Nojoto: Largest Storytelling Platform
shrutikurane3406
  • 7Stories
  • 25Followers
  • 88Love
    5.4KViews

Shruti Kurane

the history has proven that those who dared to imagine the impossible are the one who break all the human limitations

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
9b70a9b5ca4b710a5f2910998b425ae1

Shruti Kurane

# भ्रष्टाचाराचा रावण

# भ्रष्टाचाराचा रावण #Poetry

9b70a9b5ca4b710a5f2910998b425ae1

Shruti Kurane

सपने लेके आया था आंखो मे
मगर जिंदगी बदल गयी पलको में
जिंदगी से हार चुका हू
जिने के भी पार जा चुका हू
अब सामने सिर्फ एक राह बची हैं
बस उसी पे चल रहा हुं
राह कहा थंबती हैं पता नही
मंजिल कहा हैं पता नही
बस चल रहे हैं युही 
क्यों की ये राह कहा ले जायेगी
पता नहीं

©Shruti Kurane
  #RailTrack
9b70a9b5ca4b710a5f2910998b425ae1

Shruti Kurane

क्रांतीवीरांनी बलिदान दिले
या भारतभूमीसाठी 
'बोलो भारत माता की जय ' 
हेच वाक्य साऱ्यांच्या ओठी
१५ ऑगस्ट १९४७ रोजी 
तिरंगा ठरला भारताची शान
भारत देशाला संविधान सभेत
मिळाला धर्मनिरपेक्षतेचा मान
२०२२ रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली
या अविस्मरणीय क्षणाला 
भारत सरकारने नवनव्या योजना आखल्या
उजळून टाकण्या या भारताला 
या दिवशी ना पहिली जात, ना पंथ,
ना झाले वाद जातीय
स्वतःचे भान हरपून झाले
एक धर्मनिरपेक्ष भारतीय
वर्षानुवर्षांचा टप्पा पार करता करता 
झाला याचा बहारदार उत्सव
अनेक जातींच्या अनेक धर्मांच्या साथीनं रंगला आमच्या
धर्मनिरपेक्ष भारताचा अमृतमहोत्सव

©Shruti Kurane
  #i love my India

#i love my India #Poetry

9b70a9b5ca4b710a5f2910998b425ae1

Shruti Kurane

महाराष्ट्राचा 'म',राजर्षींचा 'रा' आणि छत्रपतींच्या जिरेटोपाची
वेलांटी असणारा 'ठी' म्हणजे मराठी
महाराष्ट्राचं अस्सल शंभर नंबरी सोनं म्हणजे मराठी
इथल्या माणसाच्या मनामनात रुजते ती मराठी
छत्रपती शिवरायांचा इतिहास अभिमानाने सांगते ती मराठी
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गुंजते ती मराठी
तुळशीची माळ आणि अभंगाची टाळ म्हणजे मराठी
कर्मवीर भाऊराव पाटलांची शिक्षणसंस्था म्हणजे मराठी
वि. वा.शिरवाडकर यांची लेखणी म्हणजे मराठी
राजर्षी शाहू महाराजांची कुस्ती म्हणजे मराठी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेची
शान म्हणजे मराठी 
महाराणी ताराराणींच्या तळपत्या तलवारीची साक्ष
म्हणजे मराठी
सावित्रीज्योतींच्या ज्ञानाचा नंदादीप म्हणजे मराठी
अहिल्यादेवी होळकरांचे कर्तृत्व म्हणजे मराठी
वीरांचा इतिहास लिहिणाऱ्या या महाराष्ट्राची ही मराठी
इथल्या मातीच्या कणाकणात 
माणसाच्या मनामनात अधिराज्य करते 
ती मराठी

©Shruti Kurane
  # मी मराठी 🚩🚩

# मी मराठी 🚩🚩 #Poetry

9b70a9b5ca4b710a5f2910998b425ae1

Shruti Kurane

जेव्हा मनुस्मृतीने नाकारला होता 
माणुसकीचा हात 
तेव्हा त्या महामानवाने दिली
होती साथ
त्या महामानवाला मी वंदन करतो
चल आज तुला आंबेडकर दाखवतो
शिक्षणाची आवड त्याला स्वस्थ
बसू देत नव्हती
पुस्तकं हातात पडली की त्याला 
वेळ दिसत नव्हती
त्याचीच कथा आज तुला सांगतो 
चल आज तुला आंबेडकर दाखवतो
लहान वयातच त्याला अस्पृश्यतेचे 
चटके बसले 
समाजसुधारणेची जाण ठेवून सगळे 
गुपचूप सोसले 
त्याच्याच संघर्षाची गाथा तुला सांगतो
चल आज तुला आंबेडकर दाखवतो
शिक्षणाच्या साथीनं जिवाचं 
रान केलं 
दलितांच्या गळ्यात ल मडक त्यानेच
तर भिरकावून दिलं
हाच भीमपराक्रम मी तुझ्यासमोर मांडतो
चल आज तुला आंबेडकर दाखवतो
त्याच्यामुळे तुम्ही आम्ही आज सन्मानाने जगतोय
त्याने लिहिलेल्या संविधानावर संपूर्ण
देश चालतोय
याच महामानवाच्या जयंती च तुला आमंत्रण देतो
चल आज तुला आंबेडकर दाखवतो

©Shruti Kurane
  #humanism

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile