Nojoto: Largest Storytelling Platform
som3429777643187
  • 4Stories
  • 9Followers
  • 14Love
    0Views

Som

  • Popular
  • Latest
  • Video
9b5314efc1f8111cb92421ad3cb80981

Som

_*दर्द, ग़म, डर जो भी है !!*_

          _*बस आपके अंदर है !!*_ 
 
        _*खुद के बनाए पिंजरे से*_ 
            _*निकल के देखो !!*_ 

      _*आप भी एक सिकंदर है !!*_

9b5314efc1f8111cb92421ad3cb80981

Som

*आजचा धृतराष्ट्र*

घराघरातील धृतराष्ट्र
आज अज्ञानाने आंधळा आहे,
अज्ञानी गान्धारीचीही त्याला
मनापासून साथ आहे.

मानमर्यादेच्या लफ्तारांचे आज
वेशीवर धीन्डोरे निघत आहे,
कोण कसा चुकला याचीच चर्चा
मात्र सगळीकडे होत आहे.

ना कृष्णाचा उपदेश आज
कुणाला कळला आहे,
पांडवांच्या चांगुलपणावरही
आज प्रश्न उठला आहे.

कौरवांच्या देशात आज
अराजकतेलाही साज आहे,
हिजड्यालाही आज
मर्दुमकीचा माज आहे.

कळत नकळत घडतात
अनेक गोष्टी,
त्यात खरेपणाची कोणाकडेही
नसते पुष्टी.

खोट्याचे खरे नि खर्याचे खोटे
करणार्यांचा बाजार आहे,
आजच्या लोकशाहितील मनामनाला
भ्रमिष्टपणाचा आजार आहे.
--- *अभ्युदय*

9b5314efc1f8111cb92421ad3cb80981

Som

*शब्द* !!!  
शब्द बोलला जातो,
शब्द पाळला जातो,
शब्द राखला जातो,
एव्हढेच काय !   शब्द दिलाही जातो
पण; पाळण्याचे कोणीही कुठेही ठरवलेले नसते ! 

शब्दाँना  किम्मत असते, 
शब्दांची  गमँत असते, 
शब्दांची दिम्मतही असते, 
या उपर शब्द बाणही असतो, 
काळजाचा ठाव आणि घाव शब्दच घेतो !  

शब्द भिजलेले, 
शब्द निजलेले, 
शब्द भाजलेले, 
नैतिकतेच्या व्यासपीठावर
अनैतिकतेचे हत्यार जेँव्हा शब्द होतात
तेँव्हा शब्द खजिलही झालेले असतात ! 

शब्द धुंद असतात , 
शब्द मंद असतात , 
शब्दाना गंधही असतो , 
पण; राजकिय व्यासपीठावर
समाजाला भ्रमिष्ठ करणारे सुद्धा शब्दच असतात ! 
शब्द लाजाळू ,  
शब्द लाचार , 
शब्द पराक्रमीही , 
वीरत्वाची प्रचीतीही शब्दानेच येते ! 
शब्द बंडाचे निशाण , 
शब्द बदलाचे वारे , 
शब्द दिवसाचे तारे , 
न बोलता सान्गणारेही शब्दच असतात ! 
प्रपंच शब्दांचा , 
कल्लोळ भावनांचा , 
क्षण आपुलकीचा , 
बांधही शब्दांचा फुटत असतो ! 
अक्षरत्वाच्या जाणिवेला
चंगळवादाने पोखरले आहे , 
आज सर्वच व्यासपीठावर
शब्दानेच वाग्देवतेवर बलात्कार होत आहे ! 
                           बलात्कार होत आहे ! 
                               ------ *अभ्युदय*

9b5314efc1f8111cb92421ad3cb80981

Som

*शब्द* !!!  
शब्द बोलला जातो,
शब्द पाळला जातो,
शब्द राखला जातो,
एव्हढेच काय !   शब्द दिलाही जातो
पण; पाळण्याचे कोणीही कुठेही ठरवलेले नसते ! 

शब्दाँना  किम्मत असते, 
शब्दांची  गमँत असते, 
शब्दांची दिम्मतही असते, 
या उपर शब्द बाणही असतो, 
काळजाचा ठाव आणि घाव शब्दच घेतो !  

शब्द भिजलेले, 
शब्द निजलेले, 
शब्द भाजलेले, 
नैतिकतेच्या व्यासपीठावर
अनैतिकतेचे हत्यार जेँव्हा शब्द होतात
तेँव्हा शब्द खजिलही झालेले असतात ! 

शब्द धुंद असतात , 
शब्द मंद असतात , 
शब्दाना गंधही असतो , 
पण; राजकिय व्यासपीठावर
समाजाला भ्रमिष्ठ करणारे सुद्धा शब्दच असतात ! 
शब्द लाजाळू ,  
शब्द लाचार , 
शब्द पराक्रमीही , 
वीरत्वाची प्रचीतीही शब्दानेच येते ! 
शब्द बंडाचे निशाण , 
शब्द बदलाचे वारे , 
शब्द दिवसाचे तारे , 
न बोलता सान्गणारेही शब्दच असतात ! 
प्रपंच शब्दांचा , 
कल्लोळ भावनांचा , 
क्षण आपुलकीचा , 
बांधही शब्दांचा फुटत असतो ! 
अक्षरत्वाच्या जाणिवेला
चंगळवादाने पोखरले आहे , 
आज सर्वच व्यासपीठावर
शब्दानेच वाग्देवतेवर बलात्कार होत आहे ! 
                           बलात्कार होत आहे ! 
                               ------ *अभ्युदय*


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile