Nojoto: Largest Storytelling Platform
nishakharat2017
  • 641Stories
  • 1.6KFollowers
  • 7.9KLove
    3.4LacViews

nisha Kharatshinde

✍️काव्यनिश

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

White किती आहे आयुष्य पुढे?

किती आहे आयुष्य पुढे
ना कुणास अजून कळलेले
मग रुसवे फुगवे कशासाठी
स्वछंदी जगावे आयुष्य उरलेले

कुणी कुणास ना जन्मी पुरले
नाती-गोती रमण्यासाठी
काही रक्ताची,काही प्रेमाची
आहे तोवर जगण्यासाठी

कुणी कमी तर कुणी वाईट
ज्याचे त्याचे मतभेद सारे
करोडो चेहरे विभिन्न असताना
का जगावे कुणी मनासारे

असा घ्यावा अनुभव जगण्याचा
क्षणालाही थांबावे वाटेल
सुर्यास्त अन् सुर्योदयामधील
प्रत्येक क्षण जगावा वाटेल

इथेच जन्म अन् इथेच मरण
देह ही क्षणीक नश्वर आहे
साठा संचयही वाहून जाता
सोबत पुरवेल ती माणूसकी आहे

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde किती आहे आयुष्य पुढे?

किती आहे आयुष्य पुढे? #Poetry

941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

छळते ते दुःख मलाही
मी त्याला गोंजारत नाही
वेदनेला शब्दात सजवून
कवटाळत कुणालाच नाही
✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde चारोळी

चारोळी #Poetry

941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

स्मित हास्य त्या ओठांवरील
शशी दुरूनच न्याहाळत होता
मंत्रमुग्ध रातराणी करुन
क्षण सय‌ होऊन बरसत होता

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde क्षण

क्षण #Poetry

941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

आज मी अन् तो (पाऊस)

तो बरसतच होता मनसोक्त
माझ्याशी गप्पा मारत..
मी ही बाल्कीनीतून हसत
त्याला होते न्याहळत

दिवसभर बोललो आम्ही
सांज व्हायला लागली होती
रात्रीही येणार का रे
हो...गर्जना ऐकू येत होती

कसे गेले वर्ष अखेर
त्याने मला विचारले
फक्त तुझीच प्रतिक्षा
सोड...तूला खूप आठवले

गंधाळल्या दाही दिशा आज
मी ही मंत्रमुग्ध जाहले
त्या चातकासारखीच मी‌ ही
आज खरी तृप्त झाले

तो ही ऐकून हसू लागला
वाट त्यानेही पाहिली होती
अंधार सगळीकडे पसरला 
तितक्यात आईने हाक मारली होती

✍️(निशा खरात/शिंदे)काव्यनिश

©nisha Kharatshinde आज मी अन् तो(पाऊस)

आज मी अन् तो(पाऊस) #Poetry

941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

धनगराची जात माझी

धनगराची जात माझी
गाव माझं कोकणात
माय माझी धरती ही
बाप माझा जेजुरीत
        
श्यात माझं पिकलेलं
हवेमंधी डुलतं हे
भात पिक वरसभर
पाॅट भरी त्यावर हे
         
गाय,म्हैस,आणि बैल 
इस्टेट तिच माझी एक
शेळी-मेंढरं,कोंबड्या
ही पोरं माझी अनेक
           
कोकणात गाव माझं
घर-पुणे मुंबईत
चाकरमानी म्हणत्यात
रोजगार हॉटेलात
             
एका धाग्यात विणलेली
धनगाराची जात माझी
प्रेम-मायेचा डोंगर तो
ती वाडी माझी धनगराची

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde धनगराची जात माझी

धनगराची जात माझी #Poetry

941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

सोनचाफा

सोनचाफा मी तुझ्या अंगणातील
रोज पाहून तुला दरवळतो
सायंकाळी प्रभात समयी
तुझ्याच प्रतिक्षेत झुरतो

केसात तुझ्या मी मळतो कधीतर
नाहीतर श्र्वासात एकरुप होतो
वेडावून मग धुंदीत प्रिये
मनोमनी स्वर्गमयी होतो

मंदप्रकाशात चांदण्यांसगे
तुझ्याच विषयी गुणगुणतो
तु नसतानाही भास तुझाच 
मी माझा कधीच नसतो

तुझ्याच कवीतेत तुझ्याच शब्दात
मी जेव्हा जेव्हा सजतो
कमी दिवसांचे आयुष्य माझे
मनी शंभर वर्षे जगतो

सोनचाफा मी तुझ्या अंगणातील
रोज पाहून तुला दरवळतो
सायंकाळी प्रभात समयी
सखे‌ तुझ्याच प्रतिक्षेत झुरतो

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde सोनचाफा

सोनचाफा #Poetry

941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

तू ब्रह्मध्वज,विजय,आनंदाचे 
कडुनिंब,माधुर्य,कलशाने सजते
काव्यनिश होऊन जरी दरवळले मी
लपेटून चाफा तूज शृंगार खुलते
रजनी जरी मी दुःख लपेटून
तू आशा मज सकाळ नटून
निश जरी मी सामावून घेते
तुझ्या प्रतिक्षेत सहज जमते

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde ब्रह्मध्वज

ब्रह्मध्वज #Poetry

941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

तू ब्रह्मध्वज ,विजय,आनंदाचे 
कडुनिंब,माधुर्य,कलशाने सजते
काव्यनिश होऊन जरी दरवळले मी
लपेटून चाफा तूज शृंगार खुलते
रजनी जरी मी दुःख लपेटून
तू आशा मज सकाळ नटून
निश जरी मी सामावून घेते
तुझ्या प्रतिक्षेत सहज जमते

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde
  ब्रह्मध्वज

ब्रह्मध्वज #Poetry

941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

अलोर्यातील होळी

काय सांगू गम्मत तेव्हा
आमच्या लहानग्यांच्या होळीची
शेणी,शिवरी,लाकूड अन् जागा
आठवड्याआधीच शोधायची

वर्गणीसाठी वही घालून
मंडळी झाडाखाली बसायची
कधी काकांकडून कधी काकूंकडून
वर्गणी दोनदा मागायची

फुगे,नारळ,चिरमुरे,पताका
लिस्ट मोठी असायची 
कधी सुटते शाळा एकदा
घाई होळीभोवती भेटायची

वर्गणी गोळा करत करत
दिवस उजडायचा होळीचा
ढोल..ताशा..वाजवत आम्ही
आई तयार नेवैद्य घेऊन पोळीचा

पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून
बोंबा होळीभोवती मारायचो
चुकलं माकलं गार्हाने घालून
माफीचा नारळही फोडायचो

✍️निशा खरात/शिंदे(काव्यनिश)

©nisha Kharatshinde अलोरयातील होळी

अलोरयातील होळी #Poetry

941de4a35024b42f9783dc8593d615c3

nisha Kharatshinde

महिला दिनाच्या शुभेच्छा 💐
 दुर्गा देवी (परिचारिका)

सिंहारुढ अष्टभुजा ‌शैलपुत्री
पुराणात कथले माहात्म्य तुझे
आदिमाया तू या विश्वाची
नवमं सिद्धीदां नाम दुर्गा तुझे
              
वस्त्राचेही किट बनवूनी
मुकुटाचे तू शील्ड करुनी
प्रोब,स्टेथोस्कोप हाती
सेवेचे काम्य व्रत लेवूनी
               
असंख्य शक्तींचे शक्तरुप तू
कधी सौम्य उग्र हे रुप तुझे
सहस्त्र हाती घेऊनी यंत्रणा
दहावे परिचारिकेचे रुप तुझे
                 
✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde दुर्गा देवी

दुर्गा देवी #Poetry

loader
Home
Explore
Events
Notification
Profile