Nojoto: Largest Storytelling Platform
dineshrajiramgaj4365
  • 29Stories
  • 61Followers
  • 236Love
    0Views

dinesh Rajiram gajbhiye

teacher

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
90b5b0a256bd7b0115e4abd6d409f1ec

dinesh Rajiram gajbhiye

वेगळेच जीवन माणूस जगतो आहे
दहशतीखाली शांतपणे वागतो आहे

बैलांसारखे बांधलेत मुसके  मानवाने
कधी न पाहीलेले नविनच पाहतो आहे 
 
जगात घातले थैमान घातक विषाणूने
देवांना दुरूनच वंदन मात्र करतो आहे

पोबारा केला जगातील देवांनी आता
जनता तरीही टाळ्या वाजवतो आहे

चला आपलेच रक्षण आपणच करूया
काही दिवस माणूस अंतर राखतो आहे जगतो आहे

जगतो आहे

18 Love

90b5b0a256bd7b0115e4abd6d409f1ec

dinesh Rajiram gajbhiye

देशातील देव सारेे झाले फरार आता
भक्त आणि देवांत पडली दरार आता

मानवी संकटात ना धावले ते कधीही
भक्त करु लागले देवांची तक्रार आता

तेहतीस कोटी पैकी दिसले ना एकही
कोरोनाचे जरी झाले रुप विक्राळ आता

दुनियेत नाहीत देव हे आम्हा कळाले
मानवी सेवेचा करूया नवा करार आता
  

Dinesh Gajbhiye फरार झाले

फरार झाले

7 Love

90b5b0a256bd7b0115e4abd6d409f1ec

dinesh Rajiram gajbhiye

नागरीक करतात सरकारची निवड
सरकार करतोय नागरीकांची निवड

7 Love

90b5b0a256bd7b0115e4abd6d409f1ec

dinesh Rajiram gajbhiye

नेमके जे सांगायचे तेच राहून गेले
 लपविलेले मजकूर ते वाचून गेले

 आसवांना मी न दाखविले कधीही
घरटे भावनांचे आज का वाहून गेले

संकटात साथ सोडली न मी कधीही
जात आपली जातांना दाखवून गेले

जीवलग होतो त्यांचा मी  एकेकाळी
ऐवढ्यावरचं कसेकाय ते मातून गेले






बरं मातून गेले राहून गेले

राहून गेले

12 Love

90b5b0a256bd7b0115e4abd6d409f1ec

dinesh Rajiram gajbhiye

सोड हा लपाछपीचा खेळ आता
दे मलाही तुझा काही वेळ आता

11 Love

90b5b0a256bd7b0115e4abd6d409f1ec

dinesh Rajiram gajbhiye

आमच्या शुभेच्छा त्यांना दिलेला शाप वाटतो
बोलताना त्यांच्याशी  मी आलेला ताप वाटतो शाप वाटतो

शाप वाटतो

9 Love

90b5b0a256bd7b0115e4abd6d409f1ec

dinesh Rajiram gajbhiye

शोधले त्यांनी आजवर बहाणे किती
समजतात ते स्वतःला शहाणे किती

जुन्यांना हिणवले जाते रोज का येथे
जुने ते सुवर्णक्षण होते सुहाने किती

कशाला दोष देता  आरशास आता
नाहक कोठेही तुमचे सजणे किती

व्यवहार हा तुमचा न रुचला मजला
कितीदा द्यावे कोणास ऊसणे किती बहाणे किती

बहाणे किती

9 Love

90b5b0a256bd7b0115e4abd6d409f1ec

dinesh Rajiram gajbhiye

जे आमच्या मनात. तेच स्टेटसवर दिसते तुम्हास

9 Love

90b5b0a256bd7b0115e4abd6d409f1ec

dinesh Rajiram gajbhiye

जुन्यांना हेटाळणी नव्यांना सलाम आहे
माणूस आपल्याच मनाचा गुलाम आहे सलाम आहे

सलाम आहे

9 Love

90b5b0a256bd7b0115e4abd6d409f1ec

dinesh Rajiram gajbhiye

आज अचानक झाले ओसाड गाव माझे
दिसले असतील त्यांना मुके घाव माझे

हसविले तुला मी लपवून त्या जखमांना
न कळले तुला अजूनही प्रेमभाव माझे

जिंकूनही खेळात तू हरवलीस तू मनाला
पंगतीत कावेबाजांच्या फसले डाव माझे

पाहिले उगाचच मी भविष्य तुझ्यात स्वतःचे 
गोंदवले का हातावरती दिनेश नाव माझे

9 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile