Nojoto: Largest Storytelling Platform
shubhangikadam3225
  • 103Stories
  • 133Followers
  • 822Love
    8.4KViews

Shubhada

writer and poet

  • Popular
  • Latest
  • Video
b2b6314d17ca08639a36c357e774b275

Shubhada

जसा दूर एकांती वारा 
विझण्यासाठी झरतो
त्याच रित्या वातीशी 
धागा काजळलेला उरतो

जळतो केव्हा काहुरताना
निपचित त्रागा विरतो
म्हणतो वणवा धगतो पावा
सूर काळजीतला नुरतो

©शुभदा

©Shubhada #MereKhayaal
b2b6314d17ca08639a36c357e774b275

Shubhada

मंद मंद ताऱ्याचे विझणे अलगद यावे दारी
काहूर मनाशी भरून यावे रंग क्षती अवेळी

©Shubhada #LastDay
b2b6314d17ca08639a36c357e774b275

Shubhada

आक्रोश बोलत नाही विरघळत राहतो शांततेत निपचित सांडलेल्या भयाण वेदनेसारखा

©Shubhada #Rose
b2b6314d17ca08639a36c357e774b275

Shubhada

अस्तित्वाच्या निर्जीव कुंपणाभोवती रेंगाळणारी
वास्तवतेची जाणीव आणि तिथल्या मुक्या झाडाभोवती
हिरव्या रंगाचे श्वास वेचणारी मी यातले मार्मिक रेखाटन
कधीतरी जिवंत होईल या आशेवर मुक्यान जगत असावीत
अंधारातल्या सावलीपल्याड जगणारी झाडं

©Shubhada #Trees
b2b6314d17ca08639a36c357e774b275

Shubhada

परीघातले प्रवास असतात जिथे नसतात सोबतीला शब्द
एका वास्तवाची ओळख आणि  ओंजळ मात्र निःशब्द

©Shubhada #droplets
b2b6314d17ca08639a36c357e774b275

Shubhada

वाटेत पावलांची साऊल दाट आहे
परतीस ना म्हणाया निःशब्द वाट आहे

©Shubhada #WalkingInWoods
b2b6314d17ca08639a36c357e774b275

Shubhada

#MessageOfTheDay शब्दात मौन माझ्या
बांधून कोण गेले
झुरते अशा अवेळी
बिलगून कोण गेले

©Shubhada #Messageoftheday
b2b6314d17ca08639a36c357e774b275

Shubhada

सांजपावली पानावरची
एक सय गव्हाळ
सापडलेल्या गर्दीमधलं
एक मन गहाळ

©Shubhada #alone
b2b6314d17ca08639a36c357e774b275

Shubhada

अंधार सांडताना
निशिकांत आज वेली 
मी फुल वेचले अन
कलिकांत रात्र झाली

©Shubhada #touchthesky
b2b6314d17ca08639a36c357e774b275

Shubhada

अबोलक्या स्वरांचे
माझेच गीत होते
मी स्तब्धले मुक्याने
अन शब्द दूर होते

©Shubhada #Darknight
loader
Home
Explore
Events
Notification
Profile