Nojoto: Largest Storytelling Platform
kavee2872324569311
  • 3Stories
  • 5Followers
  • 13Love
    0Views

kavee...

har roz ek nayee ummid ke saath jeeti hoon...

  • Popular
  • Latest
  • Video
ad158e3ac02da2920709a8cc00c2dd70

kavee...

तक्रार

लिहायचे खूप आहे
लिहिण्यासारखे काही नाही
आठवणी ही खूप आहेत
पण सांगण्यासारखे काही नाही...

जग आले जवळ माझ्या 
पण आपलं कोणी वाटत नाही
गर्दी खूप दिसते 
पण माणूस कोणी भेटत नाही

जग सुंदर दिसते
पण चेहरा नीट कळत नाही
भास खूप होतात
पण खरं काही कळत नाही

आसपास सगळेच होते
पण जवळच कोणी वाटलाच नाही
लोकांना मित्र कसे भेटतात
माझी सावलीही रात्री टिकत नाही

खूप झाले लिहून
वाचणार तर कोणीच नाही
तक्रारी कशाला मांडायच्या?
ऐकणार तर कोणीच नाही... तक्रारी असल्या तरी त्या आपल्यापुरता ठेवून जगावं...

तक्रारी असल्या तरी त्या आपल्यापुरता ठेवून जगावं...

2 Love

ad158e3ac02da2920709a8cc00c2dd70

kavee...

झुळूक

सांजवेळी हळव्या पावलांनी
वाऱ्याचा एक झोक
हळूच कानाशी काहीतरी सांगून गेला...

निःशब्द शांततेचा भंग 
करायचा मान मिळवून
तसाच निघूनही गेला...

काय बोलला माहीत नाही,
पण काहीतरी बोलला नक्की,
खरं होत का भास?

शब्द नाही समजले
पण भावना जाणवली
अगदी हृदयापर्यंत...

त्यांची भाषाच वेगळी
निशब्द आहे,
पण अबोल नाही...

केसांना हळूच झालेला
तो अनामिक स्पर्श,
काहीतरी ओढ जाणवली...

वाऱ्याचा तो एक झोक
कुठून आला, कुठे गेला
माहीत नाही...

पण त्याच्या त्या एका स्पर्शाने
आज मला भाग पाडले,
त्याचा विचार करायला... रोजच्या धावपळीतून थोडा वेळ तर काढायलाच हवा.. त्यांच्यासाठी...
ज्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप आहे...

रोजच्या धावपळीतून थोडा वेळ तर काढायलाच हवा.. त्यांच्यासाठी... ज्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप आहे...

6 Love

ad158e3ac02da2920709a8cc00c2dd70

kavee...

ती

 जाणार तर सोबत होतो,
पण ती एकटीच निघून गेली...
दुःख सोबत भोगणार होतो,
पण ती एकटीच रडवून गेली...

संकटात सोबत राहणार होतो,
पण ती एकटीच वणवा पेटवून गेली...
जाताना फक्त हसत राहिली,
मग मला का रडवून गेली...

प्रत्येक पावलावर साथ देणार होतो,
पण रस्ता बदलून निघून गेली...
त्या पावलांचा पाठलाग तर नाहीच,
पण ठसे मिटवून निघून गेली...

मी तर फक्त बघत राहिलो,
ती तर आधीच निघून गेली...
डोळ्यांतले अश्रू आटत आले,
तर चिता आधीच विझुन गेली... कोणाच्या तरी जीवनात अशी ती असेलच...
काहींनी तिला विसरून जगायला शिकले असेलच...
पण एकदा तिची आठवण काढू...
काय माहित तीही कुठे तरी तुमच्यासाठी असेलच...

कोणाच्या तरी जीवनात अशी ती असेलच... काहींनी तिला विसरून जगायला शिकले असेलच... पण एकदा तिची आठवण काढू... काय माहित तीही कुठे तरी तुमच्यासाठी असेलच...

5 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile