Nojoto: Largest Storytelling Platform
ganeshphapale7234
  • 79Stories
  • 570Followers
  • 909Love
    387Views

Ganesh Phapale

the dreamy writers ✍✍

  • Popular
  • Latest
  • Video
c43a22ea3b5fda95f224b4977fe10596

Ganesh Phapale

🤝मैत्री एक अतुट नाते 🤝

मैत्री म्हणजे एक ध्यास
घेतला तर एक निर्मळ श्वास
अनुभवला तर सुंदर असा भास.. 
मैत्री जणू दुःखाचा ऱ्हास तर सुखाचा उल्हास... 

मैत्री कुणासाठी परवणी तर
कुणाला नव्या जुण्या आठवणी, 
काही साठवणी तर कधी काही सुख दुःखाची झालेली पाठपुरवणी... 

मैत्री एक विश्वास, मैत्री एक अतुट बंध, 
मैत्री एक सुगंध, मैत्री निर्मळ निच्छल फुलाचा जणू गंध... 

मैत्री एक जिव्हाळा, मैत्री सर्वोत्तम नात्याचा कळवळा. 
रक्त नाही रक्ताहुन भाव मोठा, मैत्रीचा
ऊद्गाता तो कृष्ण सावळा... 

मैत्री एक स्वप्न, मैत्री एक तत्व 
मैत्री हेच जिवणाचे अस्तित्व... 

कुणी जपतो, कुणी चुकतो
मैत्रीत मात्र सजिव सृष्टीचा कण नाकण वाहवत जातो... 

बनवाव्या तितक्या बनतील व्याख्या
मैत्री आहे, बंधिस्त कोण्या एका शब्दात होणार नाही हजारो, लाखो तिच्या ख्यात्या.... 

लिहू किती..? थांबू कुठे..? प्रश्न मनात येतात, 
मैत्रीच्या नावे लाखो भाव मनात उमटवून उत्तर मात्र फक्त आणि फक्त "मैत्री" इतकच उरवतात.... 🌺✍🏻

मैत्री दिनाच्या खुप खुप शुभेच्छा🌺 🤝
एक प्रेमवेडा/"शब्दवेडा"
 गणेश फापाळे...✍

©Ganesh Phapale 🤝मैत्री एक अतुट नाते 🤝

मैत्री म्हणजे एक ध्यास
घेतला तर एक निर्मळ श्वास
अनुभवला तर सुंदर असा भास.. 
मैत्री जणू दुःखाचा ऱ्हास तर सुखाचा उल्हास... 

मैत्री कुणासाठी परवणी तर

🤝मैत्री एक अतुट नाते 🤝 मैत्री म्हणजे एक ध्यास घेतला तर एक निर्मळ श्वास अनुभवला तर सुंदर असा भास.. मैत्री जणू दुःखाचा ऱ्हास तर सुखाचा उल्हास... मैत्री कुणासाठी परवणी तर #FriendshipDay

9 Love

c43a22ea3b5fda95f224b4977fe10596

Ganesh Phapale

सौंदर्याची निशाणी तु.. 💕

लुकलुक पाणीदार डोळे, 
नजरेत भाव किती ग सुंदर भोळे... 

उंच उंच माथा त्यावरती उज्वल भविष्याचे लेख,अलेख,
काळेशार ते घनदाट केस जणू गर्द राईच एक... 

चाफेकळी टपोरे रूबाबदार नाक
त्याला लटक्या रूसव्याची धाप.. 
लाल गोरे गाल,त्यावर पडते खळी कमाल... 

गुलाब पाकळी सम गोड गुलाबी ओठ, 
हस्य सदा त्यावर गोड,शब्दांत ते मांडाव तरी कसं थेट...? 

नयन नक्षी जणू जिवंत मुर्तीच तु
गोंडस हणुवटी, त्याला सुंदर तीळाने करून सोबत झाली परिपूर्ण सौंदर्यवतीच तु... 

नाजुक मऊ मखमालीचे कापसा सम ते गोरे पान हात, 
सहज भिजताय छान सुबक मेंहदीच्या रंगात... 

सौंदर्य परी तु, सुंदरतेची निशाणी तु. 
जलबुट्टीवार वेलीदार कंबर,जणू हरिणीची ग त्याला चाल... 

मखमालीचे पाय नाजुक-नाजुक त्याला
पैंजणाच्या छुनछुन घुंगरांचा ताल.... ! 

एक प्रेमवेडा/"शब्दवेडा"
गणेश फापाळे...✍🏻

©Ganesh Phapale सौंदर्याची निशाणी तु.. 💕

लुकलुक पाणीदार डोळे, 
नजरेत भाव किती ग सुंदर भोळे... 

उंच उंच माथा त्यावरती उज्वल भविष्याचे लेख,अलेख,
काळेशार ते घनदाट केस जणू गर्द राईच एक...

सौंदर्याची निशाणी तु.. 💕 लुकलुक पाणीदार डोळे, नजरेत भाव किती ग सुंदर भोळे... उंच उंच माथा त्यावरती उज्वल भविष्याचे लेख,अलेख, काळेशार ते घनदाट केस जणू गर्द राईच एक...

8 Love

c43a22ea3b5fda95f224b4977fe10596

Ganesh Phapale

💕रात ही मधुचंद्राची💕

आकाशी चंद्र होता फुललेला, 
अंगनी गंध मोगऱ्याचा गंधाळलेला

सजणा एक ओठी रसपानास असुसलेला, 
सजणीने ही गाली साज लाजेचा चढवलेला... 

लावले दालन चांदनीचे खिडकीला
दारी बांधले तोरण त्या फुल वेलीला... 

अंतरी सुगंध हा दरवळला प्रेमाचा, 
लाजरा हर्षमनी तो उल्हासाचा... 

नजर थीरकली लागला ध्यास तो सौंदर्याचा, 
गेली शरमुन ती अवतार हा नवखा बघुन सजणाचा... 

थरथरले अंग-अंग, उभे सगळे रोम-रोम, 
येता जवळी सजणा भिरभिरले तीचे मन... 

होता स्पर्श शहारून ती गेली
रातीत या सुखमोहनाची पहाट ही झाली, 
मनाने ही सर स्वर्ग सुखाची मिठीत सजणाच्या पार केली... 

एक प्रेमवेडा/"शब्दवेडा"
गणेश फापाळे... ✍🏻


          !!धन्यवाद !!

©Ganesh Phapale 😍💕

😍💕

8 Love

c43a22ea3b5fda95f224b4977fe10596

Ganesh Phapale

पथ्थरों में देख क्या रही हो..? 
हसिन सी मुस्कान को युं छुपा क्यों रही हो..? 
शायद इनसानों के दिल में होणेवाले पथ्थर को आप मेहसूस कर चुकी हो..... 🤣

एक प्रेमवेडा /"शब्दवेडा"
 गणेश फापाळे...✍

©Ganesh Phapale #hangout

9 Love

c43a22ea3b5fda95f224b4977fe10596

Ganesh Phapale

#RIPDilipKumar 🥀नाम-ए-मोहब्बत हुं में 🥀

एक टुटी हुई अवाज हुं में, 
हा एक छुटी हुई सी परछाई हुं में
एक हारी हारी सी सांस हुं में
यही तो नाम-ए-तकदीर हुं में... 

चलती तो हुं साथ सबके में, 
फिर भी कहि जींदा तो कही मुर्दा हुं में
एक एहसास हुं में, एक पेहचान हुं में
जो समझ सके दिल से, उस के लिए "नाम-ए-मोहब्बत" हुं में... 

टुटा टुटा सा ख्वाब हुं में
एक उंचे तट की उंचाई भी हुं में
न जान सके कोई मुझे, तो उसकी बद्नामी भी हुं में, 
वहीं तो नाम-ए-जिंदगी हुं में... 

हाथ की लकिरों मेै हुं में
सिद्दत सी शानोशौकत मै हुं में, 
मान जाओ एर एक के पास होकर सबकी हो नहीं पाती में
वहीं तो नाम-ए-किस्मत केहलाती हुं में... 

एक प्रेमवेडा/"शब्दवेडा"
गणेश फापाळे... ✍🏻

©Ganesh Phapale जिंदगी 🥀🌾

#RIPdilipkumar

जिंदगी 🥀🌾 #RIPdilipkumar

11 Love

c43a22ea3b5fda95f224b4977fe10596

Ganesh Phapale

✍🏻ज्याचा त्याचा पाऊस वेगळाच✍🏻

तुझा पाऊस तनामनाला भिजवतो.. 
माझा पाऊस तुला भीजलेलं पाहुन मला खिजवतो... 

तुझा पाऊस तुझ्या गुलाबी ओठांवर हास्य फुलवतो... 
माझा पाऊस मला त्या हस्याची ओढ लावतो... 

तुझा पाऊस तुझ्या सौंदर्यात अधिकच भर घालतो... 
माझा पाऊस मला तुझ्या त्या सौंदर्यात भुलवतो... 

तुझा पाऊस तुला लाजवतो. 
माझा पाऊस तुला लाजलेलं पाहुन मला प्रफुल्लीत करून जातो... 

तुझा पाऊस तणामणाला भीजवतो
माझा पाऊस तुला भीजलेल पाहुन मला खिजवतो... 

तुझा पाऊस तुला हसवतो... 
माझा पाऊस मात्र मला तुझ्यासाठी झुरवतो... 

तुझा पाऊस वेगळा माझा पाऊस वेगळा.. 
तुझा पाऊस वेलीवर तरत तुझ्या ओठांवरून वाहत जातो.
माझा पाऊस डोळ्यांतुनही बरसून जातो... 

खरच ज्याचा त्याचा पाऊस वेगळाच पडतो.. 
तुझा पाऊस सरींनी कोसळतो. 
आणि माझा पाऊस रिमझीम करत वेठीस मला धरतो.... ✍🏻😍

©Ganesh Phapale दोन पाऊस वेडे 😍

#Flower

दोन पाऊस वेडे 😍 #Flower

9 Love

c43a22ea3b5fda95f224b4977fe10596

Ganesh Phapale

🌾🌾 सौंदर्य तुझे🌾🌾

हाती तुझ्या खण-खण चुडा, 
ऐकून त्याचा खणखणाट झालो मी वेडा.. 

पायी छुनछुन वाजले पैंजण
छेडीले तार मनी, ना राहिलो माझा मी.. 

माथ्यावरी बिंदी तुझी सजली जणु चंद्र चकोर, 
घायाळ मन हे टिकली तीथेच नजर ही वेडी टकोर... 

नाकावरी साज नथेला भारजरी
एका नजरेतच घायाळ मी ग माझ्या हरीनी.. 

ओठांवरी जणु सजली गुलाब पाकळी
रूपाने ग तुझ्या भुरळ ही अशी मनावर घातली.. 

वेडे पिसे मन हे झाले, नकळतच ग कसे ते तुझ्याकडे ओढावले..? 

सुबक ती हनुवटी,त्याला श्रृंगार तीळ तो सजला. 
तीर प्रेमाचा तीरकस मनावरी सहजच चालुन गेला.. 

कमनीय बांधा तो तुझा
गोरा गोरा रंग खुलून दिसला.. 

नाजुक-नाजुक कंबर जणु ती फुल वेली, 
त्यावर रंग तु परिधानला अलबेली..

सौंदर्यवेडा मी भुललो पाहुन हे रूप तुझे
सांग ग सखे यात चुकले तरी काय माझे...? 

!! धन्यवाद!! 
 एक प्रेमवेडा /"शब्दवेडा"
 गणेश फापाळे...✍

©Ganesh Phapale #Rose

10 Love

c43a22ea3b5fda95f224b4977fe10596

Ganesh Phapale

वेठिस ही रात्र आली,
अंगणी फुलवेली हळूवार बहरली
संगे सजनी तव सजली, 
सखा सोबती पाहुन पुढ्यात गोड ती लाजली...! 

गणेश फापाळे... ✍🏻

©Ganesh Phapale #Flower

9 Love

c43a22ea3b5fda95f224b4977fe10596

Ganesh Phapale

!!वेड्या मना!! 

शांत सुनहरी लहर होती मनी
अता का नुसत्याच त्या आठवणी...? 
क्षितीज होता भरलेला तसा तो बहरलेला, 
आज का रे रिता तो झालेला.? 
मन वाहिले वाहिले प्रेमापरी, 
मग आज का रे मना कहानी ही 
तुझी अधुरी...? 
स्वप्न सजले होते लाखो ऊरात
स्वप्ना परी झोपच कारे नाही जागतोय असाच डोळा रोतो रात...? 
सोड ना रे मना ध्यास तो एकची अता
सांग ना कसा रे समजाऊ तुजला
भास ही तो अभासच होता...
कहानी आधूरी राहिली ती त्या
सुंदर सोनेरी सकाळची.. 
स्वप्न ही विरली त्या अबोल समुंद्र किनाऱ्यावरची...... 
!! धन्यवाद!! 
एक प्रेमवेडा
गणेश फापाळे✍

©Ganesh Phapale #Flower

9 Love

c43a22ea3b5fda95f224b4977fe10596

Ganesh Phapale

।। प्रेम हे ।। 

प्रेम हे प्रेम असतं
डोळे असूनही का ते
अंधच भासतं,,,,? 

आस खोटी
सोबत खोटी 
तुटतात प्रेमात 
कित्येक नाती ,,,! 

सगळेच असतात 
आजूबाजू
तरी भासते का 
मज़ दुनिया माझी 
तीच एकटी,,,? 

असे क्षण सारेच सोबती 
आस तरी का मनी 
एकच उरती,,,? 

भोगूनी घेतल्या 
लाखो यातना
तरी का भावना प्रेमाची 
हविशीच वाटती,,,? 

घायाळ मनं हे सारे
सतत कोड्यात
अडकून पडती,,,! 
डोळस असुनही 
का रे जाणिव मज़
अंधपणाची होती,,,? 

(काल्पनिक) 

👉 गणेश👈

©Ganesh Phapale #Sunrise

8 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile