Nojoto: Largest Storytelling Platform
pratimapatil0307
  • 3Stories
  • 8Followers
  • 32Love
    0Views

pratima patil

  • Popular
  • Latest
  • Video
b8bb756ec26d251e9d65d88faa57aa29

pratima patil

ती..

हरवले आहे आज तिचे मन 
कोणास ठाऊक काय आहे त्याच कारण
ना चेहऱ्यावर भाव ना विचारांचा ठाव 
कशाचा झालाय नेमका हृदयावर घाव

मधूनच पडतोय नेत्राचा कटाक्ष 
अजाणतेपणी देतोय कशाची तरी साक्ष
भरकटलेल्या मनाला लागलेली ही आस 
श्वासाश्वासात दडलेला हा नवीनच ध्यास
देतोय कुणाच्या तरी असण्याचा आभास

भावनेच्या सागराला लागलेली ही ओढ 
 शोधतेय कुणाच्या अस्तित्वाचे गुढ
संपणार तरी कधी ही विचारांची गुंतागुंत 
की तो अफाट सागर विसरलाय स्वतः चाच अंत

मनी हीच अभिलाषा सुटावे कधी तरी हे कोडे
बहरावा विचारांचा वसंत ऋतू असाच
आणि जगावे हे आयुष्य 
ह्याच विचारांसह रोज थोडे थोडे

आता समीप आलीय ती चांदणी निशा
जेव्हा दिसेल ती मनातली धूसर प्रतिमा..

                                              - प्रतिमा

6 Love

b8bb756ec26d251e9d65d88faa57aa29

pratima patil

किनारा 


शोधत होते किनारा 
चाचपडते हात अन् भेदरलेल्या नजरा 
नियतीच्या खेळीची कबुली देई 
प्रचंड बोचनारा तो शहारा 

थकून गेला जीव 
शेवटी गेले शरण
गुंतने तरीही सरेना 
आठवणींमध्ये जगे सुन्न मन

दूरवर दृष्टी फिरवून 
हलकासा घेतला कानोसा 
क्षणिक विचार मनात आला 
माहित नसलेल्या उत्तरांच्या मागे 
का होतोय श्वास वेडापिसा 

विचारांचे पाश तोडून
 अर्धवट सोडलेल्या वाटचालीस 
पुन्हा केला इशारा 
खुल्या आसमंतात खळखळून हसताना 
स्वतः मधेच गवसला किनारा ...

                                  - प्रतिमा # just feel # kinaara

# just feel # kinaara

4 Love

b8bb756ec26d251e9d65d88faa57aa29

pratima patil

 # bestmemoryever

# bestmemoryever

22 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile