Nojoto: Largest Storytelling Platform
pratiksharokade3160
  • 3Stories
  • 13Followers
  • 20Love
    0Views

Pratiksha Rokade

  • Popular
  • Latest
  • Video
ef339d9f03b75898230b63262ee9e670

Pratiksha Rokade

         प्रिय पावसा
प्रिय पावसा वाट तुझी पाहताना,
  😨डोळे आमचे तहानले होते.....
तुला सांगू तुझ्या न येण्याने आमचे,
  डोळे सुध्दा पाणावले होते.....😢
आमच्या हाकेची साद ऐकून,
   या भूमीवर आलास तू.....
आनंदाने राहिलास सुखात सुध्दा,
    सुखात नांदलास तू.....😊
ये प्रिय पावसा सांगणारे खरचं,
  आमच्यावर चिडलास का...?
   तूच आमचा जीवनदाता,
      तू आमचा कैवारी........
मग कारे तुला आमची दया 😢😢
        नाही आली.......?
तुझ्या मुळे सारी गावं बहरली
    तुझ्या मुळे उजाडली☹️
सांग ना प्रिय पावसा.......,
तुला आमची दया नाही आली.
  हे निसर्गा तुझ्या लेकरांवर,
तू एवढा चिडलास का......?
या पुराच्या पाण्यात सारा,
  गाव वाहून नेलास का....?
आता तरी आमच्या वर थोडी,
  किमया करशील का...🙏
तुझ्या रौद्र स्वरूपाला थोडं 
    शांत करशील का.... ?
थोडं शांत करशील का.....?

ef339d9f03b75898230b63262ee9e670

Pratiksha Rokade

गेले ते दिवस

गेले ते दिवस उरल्या फक्त आठवणी…
पण का जाणे आज त्या दिवसांची
आठवण का आली.
केली होती खूप मजा ,केली होती मस्ती
आठवतेय मला अभ्यास करताना 
आलेली सुस्ती .

गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी...
बारावीच्या अभ्यास करून आला होता 
खूप कंटाळा, स्वप्न पाहिली होती
त्या सुट्टीची, पण कोण जाणे
आज त्या अभ्यासाची आठवण
का आली.

गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी...
शाळा संपली, कॉलेज संपल,
क्लास आमचा संपला.
मित्रांसवे रमण्याचा वेळ आमचा संपला
कोण जाणे मित्र आता पुन्हा येऊन
भेटतील का...?
मैत्रीचा हा गोडवा अतूट टिकवून
ठेवतील का ...?

गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी...
पुन्हा त्या क्लास मध्ये जाऊन बसावस वाटतंय
हातातून गेलेले क्षण पुन्हा अनुभवाव वाटतय
कोण जाणे पुन्हा त्या आठवणी आम्हाला त्या
दुनियेत घेवून जातील का ?
कारण, गेले ते दिवस उरल्या फक्त आठवणी...

ef339d9f03b75898230b63262ee9e670

Pratiksha Rokade

जिजाऊ

जिजा लखोजींची लाडकी लेक,
स्वराज्याची राजमाता.
धगधगत्या सूर्याची ज्वाळा,
रखरखत्या तलवारीची पात.

जिजा स्वराज्याची सावली,
गोरगरीब रयतेची माऊली.
बोलण्यात तिच्या सरस्वती,
वागण्यात रौद्रराघिणी.

जिजा एक अशी आई,
जिच्या पोटी सूर्य जन्मला.
त्यांच्या त्या पराक्रमी तेजाने,
सूर्य झळाळू लागल.

जिजा स्वराज्याचा जिजाऊ,
शिवछत्रपती च्या माता.
त्यांच्या ह्या शिकवणीने,
उभी राहिली स्वराज्यगाथा.

जिजांच्या शिवबानं केली,
स्वराज्य निर्मिती अन,
त्यांच्या आशीर्वादाने पावण,
झाली महाराष्ट्र भूमी... जय जिजाऊ

जय जिजाऊ


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile