Nojoto: Largest Storytelling Platform
jairamdhongade7263
  • 746Stories
  • 127Followers
  • 7.7KLove
    1.2LacViews

जयराम धोंगडे

साहित्यिक-कवी-गझलकार-कादंबरीकार

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
d042d2d86a6996010d3e583d375baf51

जयराम धोंगडे

White घाणा

मी घाण्याच्या बैलावानी फिरतो आहे...
तेव्हा कोठे घास सुखाचा मिळतो आहे!

घोटामध्ये अपमानाचा सागर प्यालो...
माझ्यामधला अगस्त्यी खवळतो आहे!

कर्तृत्वाचा बोथट झाला आहे बोरू...
माणूस आणि पेपर आता फुटतो आहे!

तालसुरांचे उरले नाही देणे घेणे...
जो तो आता टाळ आपला कुटतो आहे!

येतो आहे वीट मलाही या साऱ्यांचा..
मिटून डोळे जे घडते ते बघतो आहे!

©जयराम धोंगडे #love_shayari
d042d2d86a6996010d3e583d375baf51

जयराम धोंगडे

काल होता आज नाही...
लागणे अंदाज नाही!

जन्म अन् मृत्यूस काही...
कोणता ईलाज नाही!

बेभरवसे वाटते सुख...
दुःख धोकेबाज नाही!

सापडेना मज कुणीही...
जो मुळी नाराज नाही!

जीवनाचे कर्ज मृत्यू...
मुद्दलावर व्याज नाही!

©जयराम धोंगडे #happyteddyday
d042d2d86a6996010d3e583d375baf51

जयराम धोंगडे

शायरी

सवत्यासुभ्यामुळे मज दुःखे जरी मिळाली...
वाचायला जगाला कादंबरी मिळाली!

वाटेत जिंदगीच्या हैराण दुःख करती...
शिनभाग घालवाया मज शायरी मिळाली!

मुखदर्शनास होतो आलो तुझ्या विठोबा...
पाहायला कळस अन् ही पायरी मिळाली!

पाऊस ऊन वारा सोशीत राहिल्यावर...
देहास कष्टलेल्या या ओसरी मिळाली!

राबून घेतल्यावर आली दया धन्याला...
झोळीत गोंडराची मग बाजरी मिळाली!

©जयराम धोंगडे
d042d2d86a6996010d3e583d375baf51

जयराम धोंगडे

नको मोह माया


असूया नको की नको मोह माया...
यहीं छोड़ना हैं यहाँ जो कमाया!

नको लालसा ती सुखाची जिवाला...
दुखोंने दिया है मुझे रोज साया!

किती कष्ट करतोस शेतीत भावा...
किसीने पुछा क्या भुका है कि खाया!

कितीही लिहा चांगले रोजच्याला...
बता कौन बोला मुझे खूब भाया?

मराठी नि हिंदी किती गोड भाषा...
किया प्यार तो फिर नया प्यार पाया!

©जयराम धोंगडे #Likho
d042d2d86a6996010d3e583d375baf51

जयराम धोंगडे

तिलवत् स्निग्धं मनोऽस्तु वाण्यां गुडवन्माधुर्यम्
तिलगुडलड्डुकवत् सम्बन्धेऽस्तु सुवृत्तत्त्वम् ।
अस्तु विचारे शुभसङ्क्रमणं मङ्गलाय यशसे
कल्याणी सङ्क्रान्तिरस्तु वः सदाहमाशम्से ॥

©जयराम धोंगडे #makarsankranti
d042d2d86a6996010d3e583d375baf51

जयराम धोंगडे

प्रवास

चुकले तुझे म्हणालो त्याचाच त्रास होता...
साधाच राग कारण त्या कारणास होता!

चंपा जुई चमेली नकली फुले सजवली...
डोळ्यास भावली पण कोठे सुवास होता?

बहिऱ्या मुक्यापुढे मी जोशात व्यक्त झालो...
देतील दाद कोणी माझा कयास होता!

खोटेखरे कळावे जगणे सुखांत व्हावे...
ओढीत याच केवळ केला प्रयास होता!

आला तसाच गेला कळले कुणास नाही...
शापीत जीवनाचा अंतिम प्रवास होता!

©जयराम धोंगडे #zindagikerang
d042d2d86a6996010d3e583d375baf51

जयराम धोंगडे

प्रवास

चुकले तुझे म्हणालो त्याचाच त्रास होता...
साधाच राग कारण त्या कारणास होता!

चंपा जुई चमेली नकली फुले सजवली...
डोळ्यास भावली पण कोठे सुवास होता?

बहिऱ्या मुक्यापुढे मी जोशात व्यक्त झालो...
देतील दाद कोणी माझा कयास होता!

खोटेखरे कळावे जगणे सुखांत व्हावे...
ओढीत याच केवळ केला प्रयास होता!

आला तसाच गेला कळले कुणास नाही...
शापीत जीवनाचा अंतिम प्रवास होता!

©जयराम धोंगडे #zindagikerang
d042d2d86a6996010d3e583d375baf51

जयराम धोंगडे

White श्वास

माणसे कोत्या मनाची संस्कृतीचा फास झाली...
अन् खुजी त्रिज्याच त्यांच्या वर्तुळाचा व्यास झाली!

संकराने निर्मिलेले ना चवीचे ना गुणाचे...
पीक प्राणी माणसाची बेगडी पैदास झाली!

रोज गोळ्या औषधांवर धावणारी देहगाडी...
भासते ती देखणी पण जिंदगी आभास झाली!

नेहमी चर्चेत होता लेखणीचा तो पुजारी...
काल जो सत्कार झाला आज बाधा त्यास झाली!

रोजच्याला मी ठरवतो ना लिहावे आज काही...
शब्दसाठ्याच्या बळावर गझल माझा श्वास झाली!

©जयराम धोंगडे #sad_shayari
d042d2d86a6996010d3e583d375baf51

जयराम धोंगडे

White  माझ्यापरीने

रागलोभाच्या क्षणांना टाळतो माझ्यापरीने...
वागणे माझेच मी पडताळतो माझ्यापरीने!

दे महागाईस वाढू वाढत्या गर्भाप्रमाणे...
रोज डोहाळे तिचे सांभाळतो माझ्यापरीने!

नेहमी असते यशाची वाट खडतर जाणतो मी...
पण तरीही मी तिला चोखाळतो माझ्यापरीने!

केवढी झाली विषारी वासना या माणसांची...
ऐकले की क्रौर्य आसू गाळतो माझ्यापरीने!

वेदनांनी वेढले आकाश अन् पाताळ सारे...
सोसताना ही पिडा ढेपाळतो माझ्यापरीने!

©जयराम धोंगडे #Sad_Status
d042d2d86a6996010d3e583d375baf51

जयराम धोंगडे

White आखणी

सारखी या जिवा लागली टोचणी...
ना मिटवता मिटे एकही पापणी!

संपली एक की येत जाते नवी...
सोडवाव्या किती सारख्या अडचणी?

पीक गेले उभे वाहुनी रानचे...
राहिली काढणी ना अता कापणी!

काय आहे सुरू हे कळेना मला...
जिंदगीला म्हणू शाप की पर्वणी?

जीवना घे परीक्षा भलेही कशी...
लागलो मी कराया तशी आखणी!

©जयराम धोंगडे #GoodMorning
loader
Home
Explore
Events
Notification
Profile