Nojoto: Largest Storytelling Platform
nitinpawar8667
  • 104Stories
  • 100Followers
  • 920Love
    390Views

nitin pawar

writer

  • Popular
  • Latest
  • Video
cace40d8219dbf8210d7cd11e891990a

nitin pawar

अश्रू.....


तुझ्या आठवणीचा सुगंध,
माझ्या मनात साटलेला,
तुझ्या प्रतीक्षेतच अजूनही,
माझा कंठ दाटलेला.......

कोसळणारा पाऊस पाहून, 
मलाही खूप आनंद होतो, 
माझ्या,अश्रूंना कवटाळून,
प्रेमाने,आपल्या कवेत घेतो.....

नितीन पवार, उस्मानाबाद

©nitin pawar

cace40d8219dbf8210d7cd11e891990a

nitin pawar

पाऊस....

पाऊस मनातला,
पाऊस तनातला,
झाडावरती सळसलत्या,
ओल्याचिंब पानातला.....

पाऊस मातीतला,
पाऊस शेतीतला,
उमलणाऱ्या पिकामधल्या,
बळीराजाच्या स्वप्नातला......

पाऊस सुखातला,
पाऊस दुःखातला,
पोटशी पाय घेऊन पडलेल्या,
त्या झोपडीत माणसातला....

पाऊस ढगातला,
कडकडणाऱ्या विजातला,
ह्रदयाचा ठोका चुकवणाऱ्या,
त्या ओल्याचिंब मनातला.......

नितीन पवार...✍️

©nitin pawar #Drops
cace40d8219dbf8210d7cd11e891990a

nitin pawar

मातीत बी कालवुनी,
पेरण्या कशाबश्या केल्या,
ढगा कडे लावुनी नजर,
पापण्या ओल्या रे झाल्या.....

©nitin pawar #CalmingNature
cace40d8219dbf8210d7cd11e891990a

nitin pawar

महाराष्ट्राच माझा 

गोड आहे किती माझ्या, 
महाराष्ट्राची संस्कृती, 
मिळते क्षणा क्षणाला, 
तशी जगण्याची स्फूर्ती..... 

दारी सडा सारवण, 
शोभते तुळस रांगोळी,
पहाटे दारात टाळ वाजतो, 
वासुदेव गातो भूपाळी.... 

नाकात नथ डोक्यावर पदर, 
भाळी कुंकू शोभते नारी, 
मस्तकी टिळा नी सदरा धोतर, 
शोभून दिसतो माझा शेतकरी... 

सायंकाळी शुभं करोति, 
देव्हाऱ्या पुढे होते आरती, 
मंदिरात भजन किर्तन, 
ऐकू येते विठ्ठलाची महती...... 

हात जोडुनी नमस्कार करतो, 
आई वडिलांचा आशीर्वाद घेतो,
संतांच्या या पावन भूमीत,
महाराष्ट्राची संस्कृती जपतो.....

शूरवीरांचे बलिदान, 
कामगार हे कष्टती,
इतिहासाची साक्ष देणारी, 
महाराष्ट्राची माती....

नितीन पवार, नागुरकर 
9921429995

©nitin pawar

cace40d8219dbf8210d7cd11e891990a

nitin pawar

Uska Call दिन सोनियाचा....

सूर्यकिरण पडता भूवरी,
स्पर्श मोरपीसाचा झाला,
लाली नभात पसरली,
दिन सोनियाचा आला...

©nitin pawar

cace40d8219dbf8210d7cd11e891990a

nitin pawar

**सण होळीचा**

सण होळीचा,
अस्वाद घेऊ पुरणपोळीचा,
सर्वांच्या एकजुटीचा,
ऐक्याचा.....

रंग होळीचा,
शाम रंगी रंगला,
उत्साह जाहला,
गोकुळात......

तरंग मनाचे,
नात्याशी नात्याला जुळले,
भाव कळले,
अंतरीचे.....

मरगळ घालवू,
नवा उत्साह आणू,
महत्व जाणू,
होळीचे.....

करू होळी,
राग, द्वेष, मत्सराची,
उधळण रंगाची,
आंनदाने......

नितीन पवार...

©nitin pawar #holi2021
cace40d8219dbf8210d7cd11e891990a

nitin pawar

*शिर्षक- एकटा मी 

नाही रे कोण सोबती,
मीच माझा शिल्पकार.
जीवनास देतो आता,
एक नवा अविष्कार.....

वाट चालतो एकटा,
सारे क्षणिक सोबती,
मग कशाला बाळगू,
व्यर्थ कुणाची रे भीती......

झेप घेईन गगनी,
मनी निश्चिय बाधिला,
काटे बाजूला सारूनी,
नवा मार्ग मी शोधला.......

आले जरी अडथळे,
मागे नाही हटणार,
जीवनाची नौका तशी,
पैलतीरी पोहचवणार.......

 मीच माझा सुधारक,
करू कोणाची अपेक्षा,
उगा का म्हणून देऊ,
इथे मी अग्निपरीक्षा.......

नितीन पवार, उस्मानाबाद

©nitin pawar #flyhigh
cace40d8219dbf8210d7cd11e891990a

nitin pawar

*हुंदका*

विसरल्या साऱ्या चाली रीती, 
दुरावलेत सारी नाती, 
नवयुगातील पिढी सारी, 
 नुसत्याच उरल्या भिंती.....

संस्कार नाहीत राहिले आता, 
आजीं-आजोबांशी गुज गोष्टी,
सर्वांची ती मोबाईलवर दृष्टी, 
कृत्रिम ढगाने पडतोय वृष्टी...... 

देव्हारे आहेत नटून थटून,
परी पंचारती विझली, 
डेकोरेशनच्या जमान्यात, 
रोषणाई घरोघरी सजली...... 

आजी आजोबा नाती गोती, 
उरलेच तेही नावापुरती, 
आपण आपले लेकरबाळ, 
यातच सारी गुंतली प्रीती...... 

वृद्धाश्रम का निर्मले इथे, 
का म्हणून हुंदके दाटले, 
प्रेमजिव्हाळा आटला झरा, 
आपुलकीचे सारे बंध तुटले....

नितीन पवार... उस्मानाबाद ✍️ #eveningtea
cace40d8219dbf8210d7cd11e891990a

nitin pawar

ओढ भेटीची,,,,


ती पहिलीच भेट आपली,
हृदयाची धडधड वाढलेली,
आठवून तरी बगशील का?
तूझ्या नी माझ्या सहवासाने,
प्रीतीची कळी ह्रदयात फुललेली......

तुझ्या नजरेचा तो तिरपा कटाक्ष,
अजूनही मला खुणावतो,
तु असं का चोरून पाहतेस?
कधी कळतील तुला भावना,
ह्या विचारातच मी बेचैन होतो.....

तुझ्या भेटीची ओढ मला, 
सारखंच ग खुणावते,
का कुणास ठाऊक?
प्रत्येक पावसात भिजण्याचा, 
गुन्हा करावयास लावते........

आतुरलेले ग कान माझे,
ऐकण्या हितगुज मनीचे तुझ्या,
पण का घोगावतय वारा मस्तकी?
वेडं झालं ग मन तुझ्या प्रेमात,
आटवतंय का आठवून बघ,
तुझं प्रतिबिंब दिसतंय माझ्या डोळ्यात.......


नितीन पवार.....✍️ #ValentinesDay
cace40d8219dbf8210d7cd11e891990a

nitin pawar

रेश्मी स्पर्श 

रेश्मी स्पर्श तुझ्या हाताचा, 
अजूनही मला आठवतो, 
तुझ्या आठवणीचा सुगंध, 
मी माझ्या मनात साठवतो..... 

तुझ्या हाताच्या स्पर्शाने, 
मी माझाच राहत नसे, 
स्वप्नातही तुझीच प्रतिमा, 
निरंतर न्याहळत असे......

क्षितिजा पलीकडचं दृश्य, 
तुझ्या डोळ्यात मी पाहिलं, 
जीवनभराच्या प्रवासात, 
तुला माझे आयुष्य वाहिलं.....

तू दिलेलं वचन मला, 
मी अजूनही पाळत आहे, 
तू येण्याच्या आशेवर माझे,
काळीज मी जाळत आहे....

शेवटी घडायचं तेच घडलं, 
नशिबानं ही साथ सोडलं, 
रेश्मी स्पर्श तुझ्या हाताचा, 
बंद मूठीत जाऊन पडलं..... 

नितीन पवार....नागुरकर
उस्मानाबाद #standAlone
loader
Home
Explore
Events
Notification
Profile