Nojoto: Largest Storytelling Platform
prasadgothankar7530
  • 72Stories
  • 165Followers
  • 619Love
    129Views

prasad gothankar

9372956690

  • Popular
  • Latest
  • Video
ea2d4397e924461685c82df6557e4f69

prasad gothankar

मनात खोल कुठेतरी पेटलेला वणवा विजवण्यासाठी डोळ्यांना पाऊस होऊन बरसावच लागतं.

- काव्यप्रसाद








.

©prasad gothankar
  #rain
ea2d4397e924461685c82df6557e4f69

prasad gothankar

आयुष्यात वेशीवरचा पिंपळ पार होता आलं पाहिजे...
येणाऱ्याचं स्वागत आणि जाणाऱ्याला टाटा करता आलं पाहिजे...
आयुष्य फार सोप्प आहे
फक्त
पिंपळपारा एवढं तटस्थ राहता आलं पाहिजे...

- काव्यप्रसाद




.

©prasad gothankar
ea2d4397e924461685c82df6557e4f69

prasad gothankar

आयुष्यात वेशिवरचा पिंपळ पार होता आलं पाहिजे...
येणाऱ्याचं स्वागत आणि जाणाऱ्याला टाटा करता आलं पाहिजे...
आयुष्य फार सोप्प आहे
फक्त
पिंपळपारा एवढं तटस्थ राहता आलं पाहिजे...

- काव्यप्रसाद







.

©prasad gothankar
  #duniya
ea2d4397e924461685c82df6557e4f69

prasad gothankar

खेड्यावरची पडकी शाळा आयुष्यात पक्क्या भिंती बांधायचं शिकवते.

- काव्यप्रसाद








.

©prasad gothankar
  #Shadow
ea2d4397e924461685c82df6557e4f69

prasad gothankar

शहरातल्या उंच इमारती गावाकडच्या कौलारू घरापुढे ठेंगण्याच वाटतात.

- Prasad Gothankar















.

©prasad gothankar
  #Connections
ea2d4397e924461685c82df6557e4f69

prasad gothankar

सावल्यांशी साखळीचा खेळ खेळू लागलो
आठवांचा गाव माझा त्यात शोधू लागलो
चाळली मी खूप पाने एक झाल्या सावल्या
अन् मनाचा फूटलेला बांध बांधू लागलो...

हासतो अन् रोज बघतो काजव्यांचा गाव रे
चांदण्यांची रोज असते अंगणाशी धाव रे
बंद असते दार नसतो ओसरीवर तो दिवा
या क्षणाच्या ओंजळीवर आयुष्याचा डाव रे...

- काव्यप्रसाद





.

©prasad gothankar
  #BadhtiZindagi
ea2d4397e924461685c82df6557e4f69

prasad gothankar

आयुष्याचा सारा भार अंगाखांद्यावर घेऊन चालताना 
ओसाड सुनसान रस्त्यावर तापणाऱ्या सूर्याच्या आगीत 
भाजून निघणाऱ्या उघड्या पाठीवर भेदरलेले घामाचे थेंब
सरसरत खाली उतरतात तेव्हा, 
पावलांच्या असंख्य वेदना कोरड्या घशासोबत थुंकीचा आवंढा घोटत 
आतल्या आत रिचवाव्या लागतात, 
कुठेतरी सूर्याच्या आड उनाड फिरणारा एखादा ढग येऊन उभा राहतो ...
तेव्हा, त्या क्षणभर सावलीचा गारवा 
आयुष्याच्या सगळ्या वेदना विसरून जातो, 
ढगांच्या सावलीसोबत सर्वांगाला फुंकर घालणारा वारा 
मायेचा हात फिरवत राहतो ..
रस्त्याच्या तापलेल्या निखाऱ्यांवर भाजलेल्या पावलांना 
समोरच हाकेच्या अंतरावर एक झाड दिसावं आणि शरीराचा सारा भार 
त्या झाडाच्या बुंध्यावर टाकून निवांत डोळे बंद करून पडून राहावं...
अगदी असाच चालत राहतो मी सुद्धा...
कालही चालत होतो...आजही चालत आहे..
कदाचित उद्याही चालेन...
असाच आयुष्याच्या तापलेल्या रस्त्यांवरून...
कधीतरी सावलीचा ढग येईल...
कधी गारवा देणारा वारा थंड फुंकर घालील...
कधी उशाला झाडाचा बुंधा निवांत झोपू देईल म्हणून ...
मी मात्र आयुष्याच्या शोधात फिरत राहीन...
आज...उद्या...परवा...


-काव्यप्रसाद

©prasad gothankar
  #bestfrnds
ea2d4397e924461685c82df6557e4f69

prasad gothankar

उगाचच थांबलो नाही असा एकांत वळणावर
तुझा येणार सांगावा मला आधीच कळलेला...

जरा मिटलेत डोळे हे तसा मी झोपलो नाही
जरी मी वाटलो वरवर तरी आतून जळलेला...

तुझ्या वाटेत मी आता कधी येणार ही नाही
उगाचच पालवी घेतो जुना अंकूर गळलेला...

नको आता नव्या भेटी नको आता नवे काही
नको त्या संदुका खोलू नको तो काळ छळलेला...

मनाला सांगतो आहे अता होणार ना काही
कशाला पेटवावा तो नव्याने वाद टळलेला ...

-काव्यप्रसाद

©prasad gothankar
  #Wochaand
ea2d4397e924461685c82df6557e4f69

prasad gothankar

चला गडयांनो पुन्हा एकदा गावाकडे जाऊया ....


येईल वादळ पाऊस घेऊन भरून जातील व्हाळ,
चला उपसू मनामनातून आठवणींचा गाळ,
झरझर झरणे भिरभिर कुरणे आनंदाने पाहू,
पुन्हा एकदा चला नव्याने जून्यासारखे राहू ...

जुनीच गाणी जुन्याच चाली पुन्हा नव्याने गाऊया ...  
चला गडयांनो पुन्हा एकदा गावाकडे जाऊया ....

डौल देखणा परसामधला खुणावणारी झाडी,
कुशीत निजते गावाकडची डोंगरातली वाडी,
सळसळणाऱ्या गवतफुलांच्या माळावरती धावू,
एकदिलाने आकाशाच्या पंखाखाली राहू...

लाल तांबड्या मातीमधला खेळ नव्याने खेळूया
चला गडयांनो पुन्हा एकदा गावाकडे जाऊया ....

शेतमळीच्या पाण्यावरती चला सोडूया होडी,
आयुष्याला पुन्हा लावुया गावाकडची गोडी,
शेतावरच्या बांधावरूनी अगिनगाडी धावू,
अन् बाबाच्या पाठीवरचा भार जरासा वाहू...

शहरामधली चमचम सारी शहरामध्ये सोडूया 
चला गडयांनो पुन्हा एकदा गावाकडे जाऊया ....

उगाच करतो वणवण सारी गाव उशाला असता,
डोंगर, दर्या,नदी किनारे तुझ्या घराशी वसता,
खुणावते मज आंगण आणिक ते कौलारू घर,
किती खुणा मी घेऊन फिरतो उघड्या अंगावर...

पुन्हा एकदा पाऊस वेडा अंगावरती झेलूया
चला गडयांनो पुन्हा एकदा गावाकडे जाऊया ....

✍️काव्यप्रसा

©prasad gothankar
  #Love
ea2d4397e924461685c82df6557e4f69

prasad gothankar

जेव्हा संपते परीक्षा थोडा आनंदित होतो
जरा संपला पसारा थोडा आनंदित होतो
पुढे नसेल अभ्यास थोडी करू आता मस्ती
नवं सपान पाहून थोडा आनंदित होतो
जशा पावसाच्या सरी तसं कॉलेज सरलं 
ओझं दप्तराच माझ्या आता माघारी राहिलं
गावं सोडून भरात आलो शहराच्या वाटे
जणू व्हावी चुकामूक घर लांबलेले वाटे
जेव्हा झोपतो घरात वर नसते आभाळ
असे कामाचा पसारा आता वाटतो विटाळ
किती वाटायचे गोड पाठी दप्तराचे ओझे
रोज भेटायचे मला शाळे सवंगडी माझे
डोळ्या दाटते आभाळ थेंब गालावरी येतो
खुर्ची वाटते नकोशी जेव्हा कामावरी येतो
चार कोपाऱ्याच घर नाही त्यालाहो अंगण
कसं पाहावं डोळ्यांनी इथं आभाळ चांदणं 
थोडी लिहितो कविता साजशृंगाराचं लेण
कोऱ्या कागदाला माझ्या असे शाळेचीया देण
किती लोटलीत वर्ष कधी संपली रे शाळा
किती खोल काळजाशी माझ्या आघात राहिला
ओल्या पापण्यात वर्ग जेव्हा फिरून पहिला
माझ्या आवडीचा बाक मागे शाळेत राहिला...

काव्यप्रसाद
प्रसाद गोठणकर

©prasad gothankar
  #Moon
loader
Home
Explore
Events
Notification
Profile