Nojoto: Largest Storytelling Platform
harshadabhangale4657
  • 49Stories
  • 20Followers
  • 661Love
    53Views

Harshada Bhangale

Jo Khushi Likhne Mein Hai Woh Aur Kisimein Nahi..💯✨

  • Popular
  • Latest
  • Video
a0254146a2f23beee60ed079e51cc6ae

Harshada Bhangale

एक..कादंबरी!🍁

"का"दंबरी नावाची गोष्ट जगावी
जी बघून समजली तुझ्यामुळे,
कॉलेजच्या त्या असंख्य गर्दीत
एक "ताई" मिळाली तुझ्यामुळे!

"दं"गा मस्ती अन् आनंद घेऊन
झाल्या गोष्टी सोप्प्या तुझ्यामुळे,
आयुष्याच्या प्रवासातल्या शिकवणी
शिकायला मिळाल्या तुझ्यामुळे!

"ब"रेच त्या आनंदाचे क्षण आहेत 
जे सोबत अनुभवले तुझ्यामुळे,
कॉलेजचे दिवस अन् सरप्राईज भेट
त्या आठवणी साठवू शकले तुझ्यामुळे!

"री"तच ती आपली गोष्ट सांगण्याची
सांगून आनंद दुगणा व्हायचा तुझ्यामुळे,
ताई या दोन अक्षरांची खरी व्याख्या
कॉलेजमध्ये मी अनुभवली तुझ्यामुळे!

आयुष्य जग तुझ्या अनोख्या पद्धतीने
त्याला सुंदर बनवायचं तुझ्याच हसण्यामुळे,
शेवटपर्यंत असेल लक्षात प्रत्येकाच्या ही "कादंबरी कदम"
जी जागा तूच कमवली फक्त आणि फक्त तुझ्याचमुळे..!

- चिऊ🐥

©Harshada Bhangale

9 Love

a0254146a2f23beee60ed079e51cc6ae

Harshada Bhangale

धागे-दोरे 

आयुष्याच्या उत्सवात या
धागे-दोरे असे विणले अनेक
न कळताही तो गेला कळून
खराखुरा अर्थ हा त्यांचा एक

एक सुखाचा, एक अपेक्षेचा
एक दुःखाचा, तर एक आनंदाचा
आयुष्याच्या अशा पसाऱ्यात या
विणकर बनून विणला अर्थ स्वानंदाचा

धागे-दोरे म्हणजे जणू काही मीठंच
मीठाशिवाय नसते मज्जा खाण्यालाही
तसेच धागे-दोरे दिसत नसूनही
आणतात खरी सुंदरता त्या नात्यालाही

मीठ वाटणारा जसा पंगतीत
एकदाच फेरी मारून जातो
नात्यांचे धागे-दोरेही तो देव
एकदाच आपल्याकडून विणून घेतो

तोडल्याने तुटत नाहीत
शब्दांनी पुसतातही काही
प्रत्येक नातं हे असतंच असं
जे आधीच सांगून समजत नाही

हर्षदा भंगाळे✍️

©Harshada Bhangale

7 Love

a0254146a2f23beee60ed079e51cc6ae

Harshada Bhangale

वेदनांमध्ये शांततेची ताकद इतकी असायला हवी की, 
तुमच्यासारखी वेदनांवर त्वरित मलम लावून नेहमी आनंदी राहणारी व्यक्ती या जगाने कधी कुठे पाहिलीच नसेल..ना‌ कधी जग पाहील!


-हर्षदा भंगाळे✍️

©Harshada Bhangale #Darknight
a0254146a2f23beee60ed079e51cc6ae

Harshada Bhangale

आयुष्याच्या चित्रकलेत कमी अधिक गोष्टी तर सर्वांकडे असतील! त्या चित्रकलेत वही, कुंचला नसला तरी चालेल..तो ब्रश नसतांनाही ती चित्रकला रंगीबेरंगी बनवू शकतोच की! त्यात वेगवेगळे रंग टाकून ती आणखीन छान घडवू शकतो. हे रंग म्हणजे आपल्यातले गुण! गुणांनी प्रत्येकाला आपलं करून आयुष्याच्या त्या चित्रकलेचं ते पान अगदी दिलखुलासपणे रंगवू शकतो..

फक्त आपल्याला आयुष्यातल्या त्या प्रत्येक रंगाने रंगता यायला पाहिजे..आणि रंगून जगता आलं पाहिजे!



- हर्षदा भंगाळे✍️

©Harshada Bhangale

10 Love

a0254146a2f23beee60ed079e51cc6ae

Harshada Bhangale

प्रेमांकुर : मला कळलेला अर्थ!

प्रेमाच्या अंकुराची व्याख्या म्हणायला गेलो तितकी सोप्पी नसते,
जगातल्या चेहऱ्यांमधे फक्त एकावरच नजर खिळावी अशी काहीशी असते.

पहिल्या भेटीतच हृदयाची घालमेल न सांगता येण्यासारखी असते,
समोर दिसताच एकमेकांना, आजूबाजूच्या गोष्टींची मात्र चिंता नसते.

सर्व गोष्टींत मन रमुन आपोआपच "हसणं" या शब्दाशी गट्टी जमुन जाते,
समोरून संदेश येताच चेहऱ्यावर हास्याची किनार अगदी नेहमीच येते.

भांडणासोबतच एकमेकांची मायेनं काळजी जिथे होतांना दिसते,
प्रेमाच्या कहाणीला जणू काही तिथेच तर सुरुवात होत असते.

"प्रेम" या दोन अक्षरांच्या शब्दात तर भरपूर मोठी ताकद असते,
न सांगताही मनातलं समजून घेण्याइतकी मोठी त्याची महती दिसते.

कधी ना कधी प्रत्येकाच्याच आयुष्यात प्रेमाचं हे बीज फुटतं,
आयुष्यभर मायेनं फुलवून ठेवलं तरच ते ताजंतवानं राहून रोज प्रेमाने नटतं.

अर्थ त्या प्रेमांकुराचा शब्दांच्या माळेत गुंफता येत नसतो,
तो गोड अनुभव आयुष्यात एकदातरी स्वतःच अनुभवायचा असतो.

- हर्षदा भंगाळे.

9 Love

a0254146a2f23beee60ed079e51cc6ae

Harshada Bhangale

आयुष्य..
आयुष्य हे..
आयुष्य हे खूप..
आयुष्य हे खूप अस्ताव्यस्त..
आयुष्य हे खूप अस्ताव्यस्त असून..
आयुष्य हे खूप अस्ताव्यस्त असून जगायला..
आयुष्य हे खूप अस्ताव्यस्त असून जगायला शिकवणारे..
आयुष्य हे खूप अस्ताव्यस्त असून जगायला शिकवणारे असे..
आयुष्य हे खूप अस्ताव्यस्त असून जगायला शिकवणारे असे एक..
आयुष्य हे खूप अस्ताव्यस्त असून जगायला शिकवणारे असे एक हिशोबांचे..
आयुष्य हे खूप अस्ताव्यस्त असून जगायला शिकवणारे असे एक हिशोबांचे गणित..
आयुष्य हे खूप अस्ताव्यस्त असून जगायला शिकवणारे असे एक हिशोबांचे गणित असते, जे..
आयुष्य हे खूप अस्ताव्यस्त असून जगायला शिकवणारे असे एक हिशोबांचे गणित असते, जे भरपूर..
आयुष्य हे खूप अस्ताव्यस्त असून जगायला शिकवणारे असे एक हिशोबांचे गणित असते, जे भरपूर सूत्रांनी..
आयुष्य हे खूप अस्ताव्यस्त असून जगायला शिकवणारे असे एक हिशोबांचे गणित असते, जे भरपूर सूत्रांनी परिपूर्ण..
आयुष्य हे खूप अस्ताव्यस्त असून जगायला शिकवणारे असे एक हिशोबांचे गणित असते, जे भरपूर सूत्रांनी परिपूर्ण असून..
आयुष्य हे खूप अस्ताव्यस्त असून जगायला शिकवणारे असे एक हिशोबांचे गणित असते, जे भरपूर सूत्रांनी परिपूर्ण असून जीवन..
आयुष्य हे खूप अस्ताव्यस्त असून जगायला शिकवणारे असे एक हिशोबांचे गणित असते, जे भरपूर सूत्रांनी परिपूर्ण असून जीवन जगण्याचा..
आयुष्य हे खूप अस्ताव्यस्त असून जगायला शिकवणारे असे एक हिशोबांचे गणित असते, जे भरपूर सूत्रांनी परिपूर्ण असून जीवन जगण्याचा पाढा..

.
.
.
.
.
.

आयुष्य हे खूप अस्ताव्यस्त असून जगायला शिकवणारे असे एक हिशोबांचे गणित असते, जे भरपूर सूत्रांनी परिपूर्ण असून जीवन जगण्याचा पाढा अगदी दरवेळी आपल्याला शिकवून जगण्याच्या या लढाईत उत्तीर्ण करण्यासाठी झटत राहून प्रत्येक नवीन संकटाला सामोरं जाण्याची शक्ती बहाल करत "संकटाला रडणं हा उपाय नसून त्यावर हसत मात करायची" हे ओरडून समजावत असतं अगदी प्रत्येकवेळीच, पण आपण संकटांना घाबरून त्यांचा सामना न करता देवाने दिलेल्या या अनमोल आयुष्याला दोष तर देतो आणि कोणी आपला विश्वासघात केला तरी "माझ्याच नशिबात असं का?" म्हणत रडून त्या जीवनाशीच भांडण करत बसून जणू काही आपल्या आयुष्यातल्या हसणं ह्या सर्व संकटांवर मात करणाऱ्या औषधाला दूर पळवून स्वत:वरचाच विश्वास गमावतो, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे, "आयुष्य कितीही संकटे आणु दे..जिवंतपणी जगण्याचं कधीच सोडणार नाही" ही गोष्ट!!

     
                                                              - हर्षदा भंगाळे✍️ #InspireThroughWriting
a0254146a2f23beee60ed079e51cc6ae

Harshada Bhangale

- Harshada Bhangale

12 Love

a0254146a2f23beee60ed079e51cc6ae

Harshada Bhangale

न उमललेली कळी..!
    कळी!..हा शब्द बघताच डोळ्यांसमोर आली एक छोटीशी, नाजूक कळी! पण ती कळी, जिला आपण फक्त “एक झाडावरची कळी!” असंच म्हणतो, त्या कळीला उमलायला वेळही तितकाच लागत असेल! ती आपल्यासारखी एक व्यक्ती नसली म्हणून काय झालं? कळी, मग फुल..हा बदल होतांना त्यांच्यातही खूप काही होत असेल ना..कदाचित वेदनाही होत असाव्यात त्या कळीला! एक मुलगी, तीसुद्धा एक कळीच असते‌ की! पोटात ९ महिने राहून, आजही या जगात असे काही लोक आहेत..जे मुलगा आहे की मुलगी यावर चाचण्या करून मग ठरवतात, की ते अपत्य या जगात आणायचं की नाही! अशा गोष्टी ऐकल्यावर वाटतं, खरंच आपलं हे जग सुशिक्षित आहे? असेल तर कोणत्या अर्थाने? खरं तर, त्या कळीची खरी कसोटी ही जन्म झाल्यावर या जगात नाही..तर, जन्माला येण्याअगोदरपासूनच सुरु होते!   
    ती कळी स्वतःचा सोडून सगळ्यांचा विचार करते..अगदी आयुष्यभर! आपल्या आईला कधी बघितलय, स्वतः जेवून घेऊन मग नंतर आपल्याला वाढलेलं?..नाही ना? हेच तर एक उत्तम उदाहरण आहे! तिला तर देवाने एक देणगीसुद्धा दिलीये, पण इथे “देणगी” म्हणण्यापेक्षा एक “ताकद” दिलीये असं‌ म्हंटलेलं‌ जास्त योग्य वाटेल. ती ताकद म्हणजे एका नवीन जीवाला या जगात आणण्याची शक्ती! इतक्या वेदना सहन करून एका जीवाला जगात आणणं सोप्पं नाही, तेव्हा तिला होणारा तो त्रास, त्या कळा..खरंच, देवाने तिला जगासाठी निर्माण करताना किती विचार केला असावा, हाच विचार मनात येतो!
    या जगात जिला आदराचं स्थान मिळायला हवं..जे मिळतं सुद्धा, पण काही लोकांच्या त्या वाईट नजरांमुळे आजही तिला स्वतःला सुरक्षित ठेवावं लागतय, घाबरून जगावं‌ लागतय! ते बलात्कारासारखे घाणेरडे प्रकार आजही होतात, मान्य आहे आता कमी झालेयत..पण होतात तर अजूनही ना? ते बंद कुठे झालेत!! त्या वाईट नजरा, समाजात वावरतांना काही लोकांचे मुद्दामून केलेले ते स्पर्श तिला किती त्रास देत असतील, कधी आपण विचार केलाय? तिने ठरवलं तर ती प्रत्येक माणसाला वठणीवरही आणू शकते!..जे ती आणतेसुद्धा! 
    कधी-कधी वाटतं, अशा या स्त्रीला एक कळी म्हणून तर संबोधल जातं..पण एक फुल म्हणून कधी का नाही कोणी बोलत? जगाला तिला उमलू द्यायचं नाहीये की उमललेलं बघायचं नाहीये? कारण, जर तसं नसतं तर आज जगातली लहानापासून ते मोठ्यांपर्यंत ती “प्रत्येक” कळी हसती-खेळती दिसली असती, फुललेली दिसली असती ना! पण, एक गोष्ट मात्र नक्की, जगात काही लोकांमुळे ती तिचं आयुष्य कधीच बरबाद नाही करणार! जगात वाईटपणा असेल तर तीच देवीचं रूप घेऊन त्यांना संपवूनही टाकेल! म्हणूनच ती लढतेय, संघर्ष करतेय..उमलण्यासाठी, आणि एक दिवस या जगातली ती प्रत्येक कळी उमलेल..उमलून दाखवेल, यात तिळमात्र शंका नाही! म्हणूनच तिला “न उमललेली कळी” असं‌ म्हणण्यापेक्षा..“उमलत असलेली कळी!” असं बोललेलं जास्त छान वाटेल, कारण ती उमलतेय..फक्त स्वत:साठी!!
                                                                                                       
  - हर्षदा भंगाळे✍️ #feather

11 Love

a0254146a2f23beee60ed079e51cc6ae

Harshada Bhangale

Read Caption..❤️ जगातला प्रत्येक माणूस आनंदात राहण्याचे स्वप्न तर बघत असतोच🌸..आणि तो आनंद मिळवण्यासाठी ती प्रत्येक गोष्ट करतो, जी त्याच्या चेहऱ्यावर  हास्य आणते❤️. याच जगातले काही लोक असेही असतात ज्यांचं आयुष्य अंधाराने भरलेलं असतं. त्यांनाही आनंदाची चव चाखायला मिळण्यासाठी देव तर सदैव असतोच, पण आपणही हे काम करू शकतोच की💪💯! काम तर सोप्पं असतं..पण तोच थोडासा आनंद कोणाच्या आयुष्यात दिला, की त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रेमाने‌..त्यांच्या त्या चेहऱ्यावरच्या हास्याने जीवनाची खरी गोडी कळते✨. म्हणूनच, एकदा स्वतःकडचा थोडास

जगातला प्रत्येक माणूस आनंदात राहण्याचे स्वप्न तर बघत असतोच🌸..आणि तो आनंद मिळवण्यासाठी ती प्रत्येक गोष्ट करतो, जी त्याच्या चेहऱ्यावर हास्य आणते❤️. याच जगातले काही लोक असेही असतात ज्यांचं आयुष्य अंधाराने भरलेलं असतं. त्यांनाही आनंदाची चव चाखायला मिळण्यासाठी देव तर सदैव असतोच, पण आपणही हे काम करू शकतोच की💪💯! काम तर सोप्पं असतं..पण तोच थोडासा आनंद कोणाच्या आयुष्यात दिला, की त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रेमाने‌..त्यांच्या त्या चेहऱ्यावरच्या हास्याने जीवनाची खरी गोडी कळते✨. म्हणूनच, एकदा स्वतःकडचा थोडास

9 Love

a0254146a2f23beee60ed079e51cc6ae

Harshada Bhangale

आपल्या या चेहऱ्याला आपण आरशातून बघू शकतो, मोबाईलच्या कमेऱ्यातून बघू शकतो..
पण,
स्वतः मात्र स्वतःच्याच चेहऱ्याला संपूर्ण आयुष्यभरात कधीच बघू शकत नाही..



..बघायला गेलं तर ही खूप छोटी गोष्टंय..पण, सत्य मात्र आहे! #Camera

12 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile