Nojoto: Largest Storytelling Platform
shahajichandansh4805
  • 15Stories
  • 27Followers
  • 117Love
    0Views

Shahaji Chandanshive

मराठी लेखक / कवि

  • Popular
  • Latest
  • Video
ece3a309939750709778aaec6b83ebc9

Shahaji Chandanshive

फुलांचा गांव 
गांव हा फुलांचा होता काटे न मी पाहिले 
सज्जनांच्या संगतीला आयुष्य मी वाहिले ....

सुख शांती होती तिथे अन माणसांना भावही 
माणसाच्या गावात होता रंक आणि राव ही ....

नव्हती माहीत जात तिथे आणि धर्मही कोणता 
एक होता गाव शिव अन सगळ्यांचा पाणवठा ...

जाणत्याचा आब अन नेनत्याचा राब होता 
चुकणाऱ्या पावलांना रोखणारा जाब होता ....

निर्माल्य फ़ुलांचे व्हावे तशी कां झाली माणसे 
दर्वळणाऱ्या मातीस तिथे आज कां गंध नसे ...

रीत नवी ही जगण्याची जाणीवही आली नवी 
माणसांना तोलण्याला इथे परिमाणेही नवी नवी ...

माणसांच्या गर्दीत आज शोधतो मी गावास त्या 
नमतो मी माथा तिथे जन्मलो मातीत ज्या ...
***********
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive फुलांचा गांव

फुलांचा गांव

9 Love

ece3a309939750709778aaec6b83ebc9

Shahaji Chandanshive

सांजवेळी 

अशा उदास सांजवेळी बसून मी अाहे 
जुळले सूर तरीही मैफिल उदास अाहे ....

गेलास असा कसा तू टाकुनी पैलतिरा
सोसू कसा इथे मी एकांती हा दुरावा 
येशी पुन्हा फिरोनी ही आस उरात अाहे ....

सांगावयास होते विसरू कशी तुला मी 
हरवून स्पर्श गेले ते शोधू कुठे तया मी 
पाऊस आसवांचा नयनी झरून अाहे ....

झाली अशी कशी ह ताटातुटी जीवांची 
ठेवू अभंग प्रीती ही होती आस मनांची 
कहाणी सरून गेली जीवनी निराश अाहे ....
*****
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापू

©Shahaji Chandanshive सांजवेळी

सांजवेळी

6 Love

ece3a309939750709778aaec6b83ebc9

Shahaji Chandanshive

प्रीत गंधावली ..

रंग माझा तूला आज घेवून जा 
प्रीत गंधावरली आज देवून जा ....

शब्द माझे तूझ्या आज ओठांवरी 
पाहता दुनियेस झाली का बावरी 
गीत माझे तुझे आज गावून जा ....

आता झालीस तू परक्यांची जरी 
नको विसरूस गं प्रीत माझी खरी 
शब्द ह्रुदयातला आज तू घेवून जा ....

दुनिया अाहे गं ही दिसण्याला बरी 
नाही घेणार समजून प्रीत ही खरी 
दिल्या वचनास माझ्या तू जागुन जा ....

पाऊस नयनातला सांग आवरू कसा 
आज माझा मला मी सावरू कसा 
गीत ओठातले तू आज चूम्बून जा ....
*****
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive प्रीत गंधावली ..

प्रीत गंधावली ..

11 Love

ece3a309939750709778aaec6b83ebc9

Shahaji Chandanshive

अखेरची भैरवी 

आसवांत आज माझ्या तू भिजून राहिली 
अखेरची तू दिलेली भैरवी मी गायली....

श्वासात श्वास होते हातात हात गुंफले 
धुंद त्या मिठीतले भावस्पर्श गोठले
चांदण्यातली कथा ती आठवुनी गायली...

शब्दांत मुकेपणाचे दाटून भाव होते 
लागून आस दवांची तृषार्थ ओठ होते 
बीलगुणनी तुला धरावे आस पूर्णं जाहली ...

रितेपणी जीवनास साथ तू दिलेली 
धुंद त्या वादळी तू सोबतीस राहीली 
विसरू कसा दिसांना कहानी भरून राहिली ..

होतो तुला म्हणालो देईन प्रेमगाणी
राहुनी ह्रुदयात गेली अधूरी ती कहाणी 
आसवांची धार गाली गोठुनिया राहिली ...
*****
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive अखेरची भैरवी

अखेरची भैरवी

12 Love

ece3a309939750709778aaec6b83ebc9

Shahaji Chandanshive

नाते

संसार माझा मांडण्या तुझा आज मोडू नको 
सप्तपदीचे नाते तुझे माझ्यासाठी तोडू नको ...

मी असा वाऱ्यावरी सोबतीस तू येवू नको 
कालच्या त्या दिसांसाठी आता तू झुरु नको ...

जुळणार नां नाते इथे आता जन्मांतरीचे 
प्रतीक्षेत त्या रात्री आता तू जागू नको ...

आठवणीसवे मी आता जाईन दूर तुझ्या 
नियतीचा शाप मला आज तू टाळू नको ...

स्वप्नं एका घरट्याचे होते तुझे नी माझे 
भंगलेल्या क्षणांना आता उरी तू बांधू नको ...
*****
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive नाते

नाते

7 Love

ece3a309939750709778aaec6b83ebc9

Shahaji Chandanshive

प्रतिक्षा 

शब्दांवीना कळावी तुज भावना या मनाची 
माझे मला न कळते मी पाहते वाट कुणाची ...

हा शृ'गार यौवनाचा मी जपते तुझ्याचसाठी 
तू समजून घे मला रे हे सारे तुझ्याचसाठी 
तू येताच मला कळावी चाहूल ओळखीची ...

सांगू कसा तुला मी शब्दांत भाव माझा 
हळवी फुले जपावी हा छंद असे रे माझा 
मी ओळखून अाहे तुझी नजर पारखीची ....

होवून स्वप्न राजा माझा येशिल तू कधीरे 
गंधित त्या मिठित मज घेशील तू कधीरे 
जीवनात मी प्रतीक्षा करते रे त्या क्षणाची ....
****
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive प्रतिक्षा

प्रतिक्षा

7 Love

ece3a309939750709778aaec6b83ebc9

Shahaji Chandanshive

चरणावरी तुझिया..

चरणावरी तुझिया झाले मी लीन राया 
घेनां मला मिठीत झाली अधीर काया ....

हातात हात घेता फुलले गुलाब गाली 
स्पर्शात आज तुझिया गात्रे फुलुन आली 
सांगू कशी तुला रे माझी अबोल माया ....

भेटीत आज आपुल्या आकाश चांदण्याचे 
मी झाले तुझीच ना रे हे नाते युगायुगांचे 
घे चुंबुंन भावना या हे मन शांतंवाया ....

तृप्तीत या सुखाच्या धुंदीत आज गावू 
नाते तुझे नी माझे जगी या अखंड ठेवू 
घे गंध या फुलाचा जीवनात साठवाया ....
*****
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive #चरणावरी तुझिया..

#चरणावरी तुझिया..

5 Love

ece3a309939750709778aaec6b83ebc9

Shahaji Chandanshive

धुंदीत यौवनाच्या 

धुंदीत यौवनाच्या बहरून आज काया 
लवकर ये सख्यारे जाईल रात वाया .....

एकांत आज समया लुटण्या बहार ये तू 
झिंगुन रात्रं अाहे पिवूनि घे नशा तू 
रागावलास कारे का केली कठोर माया .....

गात्रे फुलून आली घेण्या तुला मिठीत 
दाबू किती उमाळा या घट्ट कंचुकीत 
डोळे अधीर झाले तुज देहात साठवाया .....

भेटीस आज आपुल्या झाले कीती दिवस 
विसरलास कारे तू त्या धुंदावल्या क्षणास
बेभान आज मी रे तू ये रात जागवाया .....
***
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive धुंदीत यौवनाच्या ...

धुंदीत यौवनाच्या ...

5 Love

ece3a309939750709778aaec6b83ebc9

Shahaji Chandanshive

तू जाताना 
तू जाताना.....
तुझ्या डोळ्यांतील 
पाणी आठवलं की 
मी आंतल्या आत 
ढासळत जातो ....
एक एक थेंब 
ठिबकतना 
मी मात्रं 
उध्वस्त होतो .
**
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता .सांगोला जि .सोलापूर

©Shahaji Chandanshive तू जाताना ....

तू जाताना ....

7 Love

ece3a309939750709778aaec6b83ebc9

Shahaji Chandanshive

परिंचि राणी 
कित्येक दिवसांच्या माझ्या संथ सरळ आयुष्याला 
नागमोडी वळण देणारी तू ...परींची राणी !
भेटलीस एका अनोख्या वळणांवर ..वावटळीसारखी !
कित्येक दिवसांचा मनाचा तळ पार ढवळून निघाला 
प्रश्नानांच पालवी फुटत गेली ...
कारण ...तुझं राज्य नाजुक फुलाफुलांच तर......... 
माझं .........काट्याकुट्याचं !
तरीही तू प्रवेश केलास.. नकळतपणे माझ्या राज्यात 
पहारेकऱ्यांची नजर चुकवून .....!
कोणे एके काळी ..माझंही राज्य होतं .....
स्वप्नांनी दाटलेल...ऋतूनी बहरलेल....आणि..... पाखरानीही...गजबजलेलं ....
पण ...खूप उशीर झाला तुझ्या येण्याला .....
आज माझं राज्य ..तुझ्या लेखी ..
विजयनगरचं उध्वस्त सामराज्य..! 
तरीही तुला दिसतील ..आजही काही अवशेष ..काही खुणा कधी काळी युध्द. झाल्याच्या ....
आणि ..त्यातही .....
काळजावरच्या कोवळया जखमा जपल्याच्या !
आज कदाचित इथं नसेल तुझ्या स्वप्नातलं गांव ..
नसतील फुलपाखरांची गाणी ....
पण ...जर तू ठरवलसं ..तर मात्रं ...
अजूनही इथं साम्राज्य उभारू शकतेस ..
नाजुक फुलांचं आणि बहरणाऱ्या ऋतूचं !
पाखरांच काय ...ती येतीलच ..बघ तुला जमलं तर ..
कारण..या साम्राज्यात काही वाटा तुझाही असेल !!
-----
शहाजीकुमार चंदनशिवे 
अकोला ता.सांगोला जि.सोलापूर

©Shahaji Chandanshive परिँची राणी

परिँची राणी

9 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile