nojotouser6662061900
  • 58Stories
  • 111Followers
  • 273Love
    0Views

राज श्री

  • Popular
  • Latest
  • Video
c2dd2558c756fe2c3284ea18cd8e8409

राज श्री

एखादा माणूस राग किती सहजपणे 
व्यक्त करतो
प्रेम ही तो तितक्या सहजपणे 
व्यक्त करू शकला असता तर
जगणं  किती सुंदर झालं असतं
कारण चूका ह्या दाखवण्यापेक्षा
त्या स्विकारण्यात  मोठेपणा  असतो

c2dd2558c756fe2c3284ea18cd8e8409

राज श्री

सासर माझं सुखाचं नंदनवन
तरीही येते मला माहेरची आठवण
व्याकूळलेले डोळे माझे
आठवणीने तुमच्या पाणावले
दारी माझ्या स्वर्ग जरी
मन माझे माहेरी भरकटते
कळतंय मला सार काही 
माहेरी येणं शक्य नाही 
पण कशी समजावू मनाला 
वेडं माझं ऐकत नाही 
व्यथा माझ्या जाणीतो तो
तो माझा  प्रिय प्राणसखा
त्याच्या प्रेमळ शब्दांनी 
विसर होतो विरहाचा
घालते मनाला मग 
माझ्या मीच विळखा
सासरच्या अंगणातच शोधते
मगा सुगंध माहेरचा

c2dd2558c756fe2c3284ea18cd8e8409

राज श्री

कशी सांगू तूला गं आई
जीवाची माझ्या घालमेल 
माहेरच्या आठवणीने
जीव कासावीस होई
किती दिवस झाले आई
तुला पाहिले नाही 
बाबांसोबत मनसोक्त 
भरभरून बोलले नाही 
सासर माझं असल
सोन्याचा पिंजरा जरी
माहेरच्या आभळमायेत
घ्यावीशी वाटते गंआई
मला उंच भरारी
मनातल्या सारे विचार 
इथेच ठेवून जावेत सासरी 
दोन दिवसापुरतं विसरून बाईपण
व्हावी तुमची लाडकी सोनपरी
खूप वाटतंय गं मला आई
यावं चार दिवस माहेरी 
माहेरच्या आठवणीने
डोळ्यांत दाटतयं पाणी माहेर

माहेर

c2dd2558c756fe2c3284ea18cd8e8409

राज श्री

मी आणि तो
              सोबतीला पाऊस
       झोंबणारा गार वारा
                   अंगावरी येई शहारा 
            स्पर्श तुझा हवाहवासा
                         जवळी असा घे राजसा

c2dd2558c756fe2c3284ea18cd8e8409

राज श्री

बापाची महती सांगायला 
कुणा एक दिवस का
खास असावा 
ज्याच्यामूळे आपला 
प्रत्येक दिवस आज
खास आहे

c2dd2558c756fe2c3284ea18cd8e8409

राज श्री

बाबा रे तुझी मी लाडकी परी
मीच तर आहे तुझी छोटीशी बाहुली
तुझ्याच घरट्यात माझी दुनिया सामावली
मी तर तुझ्या अंगणातली इवली चिमणी 
मी आहे बाबा तुझीच रे सावली 
तुझ्या प्रेमाच्या वृक्षाखाली मी विसावली
ऊन्हामध्ये स्वतः राबून मला मात्र 
मायेच्या सावलीत वाढविलसं
दोन्ही हातानी धरून चालायला शिकवलंस
पाठीवर बसवून हे जग दाखविलसं
मीच तर आहे बाबा तुझी दुनिया हसरी
मग का दिलसं मला परक्या घरी 
पती असला माझा लाखमोलाचा जरी
पण तीथे आहे बाबा तुझीच रे कमी
थोर तुझे उपकार बाबा  नाही मी विसरणार
तूच तर आहेस बाबा माझ्या 
जीवनाचा खरा शिल्पकार बाबा

बाबा

c2dd2558c756fe2c3284ea18cd8e8409

राज श्री

वाढदिवस आज तुझा
कळत नाही दिवस हा
आनंदाचा की दुःखाचा 
क्षण होता तो सोन्याचा 
ज्या क्षणाला जन्म तूझा झाला 
विधात्याने सांगितलं का रे कानी
आयुष्य आहे थोडसं तुझं 
घे मनसोक्त सुंदर जगुनी
वाटत असेल तुलाही 
जाव पुन्हा एकदा परतुनी
कर ना रे ईश्वर  चरणी
आज एकच मागणी 
जाऊ दे ना देवा मला 
आज नव्याने जन्मुनी

c2dd2558c756fe2c3284ea18cd8e8409

राज श्री

दोन पाखरांचा संसार
त्याला फांदीचा आधार 
घरटे होते ते सुंदर 
पिल्ले होती तयांची चार 
चिमणा चिमणी ती कष्टाळू
वाट पाहे घरट्यामध्ये पिल्लू 
जिवाची होई घालमेल
पण पिल्लांसाठीच तडफड
एक दिवस तो आला
चिमण्याचे पंख गेले वाया
चिमणी करे गयावया
चिमणा झाला मनानेही अपंग
चिमणी म्हणे मीआहे तुम्हासंग
दुनिया आहे ही रंगीन
तीचा लागे ना निभाव
ती एकटी बिचारी 
पेलवेना तीला जबाबदारी 
नियतीच्या मनात भलतेच 
होत्याचे नव्हते  झाले 
चिमणी गेलं सारं सोडून 
पिल्लांना पोरकी करून 
चिमणा सांभाळे कसाबसा 
पिल्लांना आधार होता त्याचा
दोन पिल्लू झाले मोठे 
बांधले स्वतःचे घरटे
मग चिमणाही गेला 
पिल्लांना एकटे टाकून 
दोन जीव ती लहान 
पडला त्यांच्यावर आकांत
जगणे होते ते कठीण 
पदरात पोरकेपण
पण जिद्द नाही सोडली 
या दुनियेशी लढली
मोठी झाली  दोघेही 
एकमेकांना सांभाळत
चारही पाखरे सुखाने 
आनंदाने नांदू लागली 
पण  तरीही शोधे नजर
कुठे  दिसतील  का
आमची  बाबा  अन् आई
कुठे  दिसतील  का
आमची  बाबा  अन् आई
    विद्या  पाटील घरटे

घरटे

c2dd2558c756fe2c3284ea18cd8e8409

राज श्री

अरे कोरोना कोरोना
 जन्म तुझा झाला चायना
इतकासा जीव तुझा
देशोदेशी नाव तुझा
हैरान झाली रे जनता 
ध्यास फक्त आहे तुझा
खेळ तुझा हा जीवघेणा
काय करावे कळेना
भारत आहे देश आमचा
समजू नको तू चायना
इथेच आहे मरण तुझे
होईल नायनाट तुझा

c2dd2558c756fe2c3284ea18cd8e8409

राज श्री

स्त्री जन्मा तुझी कहाणी 
सुख असो वा दुःख 
तुझ्या नयनी पाणी 
धरणी तू या देशाची
सारी दुनिया उभी तुझ्यावरती
माय तु लेकराची
आई सा- या दुनियेची
नारी तुला न उपमा कशाची ? 
झेप तुझी जरी चंद्रावरी
परी पंख तुझे त्याच्या हाती 
कितीही कष्ट केलेस तरी 
किंमत तुझी कवडी मोलाइतकी
विश्वाची या कर्ती तू
तरीही माघार तुझ्या पदरी
तोडूनी सारे बंधन 
कर स्वतः चे रक्षण 
तूच आहेस तुझी बंधिनी
स्त्री जन्मा तुझी कहाणी स्त्री तुझी कहाणी

स्त्री तुझी कहाणी

loader
Home
Explore
Events
Notification
Profile