Nojoto: Largest Storytelling Platform
ajay1152029784678
  • 4Stories
  • 12Followers
  • 32Love
    102Views

Ajay

  • Popular
  • Latest
  • Video
c48fbf7318145c301d6c7aeb7849ae7d

Ajay

एकदा बिरबलाकडे एक विचित्र खटला आला. 

कोतवालाने दोन माणसांना आणि एका घोड्याला बिरबलासमोर हजर केले. एक माणुस सधन व्यापारी दिसत होता आणि दुसरा साधारण वेषातील लंगडा माणुस होता. 

कोतवालाने सांगितले कि हि दोन माणसे त्या घोड्यावरून भर चौकात जोरजोरात भांडत होती. त्यामुळे कोतवालाने त्यांना पकडुन बिरबलासमोर हजर केले. 

बिरबलाने पहिल्या माणसाला भांडणाबद्दल विचारले. 

तो म्हणाला “हुजूर, हा घोडा माझा आहे. मी माझ्या गावातुन घोड्यावर बसुन दिल्लीत कामासाठी निघालो होतो. हा माणुस मला रस्त्यात भेटला. तो लंगडत चालत होता. त्याने मला विनंती केली कि मलासुद्धा दिल्लीत यायचे आहे. तुम्हीही तिकडेच जात आहात तर कृपया आपल्या घोड्यावर मला पण घेऊन चला. 

आता फारसं अंतर उरलं नव्हतं म्हणुन मी त्याला आपल्या घोड्यावर घेतलं आणि निघालो. पण नंतर हा बदमाश माणुस घोडा माझा आहे आणि तू घोड्याला सोडुन निघ म्हणायला लागला. म्हणुन आमचं भांडण सुरु झालं.” 

बिरबलाने दुसया माणसाला विचारले. 

“हुजूर, हा माणुस खोटे बोलतोय. खरं तर मला चालायला त्रास होतो म्हणुन मी हा घोडा वापरतो. मी दिल्लीला येत असताना हा माणुस मला भेटला. तो म्हणाला माझे पाय खुप दुखत आहेत, तर मला दिल्लीपर्यंत घोड्यावर घेऊन चला. मी त्याची विनंती मान्य केली. नंतर तो म्हणायला लागला हा घोडा माझाच आहे. म्हणुन आमचं भांडण सुरु झालं.”

दोघेही सारखीच हकीकत सांगुन दुसऱ्यावर आरोप करत होते. दोघेही परगावचे असल्यामुळे त्यांना ओळखणारे आणि शहानिशा करणारे कोणी नव्हते. 

बिरबलाने त्यांना सांगितले कि घोडा इथेच ठेवा आणि उद्या सकाळी परत या. मग मी निकाल देईन. 

दुसऱ्या दिवशी ते आले तेव्हा त्याच घोड्याच्या उंची आणि रंगाचे आणखी काही घोडे तिथे बिरबलाने मागवले होते. बिरबलाने त्यांना सांगितले कि घोड्याजवळ जा आणि आपला घोडा ओळखा. 

दोघे घोड्यांजवळ गेले आणि घोडे बघू लागले. लंगड्या माणसाला घोडा ओळखताच आला नाही. त्या व्यापाऱ्याने मात्र आपला घोडा बरोबर ओळखला आणि तो जवळ आला कि घोडासुद्धा आपल्या मालकाला पाहुन लाडात आला. 

बिरबलाने घोड्याकरवीच त्याच्या खऱ्या मालकाची ओळख केली होती. 

बिरबलाने व्यापाऱ्याला त्याचा घोडा दिला आणि त्या लंगड्या माणसाला फसवणुकीची शिक्षा दिली

©Ajay
  #Tuaurmain
c48fbf7318145c301d6c7aeb7849ae7d

Ajay

एका गावात एक शेतकरी आपल्या पत्नीबरोबर रहात होता. त्यांना एक लहान मुलगा होता. ते त्याच्यावर खूप प्रेम करायचे आणि त्याला खेळताना बघून आनंदी व्हायचे. 
एके दिवशी तो शेतकरी जवळच्या जंगलात एक छोटे मुंगूस पकडतो व त्याला घरी घेऊन येतो व आपल्या पत्नीला दाखवतो व बोलतो, ‘हा मुंगूस अतिशय लहान आहे व याला मोठे व्हायला आणखी सहा महिने लागतील. हा आपल्या मुलाचा चांगला जोडीदार बनू शकतो याला आपण पाळू शकतो.’ शेतकऱ्याची पत्नी या गोष्टीला तयार होते आणि मुंगूसाचे पण संगोपन करते.


एकदा शेतकऱ्याची पत्नी बाजारात काही भाज्या घ्यायला जात होती. तिचा मुलगा पाळण्यात गाढ झोपलेला होता तेव्हा ती तिच्या नवऱ्याला बोलविते आणि सांगते, ‘मी बाजारात जात आहे व आपला मुलगा झोपलेला आहे तर त्याच्यावर लक्ष असू दया व मुंगूसाला त्याच्याजवळ जाऊ देऊ नका.’ शेतकरी म्हणाला, ‘काळजी करू नकोस आपला मुंगूस त्याला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचवणार नाही.’
शेतकरी, पत्नी येण्याची बराच वेळ वाट बघतो परंतु तिला परत यायला बराच उशीर लागतो. त्यामुळे तो त्याच्या कामासाठी निघून जातो. काही वेळानंतर शेतकऱ्याची पत्नी आपल्या झोपडीत परत येते. तो मुंगूस दाराच्या उंबरठयावर तिची वाट बघत होता. त्याचे तोंड रक्ताने माखलेले होते ते बघून तिला असे वाटले की, मुंगूस आपल्या मुलाबरोबर एकटा होता व त्याने आपल्या मुलाला नक्कीच मारून टाकले. ती रडायला लागली व म्हणाली, ‘तू माझ्या मुलाला मारलेस!’ आणि एक जड वस्तु त्याच्या डोक्यावर मारून फेकते व ती आत जाते.

©Ajay #walkalone गोष्ट

10 Love

c48fbf7318145c301d6c7aeb7849ae7d

Ajay

         एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके.फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला 'धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले. मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे. 'शिंपीदादा, 'शिंपीदादा,शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे 
तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली.

            उंदिरमामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले
. ते वाजवत तो गाणे गाऊ लागला ' राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम,ढुम,ढुमक
 !' राजाने हे ऐकले . तो शिपायांना म्हणाला ' जा रे, त्या उंदराला पकडून आणा.'    

            शिपायांनी उंदिरमामाला पकडले. दरबारात आणले
. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदिरमामा म्हणाला 'राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम,ढुम,ढुमक !'
हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी फेकून दिली.
 उंदिरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला 'राजा मला भ्याला. 
माझी टोपी दिली. ढुम,ढुम,ढुमक !' हे गाणे गात गात तो राजवाडयातून निघून गेला. मी मी

©Ajay
  #Gulaab कथा

129 Views

c48fbf7318145c301d6c7aeb7849ae7d

Ajay

0 Bookings


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile