Nojoto: Largest Storytelling Platform
sujatapatil7823
  • 71Stories
  • 10Followers
  • 813Love
    16.2KViews

Sujan

Voice is that endowment,that magic which opens the deep compartment of your heart!

  • Popular
  • Latest
  • Video
d34959496e60c490d08712ac98c5195f

Sujan

काही नाती का असावी लागतात,
हे आज समजलं!
आई नंतरही मायेचा 
आधारवड होऊन छाया 
देत असते मोठी बहिण,
हे आता उमगलं!
सगळ्यांची जबाबदारी 
मला घ्यावी लागते 
असा त्रागा करूनही मात्र 
सगळं तीच करते,
हे पण जाणवलं!
आई-वडिलांची आठवण येते 
म्हणून माहेरचं सुख जी देते 
ती मोठी बहीण असते,
हे सुद्धा पटलं!
ताई गिरी करत असली तरी 
आमच्या आयुष्यात असणाऱ्या 
कमतरता भरून काढणे 
माझंच कर्तव्य आहे असं 
मानणारी ती मोठी बहीण असते,
हे पुरतं समजून चुकलं!

©Sujan

108 Views

d34959496e60c490d08712ac98c5195f

Sujan

देवीचा घट बसवून अखंड ज्योत तेवत ठेउन
तिची नित्य नियमाने सेवा केली तर कृपा होईल?
रोज अनवाणी पायाने चालून,
कडक उपवास करून कृपा होईल?
रोज रास गरबा करून देवी समोर 
फेर धरून जागरण करून कृपा होईल?
नऊ दिवस मंत्रोउपासना करून कृपा होईल?
होईल नक्कीच जर स्त्री शक्तीचा परिचय असेल,
तिच्यातील कलागुणांचा आदर असेल,
तिच्या शक्तीचा वापर तिला करता येत असेल!

©Sujan
  #navratri
d34959496e60c490d08712ac98c5195f

Sujan

डॉक्टरच्या घरी कोणी 
मरणारच नाही असं नाही ना..
कुलूप बनवणाऱ्याच्या घरी कधी 
चोरी होणारच नाही असेही नाही ना...
शेतकऱ्यांच्या घरी कधी कोणी 
उपाशीच राहणार नाही असं नाही ना...
पोलीस असूनही त्याच्याकडून कधी 
कुठलाच गुन्हा होणारच नाही असंही नाही ना...
सगळं काही परिस्थितीजन्य गोष्टींमुळे,
सगळ्यात महत्त्वाचं नशिबाचा भाग असेच म्हणावे लागेल.

©Sujan
  #Aurora

27 Views

d34959496e60c490d08712ac98c5195f

Sujan

 तीच व्यक्ती स्वतःच्या शब्दांमधून 
किंवा बोलण्यातून एखादा विषय 
उत्तमरित्या मांडू शकते,
इतरांना त्याबाबतीत चांगल्या प्रकारे 
समजून घेऊ शकते की ज्या व्यक्तीला 
स्वतःला त्या गोष्टींचा सामना 
करावा लागलेला असतो.

©Sujan
  #TiTLi
d34959496e60c490d08712ac98c5195f

Sujan

युद्ध खरच गरजेचे आहे का?
नसेल माणसाचे माणसाशी पटत,पक्षाचे पक्षाशी पटत,धर्माचे धर्माशी पटत तरीही या सुंदर निसर्गात,सुंदर जगात राहता यावं म्हणून शांततेने जगता येणे शक्यच नाही का?
एक विघातक निर्णय आणि सगळा विध्वंस,निदान हसते खेळते जग पाहून युद्धाचा विचार थांबवता येणे शक्य नाही का?वसाहतवाद,साम्राज्यवाद आणखी किती दिवस चालणार? यातून निर्माण होणारा राग,द्वेष यावर शेवटचा पर्याय युद्धच असू शकतो का?
एकीकडे आरोग्य क्षेत्र,अंतराळ क्षेत्रात,संशोधन क्षेत्रामध्ये प्रगती करत आहात आणि दुसरीकडे युद्धातला मानवसंहार!,मग हे सगळं चाललंय कुणासाठी हे कळेल का?
माणसाच्या जगण्याला किंमत असावी ना!भयमुक्त होऊन जगाच्या पाठीवर कुठेही फिरता यावे,राहता यावे इतकं सोपं 
जगणं नसावं का?
धर्म हाच मनुष्याला दया,प्रेम याची शिकवण देत असेल तर त्याच धर्मासाठी एकमेकांना मारणं आणि हे युद्ध करणे योग्य आहे का?
देशाच्या अस्तित्वाला किंमत ही देशातील जनतेमुळे असतेच ना!ज्या जनतेच्या सुख सोयींसाठी सरकार चालवलं जातं, त्या जनतेला विचारत घेऊनच युद्धाचा निर्णय घेऊ नये का?
युद्ध करणे खरच गरजेचे का?

©Sujan
  #Chess
d34959496e60c490d08712ac98c5195f

Sujan

खूप जबाबदाऱ्यांचं ओझ डोक्यावर असणारे
वेळ पुरत नाही म्हणून सतत 
घड्याळात बघत असतात आणि 
जबाबदारीतून मोकळे झालेले लोक 
वेळ जात नाही म्हणून 
घड्याळाकडे बघत असतात.
घड्याळ तर तेच असतं,
एकच वेळ सगळ्यांना दाखवणारे,
पण जीव मात्र सगळ्यांचा 
टांगणीला लावणारे.

©Sujan
  #samay

36 Views

d34959496e60c490d08712ac98c5195f

Sujan

   मला असंच वागायचय,
मला अमुक एक गोष्ट अशी करायला आवडेल,
मी नाही कुणाचे मनावर घेणार...वगैरे वगैरे 
असं एखादयाला वाटणं हे त्याच्या 
मानवी हक्काला धरून आहे. पण जेव्हा दुसऱ्या एखाद्याच्या अशाच वाटण्याला 
आपण आक्षेप घेतो तेव्हा आपसूकच 
त्याचे मानवी हक्क आपण पायदळी तुडवतो.

©Sujan
  #nightsky
d34959496e60c490d08712ac98c5195f

Sujan

आधुनिकीकरणात तंत्रज्ञान विकसित झाले,
तंत्रज्ञानाने चांगले शिक्षण आणि नोकऱ्या विकसित केल्या,नोकऱ्यांसाठी काहींना परदेशी संधी मिळाल्या आणि आधीच विभक्त असलेली त्यांची कुटुंबे 
पूर्णच विभक्त झाली.कुटुंबात राहिलेले 
एकटे किंवा दुकटे यांनी आपल्या मृत्यूची 
आधीच तजवीज करून ठेवणे क्रमप्राप्त होऊ लागले. कटू आहे पण सत्य!

©Sujan
  #Hindidiwas
d34959496e60c490d08712ac98c5195f

Sujan

बाप घराच्या खांबा सारखा असतो,
ज्याच्या भक्कम आधारावर घर उभे असते.
तर आई ही दरवाज्या सारखी असते,
जो कधी पावसाळ्यात कुरकुरतो; फुगतो,
पण तो घराला हवाच असतो.तो घराचे सगळ्याच गोष्टींपासून संरक्षण करतो.

©Sujan
  #MothersDay
d34959496e60c490d08712ac98c5195f

Sujan

प्रवासात माणसे भेटतात,एकमेकांशी बोलतात,माहितीची देवाण-घेवाण करतात,पण ती परत भेटलीच पाहिजे असे नाही,त्यांची आठवण आली पाहिजे असेही नाही,असं जीवनाच्या प्रवासात सगळ्यांसाठीच करता आलं तर प्रवास खूप सोप्पा होईल.

©Sujan
  #Yaatra

27 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile