Nojoto: Largest Storytelling Platform
balaji6593555007273
  • 38Stories
  • 65Followers
  • 620Love
    0Views

balaji boinwad

माझिया अभंग! share करतो तुमचिया संग!! द्यावे उत्तर वाचुनी! एक comment रूपी!! शक्य होईल त्याने ! जवळ जाणे हृदया!! भाव व्यक्त करता! सुधारीत शब्दाने!!

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
ad55e39d62f921bb1db9afc1ace11f4f

balaji boinwad

बाप


विश्वाचा व्याप!असे रे बाप!!
नाही रे त्रैलोक्य!काही त्याच्याविण!!
देवांनाही मान्य!नसे तो सामान्य!!
नाही तो अन्य! बापाविण!!१!!

© balaji boinwad #father

7 Love

ad55e39d62f921bb1db9afc1ace11f4f

balaji boinwad

गरुडाचे वारिके कासे पीतांबर । 
सांवळे मनोहर कै देखेन ॥१॥ 
बरवया बरवंटा घनमेघ सावळा । 
वैजयंतीमाळा गळा शोभे ॥२॥ 
मुकुट माथा कोटी सूर्यांचा झळाळ ।
कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी ॥३॥ 
श्रवणी कुंडले नक्षत्रे शोभती ।
रत्नप्रभा दीप्ती दंतावळी ॥४॥
ओतीव श्रीमुख सुखाचे सकळ । 
वामांगी वेल्हाळ रखुमादेवी ॥५॥
उध्दव अक्रूर उभे दोही कडे । 
वर्णिती पवाडे सनकादिक ॥६॥
तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा ।
तोची माझा सखा पांडुरंग ॥७॥

© balaji boinwad #tukarangathaabhang
ad55e39d62f921bb1db9afc1ace11f4f

balaji boinwad

तुकाराम महाराज गाथा, अभंग -- कर कटावरी तुळशीच्या माळा ।

कर कटावरी तुळशीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ।। १ ।।
ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ।। २ ।।
कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वाहिली ऐसी मूर्ती ।। ३ ।।
गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवे मानसी तेंचि रूप ।। ४ ।।
झुरोनी पांजरा होऊं पाहे आता । येई पंढरीनाथा भेटावया ।। ५ ।।
तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करू नये ।। ६ ।।

© balaji boinwad #tukarammgaathaabhang
ad55e39d62f921bb1db9afc1ace11f4f

balaji boinwad

राजस सुकुमार मदनाचा पुतळा |रविशशिकळा लोपलिया ||1||

कस्तुरीमळवट चंदनाची उटी | रुळे माल कंठी वैजयंती ||धृ||

 मुगुट कुंडले श्रीमुख शोभले | सुखाचे ओतले सकळ ही ||2||

कासे सोनसळा पांघरे पोटोळा | घननीळ सावळा बाईयानो ||3||

 सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा | तुका म्हणे जीवा धीर नाही ||4||

© balaji boinwad #तुकारामगाथाअभंग
ad55e39d62f921bb1db9afc1ace11f4f

balaji boinwad

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥

गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥

विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥

तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥

© balaji boinwad #तुकाराम गाथा अभंग

#तुकाराम गाथा अभंग

7 Love

ad55e39d62f921bb1db9afc1ace11f4f

balaji boinwad

तुकाराम महाराज
अभंग!!१!!


समचरण दृष्टि विटेवरी साजिरी! तेथे माझी हरी वृत्ती राहो!!१!!
आणिक न लगे मायिक पदार्थ! तेथे माझे आर्त नको देवा!!२!!
ब्रह्मादिक पदे दु:खाची शिराणी। तेथे दुश्चित झणी जडो देसी!!३!!
तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म!जे जे कर्मधर्म नाशवंत!!४!!

© balaji boinwad #तुकाराम महाराज अभंग

#तुकाराम महाराज अभंग

7 Love

ad55e39d62f921bb1db9afc1ace11f4f

balaji boinwad

सांज सावली

मेल्यावरी येतो पाऊस आसवांचा,
जगण्यात सांग कोठे लपतात हे जिव्हाळे,
वाकून चाल तु ही,लढण्यात जिंदगीशी,
पाण्याखाली विनम्र झुकती जसे लाव्हाळे,
जाता बुडूनी सांज पोटात सागराच्या,
माझे अबोल गाणे पाण्यावरी खळाळे,

स.व.गोडसे

© balaji boinwad

5 Love

ad55e39d62f921bb1db9afc1ace11f4f

balaji boinwad

अभंग

बुध्दी हाची प्रपंच! या जडजीवा!!
दोर धरता सहज!अध्यात्माची!!
बघता आयाम! शाश्वत विज्ञानी!!
फेडता ऋण! संवर्धित वसुंधरा!!

© balaji boinwad #अभंग##

अभंग##

8 Love

ad55e39d62f921bb1db9afc1ace11f4f

balaji boinwad

अभंग

वेचावे क्षण! ओळखुनी मन!!
सुखाचे धन!कमावाया!!१!!
असंगाचा संग! करी जीवनाचे व्यंग!!
पाहता होशाल दंग!मागे वळूनी!!२!!

© balaji boinwad #findingyourself
ad55e39d62f921bb1db9afc1ace11f4f

balaji boinwad

अभंग (बुद्धांचे विचार)

कमी न होई दुःख ! दुःखात दुखी होता!! 
सुखास सर्वकाही समजता! सदा सर्वदा!!१
 न जमे करता विवेचन! सत्य असत्याचे!!
 तर ते ज्ञान का?उपयोगाचे! असे स्वतसही!!२

कुणा काडिभरही! वैर देई का? वैराग्य!!
जे प्रेमाने होई साध्य! असे सामान्यजना!!३
 देई ध्यान-मौन जी शक्ती चैतन्य रूपी!!
 तेची सर्व संपत्ती! बौध्द तत्वांची!!४

© balaji boinwad

9 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile