हुंदके देतो,
हर प्रहरी रक्तपर्शित पत्थरांना अश्रूंनी अर्घ्य देतो,
अजूनही तो भयभीत परिसर करूनेच्या किंचाळ्या फोडतो,
अजूनही तो तमस अघोरी मृत्युदंडाची ग्वाही देतो,
त्रिवेणीचा तो अभागी किनारा अजूनही साक्ष देतो,
धमण्यांमधील सळसळनाऱ्या पितृभक्त रक्ताची,
भूमिपुत्राच्या चिरफाड केलेल्या त्या पवित्र कातडीची,
अस्थाव्यास्थ विखुरलेल्या त्या भर यव्वाणातील राजदेहाची,
ज्याला छिन्नविच्छिन्न  करून त्या क्रूर विकृत राक्षसांनी स्वतः ला नर्कात लोटले,
ती धरती माय का दुभंगली नाही?
त्रिवेणी ने जलप्रलय का आणला नाही?
का चंद्राने शीतलता संपवून ती रात्र तिथेच का संपवली नाही?
त्या नराधमांना अग्नी बाणांनी चंडांशूने का जाळले नाही?
का तेव्हा त्या मरुताने विषारी बनून मृत्यूत्तांडव केले नाही?
माझ्या राजाचे चे करुणामय नयन फोडताना पाहणारी सृष्टी आंधळी का झाली नाही?
तुमचा हा मरण्यातंनांचा छळवाद नुसता ऐकून गतप्राण झालो आम्ही , 
हा त्याग लाखो जन्म घेतले कुणी तरीही विसरणार नाही,
तुम्ही आहात राजे तुळापुरातील हर एक अतिसूक्ष्म अनुरेनुत,
तुम्ही दिसतात भगवंत म्हणून अमुचे त्या फडकणाऱ्या भगव्यात, 
तुम्ही अमुच्या रक्तात भिनता,
मना मनात पाझरता,आणि
नयनअश्रूनतून कृतज्ञा म्हणून वाहता,
त्या प्रत्येक अश्रूंनी लक्षात ठेवली आहे तुमचीबली दानाची गाथा,
असा पुन्हा होणे नाही कणखर निर्भिड मृत्यू वर विजय मिळविणारा *मृत्युंजय राजा*!
*जय शंभु राजे!जय शिवाजी !जयभवानी !*

©Nishigandha Kakade #शंभूराजे
90a5f1a37e5f1aef14c2424ac775a5fa

Nishigandha Kakade

मेरे यादोंके बागान पर , 
उनका बसेरा हरवक्त लगता था,
कभी वो अपनी खुशबू बिखेरते,
कभी हम उनमे फना हो जाते!

©Nishigandha Kakade #याद

#Flower
90a5f1a37e5f1aef14c2424ac775a5fa

Nishigandha Kakade

तुला जितकं समजून घेईल,
तितका तू उलगडत जातोस ,
जणू काही तू माझं पुस्तकच आहेस ,
तुला पूर्ण वाचून झाले असे वाटताक्षणी,
तू पुन्हा पूर्ववत कोरा होवून जातोस!

तुला समजन,तुला उलगडन छान आहे!
वारंवार वाचन त्याही पेक्षा सुंदर आहे!
कधीतरी या डोळ्यांना लक्षात ठेव,
ज्यांनी तुला साठवले आहे सतत,
कधीतरी या हातांना लक्षात ठेव,
ज्यांनी प्रेमाचा स्पर्श दिला आहे सतत!
 
तुझा बोलके पना मी जपलाय ,
त्या हर एक शब्दांच्या गर्दीत,
तुला वाचणे सदाबहार ठेवलेय,
त्या हर एक स्वलप आणि पूर्णविरामात.
असच प्रेमाचं वाचनालय हो तू,
माझं अडाणी जगणं सुशिक्षित कर तू!!!

©Nishigandha Kakade #माझं_पुस्तक

#booklover
loader
Home
Explore
Events
Notification
Profile