Nojoto: Largest Storytelling Platform
vinayakdas9963
  • 4Stories
  • 17Followers
  • 44Love
    0Views

Vinayak Das

  • Popular
  • Latest
  • Video
d08164a4126432b78917561d42935e81

Vinayak Das

थोड़ा तू भी फ़लक से नीचे उतर,
जरासा मैं भी जमीं से उठता हूँ।
कोशिश दोनों और से जरूरी हैं,
गर रिश्ता हैं और कशिश भी।
- राही औरंगाबादी #rekhta #poetry
d08164a4126432b78917561d42935e81

Vinayak Das

गुंतण महत्वाचं.कळतयं पण... 😊 पण आलाचं ना. हो, कळतयं पण भीती वाटते.. नाहकच असेल कदाचित पण आहे. आजच पहिल्यांदा भेटलो आणि गुंतलो.. खुप बोलावं वाटतं अश्या वेळी, पण विषय सुचतं नाहीत. तसे मला सावरायला जुने प्रश्न दिमतीला येऊन उभे होतेच या ही वेळी. 'तिला काय वाटेल?''काही गैरसमज तर नाही ना करुन घेणार ती?''हि पहिलीच भेट खरं तर, ही योग्य वेळ आहे का?' आणि तोच जुना प्रश्न 'खरंच आहे का आपली पात्रता,त्या योग्यतेची?' आणि या सर्वांसोबत एक नवाच प्रश्न आज नव्याने आला, 'तू पुन्हा प्रेमात कसं काय पडू शकतोस, काय ही तुझ्या पहिल्या प्रेमाची प्रतारणा तर नाही ना?' (खरं तर हा प्रश्न निरर्थक, पण तरीही आपलं अस्तित्व सिद्ध करून गेला)

प्रश्न, पहिलेही मला निशब्द करायचे आणि आज ही त्यांनी तेच केलं.ती मात्र निर्भिडपणे माझ्याशी संवाद साधत होती. शेवटी आपलंच मन आपली गोची करतं हे मात्र खरं. मी फक्त तिच्या प्रश्नांना उत्तर करत होतो. तिच हसणं न्याहळत होतो, कदाचित ती माझ्या अवघडलेपणावरचं तर हसंत नाहिये ना, असं ही वाटुन गेलं. पण छे हो, इतक नितळ, निरागस हास्य ते, त्यावर इतका कोता संशय घ्यावा.. माझीच मला लाज वाटली. मी निर्धाराने भावनांना सावरून होतो. भीत सुध्दा होतो... काय सांगव, हा बांध कधी तुटेल ही. बराच काळ या सुख वर्षावा भिजत असतांना, वेळ आपलं कार्य साधतचं होती, अविरत वाहण्याचं. खरं तर ज्या वेळी वाटंत असत, वेळ जरा काळ थांबावा तो तेव्हाच इतक्या लवकर निघुन जातो ना.... असो, दोन तासच ते, फक्त तिच सोबत असणंच, मनाला उधाण देणारं होतं... गुतांयच नाही अस मनाशी ठरवलेलं असतांना ही, तिच्यात नकळत गुंतत जाणं, अनोखं होतं, विस्मयातीत करणारं होत,

बाकी सगळं विसरायला लावणारं होतं. आज हे सगळं तुला सांगायच ठरवुनच आलो होतो, शेवटी तुच तर हक्काची मैत्रिण आहेस ना माझी...

माझ्या प्रिय डायरीस्

तुझा 'राही औरंगाबादी' #involvement is needed

#Involvement is needed

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile