Nojoto: Largest Storytelling Platform
akashbhise7192
  • 12Stories
  • 24Followers
  • 86Love
    121Views

आकाश भिसे

  • Popular
  • Latest
  • Video
98b17b8a998c734eb87c23d3ee3a8730

आकाश भिसे

मन
मन हे अथांग आभाळाएवढं असतं
ते कशातही मावत नसतं
ते स्वतःच्याच दुनियेत रमत बसलेलं असत
आणि त्याला वाट्टल तसं ते धावत असतं 
पण त्याला घट्ट बांधून ठेवावं लागतं
हे त्या मनाला ठाऊक नसतं.....

कोणीतरी हळूच आपल्या मनात येतं
आणि मनातल्या गाभाऱ्यात घर करून जात 
हे कळत नकळत सारं घडत असतं 
मग, कधी हृदयाच्या स्पंदनाशी नातं जुळत 
आणि यालाच का हो प्रेम म्हणायचं असतं
हे त्या वेड्या मनाला समजतच न्हवत..
कारण, आयुष्यात हे पहिल्यांदाच घडत असतं..

दुःख झाल्यांनतर मन निराश होत 
त्याला खूप सुख हवसं वाटत 
सुख लाभल्यांनंतर ते खूप आनंदीही होत 
पण त्या सुखासाठी अगोदर दुःख भोगावं लागतं 
हे त्या मनाला ठाऊक नसतं......

मन हे द्विधा अवस्थेत सतत डौलत असतं 
विचारांच्या दाट जाळ्यातून आपणच वाट शोधायचं असतं 
मग त्या वाटेवरती कधी डगमगायचं नसतं 
फक्त त्या वाटेवरचे कठीण अनुभव मात्र साठवायचं असतं 
आणि तितक्याच कठीण परिश्रमाने यश आपोआप पदरात पडतं
फक्त मन जाग्यावर ठेऊन काम करायचं असतं   

पुराच पाणी मोठी मोठी झाड वाहून नेत..
पण लव्हाळीच पात मात्र परत आनंदाने डुलत असतं
तसंच असत मित्रांनो आपल्याही मानाचं,
कधी संयमाने तर कधी नम्रतेने वागायचं असतं
थोडासा धीर आणि थोडीशी कळ सोसायचं असतं 
पण, हे त्या मनाला ठाऊक नसतं ...
हे त्या मनाला ठाऊक नसतं...

©आकाश भिसे मन
#Stars&Me

मन #Stars&Me

98b17b8a998c734eb87c23d3ee3a8730

आकाश भिसे

" आई "
जिच्या कुशीत सार जग सामावलेल आहे ती आई..

आज मी लांब आहे म्हणून,
एकटी एकटी घाबरलीस ना वाटलच होत आई.

पण मी सुरक्षित आहे आणि 
स्वतःची खूप काळजी घेतो आहे ग आई.

मी घरा बाहेर पडणार नाही 
याची शाश्वती तुला देतो ग आई.

तुझा आशिर्वाद माझ्या पाठी असताना
मला काही होणार नाही ग आई.

फक्त तू चिंता आणि काळजी
करत बसू नको ग आई

तुझ्या वात्सल्याचा झरा 
मी कधीच विसरणार नाही.

आज जागतिक आई दिनाच्या निमित्ताने
तुला खूप खूप शुभेच्छा देतोय ग आई.

तुला उदंड आणि अरोग्यमय आयुष्य लाभो,
हीच प्रार्थना मी देवापुढे केल्याशिवाय राहणार नाही.

@ आकाश रामराव भिसे. #MothersDay आई
98b17b8a998c734eb87c23d3ee3a8730

आकाश भिसे

व्यथा या वेड्या मनाची

आठवणीत कोणाच्यातरी ते रडत बसलं होतं
डोळ्यातील अश्रू डोळ्यांआडच लपवत होतं 
गालावरच हसू मात्र फक्त आता अभिनयच बनल होतं
ओठावरच गाणं आता बेसुरच ऐकायला येत होतं 

चेहऱ्यावरचा रंग जणू बेरंगच झाला होता
सगळ्यांसोबत असूनसुद्धा एकटेपणाचा भास होतं होता 
आकाशातील ताऱ्यांचा प्रकाश आता फिकट दिसत होता 
रातराणीच्या फुलांचा गंध जणू विरळ पडला होता 

आता, फोन मेसेजेस सगळं कस बंद झाल होतं
पण मानाचं काय? ते तर तुझ्यातच गुंतलेलं होतं 
असं म्हणतात की, प्रेम हे एकदाच 
आणि एकाच व्यक्तीवर होतं असतं..
हो खरंय, तुझ्या आठवणींना आठवून..
माझं मन जणू या गोष्टीच साक्षीदारच बनलं होतं  

आता तुझ्या आठवणीत ते चिंब भिजलं होतं 
 आणि त्याला आता कसलंच भान राहील न्हवत 
काळोखात ते प्रकाशाची वाट बघत होतं 
आणि हरवलेल्या वाटेवर ते तुलाच शोधत होतं

©आकाश भिसे #alone
98b17b8a998c734eb87c23d3ee3a8730

आकाश भिसे

सुबह सुबह जैसे फूल खिलते हैं,
मुसकुराते हुए बहुत अच्छे लगते है।
अपने रूपरंग से सबको आकर्षित करते हैं,
न जाने कहां से ये रूप और मेहेक लाते है।

दिनभर हसते खेलते हुए कितने प्यारे लगते है
भौंरे और तितलियां इनके रूपरंग पे ही मरते है।
ना हावा से डरते है ना धूप से
ना टूटने का डर है ना अलग होने का है,
ये तो भगवान के गले में भी मुसकुराते रहते है,
और पूरा माहोल प्रसन्न कर देते है।

ये एक दिन के जिंदगी में कितनो को खुश कर देते है,
मुरझाने के बाद भी ये अपनी मेहक छोड जाते है।
इतनी चुनौतियों के बाद भी कितनी खुशियां बांटते है,
और हम लोग तो छोटी छोटी मुश्किलों पे रोते रहते है।

                                          @Akash R. Bhise #yellowflower
98b17b8a998c734eb87c23d3ee3a8730

आकाश भिसे

मन

मन हे अथांग आभाळाएवढं असतं
ते कशातही मावत नसतं
ते स्वतःच्याच दुनियेत रमत बसलेलं असत
त्याला वाट्टल तसं ते धावत असतं 
पण त्याला घट्ट बांधून ठेवावं लागतं

कोणीतरी हळूच आपल्या मनात येत
आणि मनातल्या गाभाऱ्यात घर करून जात 
हे कळत नकळत सारं घडत असतं 
मग, कधी हृदयाच्या स्पंदनाशी नातं जुळतं
का? यालाच प्रेम म्हणायचं असत
हे त्या वेड्या मनाला समजत न्हवत
कारण, माझ्या आयुष्यात हे पहिल्यांदाच घडत होत

दुःख झाल्यांनतर मन निराश होत 
त्याला खूप सुख हवसं वाटत 
सुख लाभल्यांनंतर ते खूप आनंदीही होत 
पण त्या सुखासाठी अगोदर दुःख भोगावं लागतं 
हे त्या मनाला ठाऊक नसतं......

मन हे द्विधा अवस्थेत सतत डौलत असतं 
विचारांच्या दाट जाळ्यातून आपणच वाट शोधायचं असतं 
मग त्या वाटेवरती कधी डगमगायचं नसतं 
त्या वाटेवरचे कठीण अनुभव मात्र साठवायचं असतं 
आणि त्याच कठीण परिश्रमाने यश आपोआप पदरात पडतं
फक्त मन जाग्यावर ठेऊन काम करायचं असतं   

पुराच पाणी मोठी मोठी झाड वाहून नेत
पण लव्हाळीच पात मात्र परत आनंदाने डुलत असत 
तसंच असत मित्रांनो आपल्याही मानाचं,
कधी संयमाने तर कधी नम्रतेने वागायचं असत 
थोडासा धीर आणि थोडीशी कळ सोसायचं असत 
हे त्या मनाला ठाऊक नसत...

        
                   © कवी: आकाश रामराव भिसे #मन
98b17b8a998c734eb87c23d3ee3a8730

आकाश भिसे

I know your strength & courage,
your dreams & desires,
your hesitations & fears.
I see how hard you work to grow
& your dedication to heal.
I see your struggle to love yourself,
and I love what I see & what I know.

I believe myself enough to take care of you and see you happy at everytime.

Please be happy & keep smiling ☺️ #alone
98b17b8a998c734eb87c23d3ee3a8730

आकाश भिसे

#Fearless 
#कोरोनाच्या_काळात_पक्षी_बोलतोय...
98b17b8a998c734eb87c23d3ee3a8730

आकाश भिसे

I would always love to support your mighty mission

98b17b8a998c734eb87c23d3ee3a8730

आकाश भिसे

I would always love to support your mighty mission

98b17b8a998c734eb87c23d3ee3a8730

आकाश भिसे

माझ्या गावातली पहाट

पहाटेच्या सुमारास मंद गार वारा वाहतो आहे काय...
मायेच्या पंखाआड झोपलेली पक्षांची पिलं चिवचिव करायला लागतात काय...
पक्षी आपल्या पिलांना अन्न शोधण्यासाठी भटकंती करायला लागतात काय...
भुकेजलेली गाई म्हशींचे वासरं धारेसाठी हंबरडा फोडीत आहेत काय...
तोच तो सूर्य डोंगराआढ सोनेरी किरणांच्या नवीन आशा घेऊन उगवत आहे काय...
गवतांच्या पात्यांवरील दवबिंदुना पाहून वाटते कि, भास्करने हिरे फेकले आहेत काय...
नदी नाल्याच्या पाण्यावररील वाफानी जणू ढगांचा आकार घेतला आहे काय...
डगमगलेली वेली मान वर करून पाहत आहेत काय...
शेतांमधली सूर्यफुलाची झाडं सूर्याकडे टक लावून पाहत आहेत काय...
गावातील तरुण मंडळी तालीम करत सूर्यनमस्कार घालत आहेत काय...
राऊळांमधून भगवंताच्या नावाचा व घंटीचा गजर ऐकू येतोय काय...
"सकाळच्या पारी हरिनाम बोला" आसा गोड आवाज कानी पडतोय काय...
माय माउली आपलं घर स्वछ करून दरवाजामध्ये रांगोळी काढत आहेत काय...
भोळी भाबडी व समाधानी माणसं ती आणि माणुसकी तर लई हाय...
दररोज आपला भूतकाळ विसरून उत्साहानं धडपड करायला लागतात काय…
सर्वानी ठरवलंय कि, आपल्याला प्रगतीचे शिखर गाठायचे हाय...
आणि हेच माझ्या गावातल्या पहाटेच सुंदर दृष्य हाय...
आणि माझ्या कायम आठवणीत राहणार माझ हे गाव हाय...


                                                           © कवी: आकाश रामराव भिसे #स्वप्नातली_पहाट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile