Nojoto: Largest Storytelling Platform
niteshgomane7681
  • 47Stories
  • 58Followers
  • 227Love
    66Views

Nitesh Gomane

  • Popular
  • Latest
  • Video
bf9ea49b0c0ffca633be3fa6cad84190

Nitesh Gomane

*खऱ्याची साथ देणारे मोजकेच मिळतील परंतू, खोट्याच्या सोबतीला अनेकजण मिळतील कारण, लोकांना खरं पचत नाही आणि खोट्याला मात्र डोक्यावर घेवून मिरवतात. खरं हे तेजस्वी असतं ते एक दिवस सगळ्यांसमोर येतेच फक्त त्यासाठी संयम असणे गरजेचे आहे.*

✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे.

10 Love

bf9ea49b0c0ffca633be3fa6cad84190

Nitesh Gomane

*प्रेमळ एवढे बना की, समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलण्यात आपली आई दिसली पाहिजे आणि कष्टाळू एवढे व्हा की, समोरच्या व्यक्तीला त्यात आपले वडिल दिसले पाहिजेत कारण, मेहनत आणि प्रेम याचा संगम म्हणजे आईवडील.*

✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे.

10 Love

bf9ea49b0c0ffca633be3fa6cad84190

Nitesh Gomane

पंढरीची वारी 
        (चाल :-दिस सोन्याचा उंगवला )
मुखी विठ्ठल विठ्ठल हरी , संगे टाळ मृदंग करी 
नाचत , डोलत निघाली बघा वारकऱ्यांची वारी .....॥ धृ॥
        आले भरून हे आभाळ 
        पाऊस पडून झाली हिरवळ 
        मनी एकच ही तळमळ 
        दिसे नयनी तो विठ्ठल ......२
त्याच्या नामात रंगुनी , वाट चाले हा वारकरी .......॥ १॥
        वळणावळणाची वाट 
        आहे आवघड वारीचा घाट 
        जमून आले धुके हे दाट 
        संगे घेउनी वाऱ्याची लाट .......२
ऊन , पाऊस , वारा झेलीत येती तुझ्या भेटीला सारी ....॥ २॥
        आले सामोरे पंढरपूर 
        डोळा दिसे तुझे मंदिर 
        तुझे सुंदर रुप पाहून 
        येई भरून हे तनमन ......२
आस एकच होती मनी , माथा ठेवीन चरणावरी .....॥ ३॥
              
✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे.

11 Love

bf9ea49b0c0ffca633be3fa6cad84190

Nitesh Gomane

*बदनामीचा चिखल उडाला म्हणून आपण आपले ध्येय, आपले विचार बदलाचे नाही...*
*कारण बदनामी हि आपल्यांकडून, इतरांकडून,तुम्ही ज्या क्षेत्रात आहात तिथूनही होईल म्हणून आपण कोपऱ्यात बसून राहायचे नाही...*
 
कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे.

8 Love

bf9ea49b0c0ffca633be3fa6cad84190

Nitesh Gomane

*सुखाची वाट चालताना आनंदाने चाला परंतू, दुःखाची वाट चालताना संयमाने चाला. दुःखाची वाट चालताना पायाला काटे खूप टोचतील परंतू, आपली वाट मात्र बदलू नका.*

✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे.

6 Love

bf9ea49b0c0ffca633be3fa6cad84190

Nitesh Gomane

*यशाची शिखरे गाठायची असतील तर  स्वतःला चांगुलपणाची शिकवण द्यावी लागते.*

 ✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे.

9 Love

bf9ea49b0c0ffca633be3fa6cad84190

Nitesh Gomane

श्रध्दांजली गीत 
भारत भू च्या रक्षणाला ,शूर जवानांनी देह झिजविला 
आहुती प्राणांची दिली , ह्रुदयातून वाहतो श्रध्दांजली..!!धृ!!
      १४ फेब्रुवारी दिवस उजाडला 
       काळाने बघा डाव हा साधला ....२
      अतिरेक्यांनी हल्ला केला 
     ४२जवानांवर गोळीबार केला ....२
भारत भू च्या सुपुत्रांची, प्राणज्योत मावळली....!!१!!
      माय, बाप, लेकरांचा विरह घडला 
      पति पत्नीचा धागा तुटला ......२
      लेकरास बघण्या तू नाही आला 
      तिरंग्यात लपेटून तुझा देह आला ...२
कुटूंबाकडे फिरवूनी पाठ देश रक्षणाला काया ही  झिजविली.!!२!!

✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे.

10 Love

bf9ea49b0c0ffca633be3fa6cad84190

Nitesh Gomane

*प्रसिद्धी आणि श्रीमंतीच्या काळात जर संयम सोडाल तर समजून जायचं की शून्यात यायची वाटचाल आपण सुरु केली.*
✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे.
●कोणीही स्वतःवर ओढून घेवू नये.
🙏🙏🙏🙏

12 Love

bf9ea49b0c0ffca633be3fa6cad84190

Nitesh Gomane

*आरशामध्ये पाहताना अभिमानाने पाहा की आपण माणूस म्हणून जन्माला आलो आणि माणसासमोर वागताना, बोलताना माणुसकीने वागा आणि तेंव्हासुध्दा माणूस म्हणून जन्माला आल्याचा अभिमान बाळगा.*
😊😊😊😊😊
✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे.

12 Love

bf9ea49b0c0ffca633be3fa6cad84190

Nitesh Gomane

*जास्त कोणाला देवू नका सल्ले...*
*आजकाल लोकं अचानक करतात हल्ले...*
😊😊😊😊😊
✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे.

9 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile