Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser7040578856
  • 12Stories
  • 13Followers
  • 16Love
    64Views

समीर

  • Popular
  • Latest
  • Video
c25133ab133990b48499fcad2d6ff3d9

समीर

#संवाद हरवत चाललाय आपल्यातला कुठेतरी

#संवाद हरवत चाललाय आपल्यातला कुठेतरी

c25133ab133990b48499fcad2d6ff3d9

समीर

संवाद हरवत चाललाय 
आपल्यातला कुठेतरी,
कुठे ते नक्क्की ठाऊक नाही,
कदाचित तुझ्याशी सारखं 
बोलण्याच्या इच्छेत,
किंवा तुझं माझ्याशी 
न बोलण्याच्या इच्छेत...

संवाद हरवत चाललाय 
आपल्यातला कुठेतरी,
कदाचित तुझ्याशी न बोलता 
राहावंत नाही म्हणुन 
मी सारखं बोलतो...
पण दिवसभराच्या कामातून
हल्ली तुला वेळ कमी पडतो ..

संवाद हरवत चाललाय 
आपल्यातला कुठेतरी,
पूर्वी सारखे तासनतास 
फोन नाही होत हल्ली 
रात्रीअपरात्री आपल्यात...
ना कधी आठवण काढतेस जेव्हा 
तु रुसुन बसतेस
 शांत एका कोपऱ्यात..

संवाद हरवत चाललाय 
आपक्यातला कुठेतरी,
सारख ऑनलाईन बोलण्यानी
की तुला सारखा मेसेज केल्यानी..?
ठाऊक नाही पण 
मनातल्या भावना नक्कीच कुठेतरी 
रुसुन बसल्यात तुझ्या एवढं मात्र नक्की...
आभास

c25133ab133990b48499fcad2d6ff3d9

समीर

#देवमाझा
c25133ab133990b48499fcad2d6ff3d9

समीर

मंदिराच्या गाभाऱ्यात शोधता शोधता
तु तर मनाच्या कोपऱ्यात भेटलास...
उगाच फिरलो वणवण 
तु तर प्रत्येकात विसावलास...
आभास

c25133ab133990b48499fcad2d6ff3d9

समीर

#आभास
c25133ab133990b48499fcad2d6ff3d9

समीर

तू ,मी,पाऊस  
आणि आपल्या दोघात एकच छत्री 
जोरदार पाऊस येऊदे
सोसाट्याचा वारा सुटू दे
शोधू आडोसा कुठेतरी 
तू मी पाऊस 
आणि आपल्या दोघात एकच छत्री 

तू भिजल्यावर चिडचिड करते
पण मला तुझे तेच ओलेचिंब रूप आवडते
मग तुही घेतेस मला भिजायला 
कारण छत्रीत जागाच नसते..
तू मी ,पाऊस 
आणि आपल्या दोघात एकच छत्री 

वाफाळलेला चहा हवा तुला
गरमागरम भजी हवी
बरसूदेत फक्त सरींवर सरी
तू मी पाऊस 
आणि आपल्या दोघात एकच छत्री 

संध्याकाळची ती कातर वेळ 
पावसाचाही खट्याळ खेळ 
सतत एकच भीती अंतरी
आपल्याला पाहिल कोणीतरी
तू मी ,पाऊस आणि आपल्या दोघात एकच छत्री 

आभास #आभास
c25133ab133990b48499fcad2d6ff3d9

समीर

#आभास
c25133ab133990b48499fcad2d6ff3d9

समीर

या खिडकीत फक्त सावल्या 
तुझ्या माझ्या आठवणींच्या..
रिकाम्या या जागेवरती 
केलेल्या पहिल्या प्रवासाच्या...
आभास

c25133ab133990b48499fcad2d6ff3d9

समीर

#वैभवजोशी✌❣❣

वैभवजोशी✌❣❣

c25133ab133990b48499fcad2d6ff3d9

समीर

अशा या एकांतात
मीच माझा सोबती..
कित्येक आले ,
क्षण हसरे तरी 
मीच माझा सांगाती..
#आभास
loader
Home
Explore
Events
Notification
Profile